मदत" !! "नको रे बाबा" !!* *आता "मोडेल" पण* *"वाकणार" नाही.* "प्रवरा लोणी" हॉस्पिटल मधील *"जिवंत अनुभव"*
वेळ आल्यावर हात !! |
गेली कित्तेक दिवसांपासून मित्राचे प्रचंड डोकं दुखत होते. आज-उद्या करता-करता अखेर सकाळी प्रवरा लोणी येथे जाण्याचा निर्णय झाला. भाड्याची गाडी करुन सकाळी ११:३० वाजता आम्ही मार्गस्त झालो. रात्रीच गावातील एका व्यक्तीला संपर्क साधला होता. तो बिचारा देवलशी सर्वसाधारण माणूस आमची वाटच पहात होता. सोबत एक पत्रकार असल्यामुळे वाटलं होतं की, त्याची फार मोठी पोहच असेल. पण, कसलं काय आलय "उतावळा नवरा" अन गुढग्याला "बाशिंग" हे शेवटी लक्षात आले. त्याची तरी काय चूक, मोडेल पण कधी वाकणार नाही. हेच त्याचे तत्व होते. आम्हाला त्या देवलशी सामान्य माणूस म्हणून मोठ्या आदराने मदत केली. पत्रकाराचे फोन सुरु झाले. डॉ. सुजय विखे, ना. विखे साहेब. यांच्या अगदी जवळच्या व्यक्तींना फोन केला. त्यांनीही उंटावरुन शेळ्या वळायला सुरुवात केली. त्यांनी ज्या डॉक्टरांची नावे सांगितली होती. त्यांनी मोठ्या त्वेशाने सांगितले. कोण हा ? मी नाही ओळखत. नंबर लावून ट्रिटमेंन्ट घ्या. !! आम्ही हा सर्व प्रकार पहात होतो. जरावेळ झाला. पत्रकार महोदयांनी पुन्हा एक नंबर फिरविला. एका खा. समर्थकांनी उचलला आणि म्हणे कोणतरी देव डॉक्टरांना भेटा म्हणे. दुपारची जेवणाची वेळ झाली. तेव्हापासून त्यांची वाट पाहिली तर थेट ५:५८ मिनिटांनी एक महिला आली आणि त्यांनी धाडकन दार लावून त्याला कुलूप ठोकलं. आम्ही विचारलं, साहेब !!? त्याम्हणाल्या माहित नाही. काऊंटरला विचारा..!!
दरम्यान गप्प बसेल तो पत्रकार कसला. ! कारण; त्यांच्या मागून वशिलेबाजी होताना दिसत होती. त्यांना आपल्या सहकाऱ्याला फोन केला. तो नेहमीच पाटलांचे भूषण ठोकत असे. त्याला अनेकजण सांगत असे. की; बाबा वेळ आला तर कोणी कापल्या करंगळीवर....!!
पण ठेच लागल्याशिवाय शहानपण येत नाही. परिणामी त्याने एका पीएला फोन लावला. ते आपला शब्द टाळत नाहीत. वगैरे-वगैरे म्हणून त्याने "गोष्ट छोटी, डोंगराऐवढी" केली. जरा वेळात दवाखान्यातील पत्रकाराच्या मोबाईलची रिंगटोन वाजली. त्याने फोन उचकला तर त्यावर "पीएचा" नंबर होता. वाटलं. हो रावं याची लै वट आहे. म्हणून तो नंबर डाईल करून मोठ्या आशेने संपर्क केला. त्यांनी दहा-पंधरा सेकंद आवाज एकला आणि म्हणाले अवघ्या २ मिनिटात फोन करतो. पुढे काही बोलायच्या आत फोन कट झाला. रात्र उजडून गेली तरी त्यांच्या घड्याळात दोन मिनिटे झाले नाही. कारण, संगमनेरात घड्याळाची काटे फिरविण्यात ते व्यस्त होते.
आमच्या नादानं कोणाचं भलं झालय,
|
जरा वेळ झाला आता प्रचंड मनस्ताप झाल्याने आम्ही एका जागी स्तब्ध झालो. जेव्हा नंबर लागेल तेव्हा पाहू अशी धारणा मनी बाळगून झुकाझुकी बंद केली. कधी नव्हे इतके फोन करून उगच फालतू डोक्याला संताप करून घेतल्याचे शल्य मनाला बोचले. आम्ही निवांत खुर्चीवर बसलो आणि नकळत डोळा लागला. त्या स्वप्नात देखील कोणाची हुजरेगिरी न करता शांतपणे नंबर लागला होता. मित्राची तपासणी चालु असल्याचा आनंद चेहऱ्यावर झळकत होता. तोच फोनचे घोरणे सुरू झाले आणि झोपच उडून गेली. पाहतो तर काय !! मित्र सकाळी उपासपोटी आला होता. त्याचा सुकलेला चेहरा माझ्या खांद्यावर पडून तो स्तब्ध झाला होता. त्याची मान मी बाजुुला सारून फोन घेतला. तो समोरुन दुसरा पत्रकार बोलत होता. मी कोण्या व्यवस्थापकीय अधिकाऱ्याला फोन केलाय म्हणे. त्यांचे आणि पीएचे बोलणे झाल्याचे त्याने सांगितले. समोरुन मी उत्तर दिले. नको रे बाबा. आता अनलिमिटेड जीओचा देखील बॅलन्स संपलाय. इतके फोन करून विनंती केली असती तर "मोदी साहेबांनी" थेट
सहकार्य केले असते. तेव्हा आता इच्छा नाही.
आता सकाळची संध्याकाळ झाली. ज्याची गाडी आणली होती. त्याला विश्वास पटेना. की; इतका वेळ दवाखान्याला लागतो आहे. त्याने त्वेशाने प्रतिउत्तर दिले. तु जेथे कोठे आहे. तेथे मी येतो. कर नाही त्याला डर कशाला. म्हणून आम्ही ये म्हणालो. तो ६० किलोमिटर अंतर काटून लोणी दवाखाण्यात आला. सकाळी जेथे रुग्णांच्या रांगा लागल्या होत्या. तेथील जागा "निद्रिस्त" होऊन मुले "दवाखान्यात बॅडमिंटन" खेळत होते. दिवस मावळला, कोणाला गाड्या नव्हत्या, तर काही म्हाताऱ्या मानसांच्या दहा बारा वेळा झोपा काढून झाल्या होत्या. शेवटी आम्ही बाहेर गेलो. एका पिशवीत केवढामोठा चहा आणला तो कंटाळलेल्या रुग्णांना पेऊ घातला. अजून किती वेळ लागेल असा अंदाज नक्की नव्हता. परंतु, एक खुनगाठ मनाशी बांधली. आता कुणाचा फोन घ्यायचा नाही. आणि चुकूनही कोण्या राजकीय पुढाऱ्याच्या पीए, कार्यकर्रता, नेता, पुढारी, भाऊ, दादा, उगवते, मावळते नेत्रुत्व अशा व्यक्तींच्या नादाला लागायचे नाही. जे काही करायचे ते स्वत:च्या भरवशावर आणि हिमतीवर करायचे. डॉ. बाबासाहेब म्हणाले होते. जर तुम्हाला स्वत:ची प्रगती आणि संकटातून मुक्त व्हायचे असेल. तर, अंतराळातून कोणी मसिहा येईल आणि तो तुम्हाला वाचवेल किंवा मदत करेल. असा तुमचा गोड गैरसमज असेल तर तो काढून टाका. स्वत:ची लढाई स्वत:ला लढायची आहे. कोणावर
डिपेंड राहु नका.
एक गोष्ट नमुद कराविशी वाटते. जर आपल्याला मदत करायची नसेल तर सरळ नाही म्हणून सांगा. कारण, आपल्या अपेक्षांवर कोणतरी बसलेला असतो. तो ही उपासपोटी. दुसरी गोष्ट म्हणजे आमचा नंबर लागला नाही. याचे दु:ख कदापि नाही. परंतु, दिवसभरात जी ओढाताण झाली. त्याचे प्रचंड दु:ख वाटते. तिसरी गोष्ट म्हणजे; मानसे जोडताना अशी जोडा. जी कितीही व्यस्त असली तरी तुम्हाला प्रायोरिटीने वेळ देऊ शकेल. चौथी गोष्ट म्हणजे, येथे राजकिय द्रुष्टीने कोणाला मांडलेले नाही. केवळ झुलवत ठेवणारे व्यक्ती आणि त्यांच्या अपेक्षेेने सामान्य व्यक्तीची होणारी फरपट. या अनुभवातून मांडली आहे. आम्हाला ठेच लागली. "जेणे आपल्याला ठाव, तेणे दुसऱ्याला सांगावं" याच हेतूने जी ठेच आम्हाला लागली. ती पुढे कोणाला लागू नये. हाच प्रांजळ आणि निर्मळ हेतू.------------------
"शब्दांकन"
सागर शिंदे