"..अखेर "मुहूर्त" ठरला; "मुख्यमंत्री" उद्या अकोले संगमनेरात; काय झाली "उलथापालथ"
I Am Coming..But !! |
उद्या अकोले, संगमनेरात "मुख्यमंत्र्यांचा दौरा" आहे. "नक्टीच्या लग्नाला, सतरा विघ्ने" अशीच काहीशी परिस्थिती निर्माण होऊन तीन वेळा तरिख बदलली. तर एकदा ना. विखे पाटील यांची मिटींग मातोश्रींच्या निधनाने रद्द झाली. या आपत्तींचे दु:ख संगमनेरला नक्कीच नाही. मात्र, अकोल्यात पिचड साहेबांना नक्कीच जिव्हारी लागल्याचे बोलले जात आहे. आणि का न लागावा !! कारण; सगळी तयारी करायची आणि ऐनवेळी लग्नात नवरीने "खो" घातला. तर त्याचे "शल्य" काय असते हे "कर्ता" धरता व्यक्तीच जाणू शकतो. "आर्थिक" बाबतात, "दुबळ्याघरी लगिन" नाही. मात्र, या प्रचंड "तणावाच्या मानसिकतेला" सामोरे जाणे वाटते तितके सोपे नाही. म्हणून थोडी मानसिकता लक्षात "इडा पिडा" टळो आणि "मुख्यमंत्री महोदयाची" सभा "दिमाखात" संपन्न होवो. हिच प्रार्थना भाऊ समर्थकांनी सुरू केली आहे.
आमुचा जय श्रीराम घ्यावा !! |
आब की बार भाऊ आमदार ? |
अकोल्यात पुर्वी पिचडांना जाब विचारण्याची हिंमत कोणी केली नाही. आता मात्र, "खुले पत्र" सोशल मीडियावर फिरु लागले आहे. आज कालचे उमेदवार त्याच्यासमोर राजकीय आखाड्यात "दंड थोपटून" मैदानात उतरु पहात आहेत. तर, त्यांच्यासोबत राहणाऱ्या निष्ठावंतांच्या तोंडून साहेबांच्या निर्णयाला विरोध होऊ लागला आहे. मात्र, खुलेआम बोलण्यास कोणी धजत नाही. परिणामी परिस्थितीचा ठाव घेणे अशक्य झाले आहे. या पलिकडे संगमनेरात अद्याप उमेदवार निच्छित केला नाही. थोरातांच्या विरोधात एक ना दोन तब्बल २४ जणांनी आखाड्याची माती कपाळी लावली. या इच्छुकांची खिल्ली उडविताना काही सदस्य म्हणाले. जर ऐवढे उमेदवार थोरातांच्या विरोधात उभे राहिले. तर ते सगळ्यात जास्त मतांनी निवडून येतील. त्यामुळे हे २४ जण खरोखर एकाक एक उमेदवार देऊ शकतील का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्याची माहिती सुत्रांनी दिली.
थोरातांना शह देण्यासाठी विखे घराणे कार्यरत झाले आहे. तर मुख्यमंत्र्यांनी येथे सभा लावल्या होत्या. मात्र, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये पुर आला आणि भाजपची लाट संगमनेर-अकोल्यात येण्यापासून पराव्रुत्त झाली. मात्र, धावत्या सभा आयोजित करून त्यांनी दौरे निच्छित केलेच. त्यात उद्याची महत्वपुर्ण सभा आहे.
आता मिशन संगमनेर |
दरम्यान; मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली निघालेली महाजनादेश यात्रा उद्या संगमनेर मध्ये दुपारी 11:30 वा. जाणता राजा मैदानात येत आहे. यात्रेसाठी संगमनेर तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जल्लोशात तयारी केली आहे. हिवरगाव टोलनाका ते दिल्लीनाका. छत्रपती पुतळा ते मालपाणी लॉन्स. दोन्हीही बाजूने फ्लेक्स व झेंडे मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहे. जाणताराजा मैदान सुसज्ज झाले की नाही याची खात्री करण्यासाठी खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी देखील आज संगमनेरमध्ये मंडपाची पाहणी केली आहे. विधानसभेचे बिगुल वाजताच संगमनेर तालुक्यातील अनेक मान्यवरांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. परंतु, विरोधक "एकास एक उमेदवार" या पासुन चार हात लांबच राहीले आहे. ही "उमेदवारी बीजेपीला की शिवसेनेला" हा चर्चेचा विषय ठरत आहे. ३५ वर्षांपासून निर्विवाद सत्ता राहिलेले काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांना शह देण्यासाठी कोण मैदानात उतरते याची चर्चा सर्वत्र सुरू आहे. आ. थोरात यांनी सहकाराचे प्राबल्य ठेवत आपला गड नेहमी राखला आहे. आता या गडाच्या तटबंदी उध्वस्त करण्यासाठी मा. मुख्यमंत्री महोदयांनी अनेक दिवसांचा आणि या भागाचा ज्वलंत व जिव्हाळ्याचा विषय असलेला निळवंडे प्रश्न हाती घेतला आहे.
काय करतील बुवा इकडे येऊन !! |
संगमनेर मधील जनतेची तहान मुख्यमंत्री महोदय भागू शकणार का ? उद्याच्या सभेला संगमनेर करांना कुठले ठोस आश्वासन मिळेल. याकडे अनेकांनचे लक्ष आहे. थोरातांचा किल्ला नेस्तनाबूद करण्यासाठी बीजेपी कडुन २४ जणांनी दंड थोपटले आहे. परंतु अनेक वर्षांपासुन विरोधक एकत्र येऊ नये. यासाठी, थोरतांनी साम, दाम, दंडभेद याचा वापर करून विरोधक एकत्र येऊच दिले नाही. यातच त्यांचे यश पहिला मिळाले आहे. असे बोलले जाते. विरोधक विखे पाटील यांच्यावरच अवलंबून असल्याचे एकंदरीत दिसत आहे. संगमनेर तालुक्यातील विरोधक हा तळागळापर्यंत पोहोचु शकला नाही. परंतु विखे यंत्रणाने मोठा सुरुंग संगमनेर तालुक्यात लावला आहे. मोठ्या संख्येची असलेली गावे. आपल्याकडे ओढण्याचा त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला आहे. तळेगाव गट, निमुनगट, जोर्वेगट, साकुर गट याकडे विखे यंत्रणेचे विशेष लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे संगमनेर विधानसभा ही अतिशय चुरशीची झाली आहे.विखे आशिर्वादा रुपी कोणाच्या डोक्यावर हात ठेवता याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
"""""""""""""
"""""""""""""
उद्या वाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संगमनेर अकोले "लायु सभा" अपडेट फक्त "रोखठोक सार्वभौम" वर.===============