...अखेर आघाडीवर "शिक्कामुर्तब"; २८८ पैकी १२५ "समसमान जागवाटप" तर ३८ जागा "मित्रपक्षांना". "शिवसेना-भाजप" महायुती होणार !!
पुणे (प्रतिनिधी) :-
उद्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीत आघाडी झाल्याची घोषणा माजी मुख्यमंत्री प्रुथ्वीराज चव्हाण यांनी केली. जागा वाटपाचा फॉर्म्युलाही तयार करुन, २८८ जागांपैकी १२५ जागा काँग्रेसला तर १२५ जागा राष्ट्रवादीला देण्याचे ठरले आहे. तर उर्वरीत ३८ जागा मित्रपक्षांना देणार असल्याची माहिती काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषेदेत दिली. ते पिंपरी येथे बोलत होते.
यापुर्वी जागा वाटपाचा विचार केला. तर, राष्ट्रवादीला झुकते माप मिळत होते. मात्र, वंचित आघाडीने काँग्रेसला भुईसपाट करण्याची भुमिका बजावली होती. त्यामुळे काँग्रेसला उतरती कळा लागली आणि काँग्रेसचे आमदार भाजप व शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे राष्ट्रवादीची किंमत वाढली आणि समसमान जागा वाटपावर यावर्षी शिक्कामुर्तब लागला.
आता या आघाडीमुळे आणखी एक गोष्ट निष्पन्न होऊ लागली आहे. आघाडी झाली. त्यामुळे महायुती देखील होणार. या जवळजवळ स्पष्ट झाले आहे. मात्र, जागा वाटपाहुन प्रचंड तु-तू,मै-मै होणार यात शंका नाही. कारण, भाजपने ज्यांना शुद्धपत्र दिले आहे. त्यांना विधानसभेचे प्रमाणपत्र देणे हे अनिवार्य आहे. इडीत गुंतलेले आपवाद वगळता. कोणाला नाराज करता येणे शक्य नाही. त्यामुळे बंडखोरांचे पुनर्वसन करण्यासाठी दोन्ही पक्षांना जागेचे महत्व जाणून मतभेद होण्याची दाट शक्यता आहे.
जागा वाटप जर समाधानकारक झाली. तर, ठिक नाहीतर शिवसेना अलिप्त धोरण स्विकारेल. त्याचा वचपा उद्या जर मुख्यमंत्री होण्यासाठी थोड्या जागा कमी पडल्या. आणि राष्ट्रवादीला साद घालून मंत्रीमंडळ स्थापन केले तर राज्याला नवल वाटायला नको. त्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी असा फॉर्म्युला चर्चेत येऊ लागल्याने भाजप जरा नमते धोरण घेत असल्याचे दिसत आहे. म्हणून एकंदरीत वातावरण पाहता. शिवसेना भाजप युती होईल. असे चिन्ह निर्माण झाले आहे. असे राजकिय विश्लेषकांना वाटते.