"कम्युनिष्ट चळवळ" ही "काँग्रेस व राष्ट्रवादीत" कशी "विलीन" होत गेली"!! डॉ. अजित नवले
वन..! मॅन शो !! |
अकोले (प्रतिनिधी) :-
राज्यात व अकोल्यात "भारतीय कम्युनिष्ट" व "मार्कसवादी" यांचा उदय कसा झाला. याचा शोध घ्यायचा ठरला तर तो अकोल्यातून नाही. तर, "राष्ट्रीय व अंर्तराष्ट्रीय" बाजू तपासाव्या लागतील. कारण, त्याशिवाय अभ्यास संकुचित ठरेल. असे मला वाटते. तेव्हा देशांतील वातावरण पाहता. रशीयाच खूप मोठा प्रभाव होता. सत्ता संतुलना संदर्भात १९६० ते ६२ ला स्थित्यांतरे बदलु लागली होती. "शितयुद्धाचे: वारे वाहत होते. त्यामुळे "सत्ता संतुलनासाठी" "रशीयाला आकर्षण" होते की; "भारतात कोण "क्रांती" करू शकेल". तर भारतात अशी कोणी "फोर्स" आहे. हे चिनचे 'अकलन' सुरू होते. यात मोठा "संघर्ष" निर्माण होत गेला. हाच प्रश्न भारतात कडव्या पद्धतीने लढला गेला आणि याच "मतभेदातून" कम्युनिष्टांचे "दोन गट" तयार झाले. एक "भारतीय कम्युनिष्ट" आणि दुसरा "मार्कवादी कम्युनिष्ट". सीपीआयला वाटत होते. या देशात "क्रांतीकारकांची सत्ता" आणायची असेल तर "भांडवली व जमिनदार चेहरा" असणारा "काँग्रेस पक्ष" आपण जवळ केला पाहिजे. तोच "सत्ता संतुलन" करु शकतो. तर दुसरीकडे "सीपीएम" ला वाटत होते की, जरी भारतात "सरंजामशाहीचे निर्मुलन" होऊन "औद्योगिक क्रांती" झाली नसली तरी. 'काँग्रेस' ते काम 'चोखपणे" पार पाडू शकणार नाही. कारण, "जमिनदार व भांडवलदार" हे "डॉमिनेट फेसमध्ये" आहेत. ते कष्टकऱ्यांची बाजू घेणार नाहीत. व "सत्ता संतुलन" करतील असे वाटत नाही. असे "मार्क्सवाद्यांना" वाटत होते. परिणामी राज्यात "कम्युनिष्ट" पक्षात खूप मोठी "उग्र व सौम्य" अशी "वैचारिक दरी" निर्माण झाली.
एकाच "निशानात" दोन छेद ! |
दरम्यानच्या काळात अकोल्यात "मार्क्सवाद" ऊभा राहिला नव्हात. परंतु, "बुवासाहेब नवले" यांच्या रुपाने "काँग्रेस"प्रणित "भारतीय कम्युनिष्ट पक्ष" (सीपीआय) रुजत गेले. काँग्रेसची धेय्यधोरणे नकळत यांच्या वैचारिक चौकटीत बसू लागली. "सत्ता संतुलन" करताना "सत्तेत वाटा" मिळण्यासाठी "सीपीआयच्या वाटाघाटी" होऊ लागल्या. तर दुसरीकडे काँग्रेस ही "भांडवलदार व जमिनदारांची" बाजू घेईल. म्हणून क्रांतीसाठी त्यांच्यावर अवलंबून न राहता, आपण "स्वत: लढा करून" पुढे जावे यावर मार्क्सवादी (सीपीएम) ठाम होते.
पण, नको ते होत गेले. "भारतीय कम्युनिष्ट" काँग्रसमध्ये "लाचार" होत गेली. सत्तेत वाटा म्हणून "तडजोडीचे राजकारण" राज्यपातळीहुन सुरु झाले. तेच अकोल्यात पहावयास मिळाले. एकीकडे सामाजिक प्रश्न वाढत असताना सीपीआय काँग्रसमध्ये राहुन २ झेडपी, २ पंचायत समित्या, २ कारखाना, २ कॉलेज अशा प्रतिनिधित्वाच्या जागा मागून काँग्रेसच्या पावलावर पाऊल टाकून आपले अस्तित नामशेष करत चालली होती. त्यामुळे त्या चळवळीचे मुल्य आता सुधारतील असे चिन्ह दुरदुर कोठे दिसत नव्हती. तेव्हा "मार्क्सवादी" ओरडून-ओरडून सांगत होते. "कम्युनिष्ट काँग्रेसमय होईल. पण, काँग्रेस कम्युनिष्ट होऊ शकत नाही". आणि अगदी तेच झाले. तेव्हा कडूपाटील, अण्णासाहेब शिंदे, भाऊसाहेब थोरात यांच्यासह अगदी पद्मश्री बाळासाहेब विखे देखील कम्युनिष्टात होते. त्यांनी एक धोरण अवलंबविले की; जर काँग्रेसबरोबरच राहुन काम करायचे आहे. तर, काँग्रेसमध्येच जाऊन काम केलेले काय वाईट आहे. आणि याच संधीचा फायदा घेत यशवंतराव चव्हाण यांनी ही सगळी मंडळी काँग्रेसमध्ये विलीन केली आणि भारतीय कम्युनिष्ट चळवळीला नगर जिल्ह्यातून उतरती कळा लागली.
धुरंधर राजकारणी |
एकेकाळी नगर जिल्ह्याला "कम्युनिष्टांचे केरळ" संबोधले जायचे. कारण, तो सीपीआयचा "बालेकिल्ला" होता. हे जिल्ह्याच्या राजकारणात कम्युनिष्ट "व्यक्तीपरत्वे" काँग्रेसला विलीन झालेली पहायला मिळाले. परंतु अकोले तालुक्यात तसे वेगळे चित्र होते. कारण, येथे "संघटनात्मक कार्यप्रणाली" होती. अकोल्यात "विडी कामगार युनियन" व "किसानसभा" या वरिष्ठ पातळीवर एकत्र काम करत होते. त्यामुळे इथल्या नेत्यांनी अशी शक्कल लढविली की ! काँग्रेसमध्ये विलीन व्हायचे नाही. मात्र, त्यांच्या सत्तेत वाटा घ्यायचा. त्यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करायचे. त्यांना विरोध करायचा नाही. म्हणजे "एॅन्टी काँग्रेसची" भुमिका पार पडायची.
"कम्युनिष्ट पक्ष चालवायचा", "संघटना ठेवायच्या" आणि वाटाघाटी करायच्या. त्यामुळे "आत्मा" निघून गेला आणि चळवळ "नामधारी" शिल्लक राहिली. त्यानंतर "मधुकर नवले, शांताराम वाळुंज, गिरजाजी जाधव कारभारी उगले" यांनी "तडजोडी" सुरू केल्या. मात्र, तेव्हा "सीपीएम" सांगत होते तेच झाले. "इतिहासाला पुन्हा जाग" आली. याच धोरणामुळे "सीपीआयची मुल्य" जिवंत राहिली. मात्र, चळवळीची "पाळंमुळं" ढिल्ली आणि खिळखिळी झाली. पुढे हेच कम्युनिष्ट सत्तेच्या माध्यमातून शांत होत गेले. पिचडांच्या सत्तेत कारखाने, साेसायट्या, सरकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यात सहभाग मिळू लागला. त्यामुळे प्रस्तापितांच्या विरोधात बंड पुकारण्याची ताकद येथे कोणात निर्माण झाली नाही. कारण; "तडजोड आली तेथे "कडवा संघर्ष" उभा रहात नाही". त्यामुळे येथून "संघर्ष" नावाचा शब्दच हद्दपार झाला. मग संघर्ष करायचा ! पण पिचडांच्या अस्मितेला आणि स्थानिक राजकारणाला कोठे गालबोट लागणार नाही. याची कटाक्षाने काळजी घ्यायची. असली बोचरी चळवळ जिवंत राहिली.
क्रमश:
-- सागर शशिकांत शिंदे
(8888782010)
====================
या सदराचा क्रमश: भाग ३ पुढील अंकात प्रसिद्ध केला जाईल. भा. "कम्युनिष्ट चळवळ लाचार झाली की पिचडांनी मोडीत काढली ?. वाचत रहा "रोखठोक सार्वभौम" क्रमश:
====================
"सार्वभाैम संपादक"