"राष्ट्रवादी" काँग्रेसमध्ये "विलीन" होते की !, "काँग्रेस" राष्ट्रवादीत !! थोरातांवर पवारांचा दबाब...?!


साहेब !! तुम्ही म्हणाल तसं

संगमनेर (प्रतिनिधी) :-
                      महाराष्ट्रातील बहुचर्चित इंदापूरची जागा आघाडीत चर्चेचा विषय ठरला आहे. काँग्रेस प्रांत अध्यक्ष बाळासाहेब थोरात या जागेसाठी कुठलीही ठोस भूमिका पवारांच्या पुढे घेतांनी दिसत नाही. थोरतांनी अजुनही राष्ट्रवादीकडे इंदापूरची जागा आमचीच आहे. आणि ती आम्ही लढवणारच असे ठणकावून सांगण्याचे देखील धाडस केले नाही. पवारांन पुढे थोरात नेहमी सरेंडर होतात.असेच चित्र आता महाराष्ट्रला दिसत आहे. असे राजकीय विश्लेषकांकडून बोलले जात आहे. काँग्रेसमध्ये विखेंना विरोधी पक्षनेते पद मिळाल्यानंतर थोरतांनी व्यक्तिद्वेषातून काँग्रेसमध्ये गटबाजीचे राजकारण केल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला. या दरम्यान पृथ्वीराज चव्हाण, हर्षवर्धन पाटील व बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीला प्रस्ताव दिला होता. की, हर्षवर्धन पाटील यांना प्रदेश अध्यक्ष व बाळासाहेब थोरात याना विरोधी पक्षनेतेपद असे साकडे दिल्ली दरबारी घातले होते. परंतु, त्यावेळेस हा प्रस्ताव काँग्रेस ज्येष्ठांनी फेटाळून लावला.

एक बालहट्टाने, दोन पक्ष अस्थित

          त्यानंतर नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची जागा ज्यावेळेस काँग्रेसकडे ना. विखे मागत होते तेव्हा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात हे विखेना जागा सोडू नका. असे शरद पवार यांना सांगत होते. असे खुद्द पवारांनीच याची कबुली दिल्याचे आपण पाहिले आहे. एवढेच काय अनुराधा नागवडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्यासाठी प्रेरित केले. हे देखील राजेंद्र नागवडे जाहीरपणे बोलून गेल्याचे दिसले आहे. तर काँग्रेसचा खासदार निवडून आला नाहीतरी चालेल. पण, विखेना व्यक्तिद्वेषातून विरोध करायचाच हा निर्धार थोरात यांचा होता असा आरोप त्यांच्यावर राजकिय वर्तुळातून होत आहे. विखेना विरोध करून आपले महत्व वाढवून घेण्याच्या नादात पक्षाचे किती नूकसान झाले याचाही विचार त्यांनी केला नाही. असा सुर खुद्द काँग्रेसमधून बाहेर पडू लागला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब कांबळे यांना जवळ करून विखेना शह देण्याचा केलेला प्रयत्न अयशस्वी ठरला. कारण, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहूल गांधी संगमनेरला आले त्याचदिवशी जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देवून थोराताना धक्का दिला. कांबळे व ससाणे यांच्यामागे वादाची किनार असली तरी. थोरात यांनी आजपर्यंत जिल्ह्यात सोयीनूसार कार्यकर्त्यांचा केलेला वापर लपून राहीलेला नाही. असे काँग्रेस अंतर्गत गटबाजीचे मत आहे.
विश्वासघात... मी लोकसभेला 78 हजारांची मदत केली आता विसरले का...ताई ?
काळाच्या ओघात थोरात प्रदेशाध्यक्ष झाले. पण, पाहिजे तेवढा आवाका त्यांना वाढविता आला नाही. त्यांच्या नेमणूकी नंतर  पक्षाला सोडचिठ्ठी देणारी संख्या वाढतच आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना जो विश्वास द्यायला पाहीजे तो थोरात साहेब देवू शकले नाहीत. असे जनतेला वाटते. नगर दक्षिणची जागा विखेना द्या असे मोठ्या मनाने थोरात यांनी सांगितले असते. तर, जिल्ह्यातील राज्यातील परिस्थिती आज वेगळी असती. हर्षवर्धन पाटील आज हेच सांगत आहेत. थोरात राष्ट्रवादीच्या दबावात आहेत. ते पवारांना कधीही विरोध करू शकत नाहीत. हाच संदेश पक्षात गेला. नगर दक्षिण काय, किंवा इंदापूर काय, काँग्रेसची फसवणूक होत असताना थोरात फक्त बघ्याची भूमिका घेत असतील तर राज्यात कोणते मजबूत संघटन उभे राहाणार आहे. असा प्रश्न पाटील यानी उभा केला आहे.

मी..माझा बालहट्ट दाखवला तुमचं काय?

                  थोरात यांच्याकडे राज्याची जबाबदारी दिली. मात्र, राज्य सोडून त्यांना संगमनेर विधानसभाच जड जाऊ लागली आहे की काय ? असे प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहेत. कारण, त्यांना शह देण्यासाठी ना. विखे, सौ. विखे व खा. विखे यांच्यासह चक्क मुख्यमंत्र्यांनी आणि आरएसएसच्या जुण्या जाणत्यांना सक्रिय करण्यात आले आहे. तर एकीकडे आरएसएस माईंडेड ज्यांच्याकडे "माल" "पाणी" व मोठा परिवार किंवा चंदनापुरीकडून एखादा उमेदवार उभा "राहणे" शक्य आहे. याची चाचपणी सुरू आहे. त्यामुळे थोरातांवर विरोधकांचे आक्रमण झाल्याचे पाहुन "आघाडी धर्म" किंवा "पडता काळ" लक्षात घेता. काही वर्षापुर्वी संगमनेरात प्रबळ विरोधी पक्ष असणारा राष्ट्रवादी पक्ष आज गप मूग गिळून आहे. बडे - बडे नेते येथे असतानाही त्यांच्याकडून आमदारकीसाठी पवार साहेबांच्या दरबारी उमेदवारी मागण्याची प्रकर्षाने हिंमत होत नाही. त्यामुळे, त्याचा फायदा येणाऱ्या काळात नक्कीच होणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सद्या जे काही चालु आहे. ते पवार साहेब म्हणतील ती पुर्वदिशा. असेच असल्याचे बोलले जात आहे. तसेही पवार साहेब देशाचे नेते आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच यंदाच्या निवडणुका पार पडल्या जातील.
           मात्र, काँग्रेस नेत्रुत्वावार  प्रश्नचिन्ह कायम राहणार आहे. एकीकडे  राष्ट्रवादी डॉ. कोल्हे, अमोल मिटकरी, धनंजय मुढे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, पार्थ पवार अशी तरुणांची फौज घेऊन लढत आहे. तर दुसरीकडे अवघ्या सहा महिन्यापुर्वी आल्या उर्मीला मतोंडकर यांनी पक्षातील मतभेदामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्याचा राजिनामा दिला आहे. तसेच सिंग, जाधव, शंकर यांनी बंडाचे निशान हाती घेतले आहे. इतकेच काय, तर वंचित आघाडी, मनसे व अन्य मित्रपक्षांचे देखील मन वळविण्यात ते आजवर अपयशी ठरल्याचे दिसते आहे. त्यामुळे सगळेच शरद पवार साहेब करणार आहेत. तर प्रदेशाध्यक्ष म्हणून आपली भुमिका काय ? असा प्रश्न जनतेच्या मनातून बाहेर येऊ लागला आहे. कालवर काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी विलीन करून पवार साहेबांकडे नेत्रुत्व देण्याच्या चर्चा सुरू होत्या. ही त्याची नांदी म्हणायची. की, महाराष्ट्रात काँग्रेसच राष्ट्रवादीत विलीन करायचा विचार राज्याचे काँग्रेस नेते करीत आहे. हे देखील कळायला तयार नाहीत.
 ===============

--  सुशांत पावसे

( संगमनेर प्रतिनिधी)

====================
             "सार्वभाैम संपादक"
                 

              - सागर शिंदे 

              8888782010

               -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ५८ दिवसात १०३ लेखांचे ५ लाख ६० हजार वाचक)
----------------------