"जड" पे "वार" करे तो "बडे" से "बडे" पेढ़ "गिर" पडते है ! पेशवा "बाजीराव पॅटर्न" म्हणून..! शरद पवारांवर गुन्हा दाखल !!!

टेन्शन सोडा उत्तर शोधा !!

अकोले (प्रतिनिधी) :-
                    गेल्या काही दिवसांपुर्वी "पेशवाई"वर एक "पिक्चर" आला होता. त्याचे नाव होते. "बाजीराव-मस्तानी". जेव्हा "अखंड" भारतावर "मराठा" साम्राज्याचा "ध्वज" फडकवायचा होता. तेव्हा एक "पेशवा" पुढे येतो तो म्हणजे "बाजीराव बल्लाळ". जेव्हा "सेनापती" म्हणून  निवड होण्यास दरबारात कोल्हापुरच्या राजासमोर त्याची "परीक्षा" घेण्यात येते.  तेव्हा, एका मातीच्या ढिगाऱ्यात एक "मयुरपंख" खोवला जातो. आणि त्याला सांगितले जाते. हा "मयुरपंख" खाली न पडता व  "माती न विस्कटता" तुला त्याचे "दोन तुकडे" करायचे आहे. तेव्हा भर दरबारात हा "पेशवा" ढिगाऱ्यात बाण मारुन "मयुरपंखाचे दोन तुकडे करतो", तेव्हा त्याला विचारले जाते. मयुरपंखाचे दोन तुकडे करायला तू शेंड्याकडे का नाही मारले ? तेव्हा तो हे उत्तर देतो. की, "जड पे वार करे ! तो बडे से बडे पेढ़ गिर जाते है" ! म्हणजे, "फाद्यांवर धाव" घालुन झाड कायमचे "कोलमडत" नाही. तर, "मुळावरच घाव" घालुन त्याचे "अस्तित्व" संपविले पाहिजे. अशीच काहीशी पेशवाई रणनिती "भाजपने" आखल्याचे आरोप होऊ लागले आहे. कारण, राष्ट्रवादीचा "वटव्रुक्ष" शरद पवार आहेत. त्यांच्यावरच घाव घातला तर सगळा "राष्ट्रवादीचा विस्तीर्ण वटव्रुक्ष" कोलमडून पडेल. त्यामुळे हा गुन्हा  त्यातलाच एक भाग असल्याचे बोलले जात आहे. मात्र, हा "घाव घालणारा" नेमका "बाजीराव" कोण ? याचा शोध घेणे गरजेचे आहे.

मुळावर घाव घातला की, सगळं कोलमडते- पेशवा

        काँग्रेस संपविण्यासाठी "आरएसएसला" कित्तेक वर्षे "प्लॅनिंग" करावे लागले. तेव्हाकोठे त्याचा "सुपडा साफ" झाला. हे वास्तव आहे. आज बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, प्रुथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे, विश्वजित कदम, नाना पटोले हे नेते "सरकार विरोधात" आक्रमक बोलायला तयार नाहीत. "काँग्रेसच्या खोडावर" धाव घालण्यासाठी भाजपने अमेठीतून स्म्रुती इराणी यांना पुढे केले आणि राहुल गांधी यांचा पराभव करीत थेट "जड पे वार" केला. गांधी पडताच देशात "काँग्रेसच्या  सगळ्या फांद्या" भाजपच्या "बाजीरावांनी डहाळून टाकल्या" आहेत. महाराष्ट्रात "वंचित" आघाडीचे "सैन्य" घेत. चंद्रपुर वगळता सगळी काँग्रेस "नेस्तनाबुत" केली. हा "पाडाव" जिव्हारी लागल्याने पुन्हा साम्राज्य उभे करण्याचे बळ त्यांच्यात राहिले नाही.

अब, सब हमारे मुठ्ठीमे है !!

                 आता ज्या भाजपला "राष्ट्रीय" काँग्रेसची "भिती" होती. त्यातला "जीव" संपला होता. मात्र, महाराष्ट्रात अजूनही रयतेच्या हितासाठी, "जाणता राजा" वयाच्या ७८ व्या वर्षी स्वत: मैदानात उतरून लढत आहे. त्याला पाडण्यासाठी चाळीशीतले ४० तरुण दिवस रात्र एक करीत आहेत. इतकेच काय ! तर पाच खासदार असलेल्या एका नेत्याला पराभूत करण्यासाठी ३०५ खासदार असणारे मोदी, शहा व फडणवीस जंग, जंग पछाडताना दिसत आहेत. मात्र, वेळ आली तर "मरणाला सामोरे" जाण्याची परंपरा "छत्रपती शिवरायांनी" या मातीत रुजविली आहे. कारण, जेव्हा प्रतापगडाच्या पायथ्याशी खान चालुन आला होता. तेव्हा स्वत: "बलदंड बाहु" असणाऱ्या दुष्मनाला राजे सामोरे गेले होते आणि "खानाचा कोथळा" बाहेर काढला होता. असे इतिहास सांगतो. "साडेतीनशे वर्षापुर्वी राजे छत्रपती "दिल्लीला झुकवत" होते. पण, दुर्दैवाने आजचा "वर्तमान" सांगतो. की, साडेतीनशे वर्षानंतर त्यांचे "वंशज" दिल्लीच्या तख्तासमोर "झुकायला" जात असल्याचे बोलले जात आहे. परंतु, सगळे झुकले तरी, "जाणता राजा" या पेशवाईपुढे झुकेल असे वाटत नाही.

साताऱ्यात गोंधळ दिल्लीत मुजरा !!

         या महाराष्ट्रातील रयतेच्या हितासाठी पवार साहेब मैदानात उतरले आणि अचानक ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यावर "आरोप" होतो. अर्थात यांनी पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या "फांद्यांवर घाव" घातला. तो समोरुन नाही. तर, "इडी"च्या माध्यमातून. आणि राष्ट्रवादीच्या अगदी "पानगळ" झालेल्या फांद्या देखील भाजपने ओढून नेल्या. त्यात मधुकर पिचड, सचिन आहिर, संदिप नाईक, गणेश नाईक, वैभव पिचड, चित्रा वाघ, रणजितसिंह मोहिते पाटील, जयदत्त क्षिरसागर, शिवेंद्रराजे भोसले, रश्मी बागल, दिलीप सोपल, पांडुरंग बरोरा, उदयनराजे भोसले, भास्कर जाधव अशा अनेक फांद्या "ओरंबडून" नेल्या. तरी "राष्ट्रवादीचा वटव्रुक्ष" उन्मळून पडला नाही. ईडीच्या भितीने मुळे काटली तरी, अजित पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, डॉ. अमोल कोल्हे, अमोल मिटकरी, सुनिल तटकरे, जयंत पाटील ही लोकं नव्याने "राष्ट्रवादीचा वटव्रुक्ष" फुलवत आहेत. हे "डोळ्यात सलायचे" कारण असे की, साताऱ्यात "राजेंची हवा" आहे असे म्हटले जायचे. पण, पवार साहेबांची "जाणता राजा" म्हणून किती "हवा" आहे. हे जनतेने दाखवून दिले. फुकट नाही उदयनराजे यांच्या "डोळ्यातून आश्रु" खाली कोसळले.!

काय झालं ?, हातीची घडी तोंडावर बोट !!

             काँग्रेसचे "नमते धोरण" आणि राष्ट्रवादीकडे वाढता "जनाधार" लक्षात घेता. भाजपने पुन्हा "बाजीराव पॅटर्न" वापरुन थेट "जड पे वार" केला आहे. राष्ट्रवादीच्या २० पेक्षा जास्त जणांना "ईडीची भिती" दाखवून त्यांना "शुद्धीपत्र" बहाल केले. तरी राष्ट्रवादीचा "जनाधार" कमी होईना. म्हणून त्यांनी थेट "शरद पवार" म्हणजेच राष्ट्रवादीच्या "मुळावर घाव" घातल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे तरी हा पक्ष नमेल. अशी धारणा त्यांची आहे. कारण, यापुर्वी त्यांनी पी. चिदंबरम यांच्यावर शस्र चालविले, आणि लोकसभेला "लाव रे तो व्हिडिओ" म्हणून जनतेच्या मनावर "राज" करणाऱ्या ठाकरेंच्या मागे "ईडीचा भुंगा" लावून दिला. या दोघांच्या बोलत्या बंद झाल्या. झालं "वंचित आघाडी" तर "बी टिम" म्हणून पहिलेच "जगजाहिर" असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, आता उरले होते. फक्त राष्ट्रवादी. म्हणून त्यांची देखील बोलती बंद करण्यासाठी हा "खटाटोप" केल्याचे "आरोप" भाजपवर केले जात आहे. मात्र, काही झाले तरी "राष्ट्रवादीचा" हा "झांजावात" पुढे चालुच राहणार आहे. असे पवार साहेबांनी सागितले आहे.


काय आहे प्रकरण ?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कोणतेही तारण न घेता जवळीक असणाऱ्या संस्था व व्यक्तींना कर्ज वाटप केले होते. त्यामुळे बँकेला तब्बल १० हजार कोटींचे नुकसान झाले होते. या प्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी २२ मे २०१४ रोजी याचिका दाखल केली होती. याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती. चौकशी समितीने अहवाल सादर केल्यानंतर अखेर कोर्टाने याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर आता तब्बल ३१ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले होते. अजित पवार यांच्यासह विजयसिंह मोहिते पाटील आणि शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केल्याने शरद पवार यांचे देखील नाव त्यात आले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, कर्ज देणारे हे पवार यांच्या संपर्कातील व्यक्ती आहेत.

काय म्हणाले पवार?

 राज्यातील कोणत्याही बँकेत मी कधीच संचालक नव्हतो. तसेच निर्णय प्रक्रियेचे कोणतेही अधिकार माझ्याकडे नव्हते. त्यामुळे याप्रकरणात नाव येण्याचा संबंध नाही. माझ्यावर गुन्हा दाखल नाही. असे संस्थेने म्हटले आहे. तसेच, ईडीकडून मला या विषयान्वये कोणतीही नोटीस दिलेली नाही. सुप्रिम कोर्टाने दिलेल्या आदेशात किंवा तक्रारीत माझे नाव नव्हते. जर गुन्हा नोंद झाला असेल तर तो ईडीने केला की राज्य सरकारचा यात हस्तक्षेप आहे. हे पाहावे लागेल. न्यायालयावर माझा विश्वास आहे. परंतु, कोणताही संबंध नसताना गुन्हा दाखल करणाऱ्यांना मी धन्यवाद देतो.

राज्य सहकारी बँकेचे झालेले नुकसान !!!

* संचालक मंडळाने नाबार्डच्या सूचनांचे उल्लंघन केलं
* नऊ साखर कारखान्यांना ३३१ कोटींचा कर्जपुरवठा 
* गिरणा, सिंदखेडा कारखाना, सूतगिरण्यांना ६०कोटींचे कर्ज

* केन अ‍ॅग्रो इंडियाची थकहमी रद्द झाल्यानं ११९ कोटींचा तोटा

* २४ साखर कारखान्यांना विनातारण कर्ज, २२५कोटींची थकबाकी

* २२ कारखान्यांकडील १९५ कोटी रूपयांचे कर्ज असुरक्षित

* लघुउद्योगांना दिलेल्या कर्जामुळे सव्वा तीन कोटींचे नुकसान

* कर्जवसुलीसाठी मालमत्ता विक्री करूनही ४७८कोटींची थकबाकी

* खासगी पद्धतीने मालमत्ता विक्री, ३७ कोटींचे नुकसान

* ८ थकबाकीदारांच्या मालमत्ता विक्रीत ६.१२ कोटींचा तोटा

===============

             "सार्वभाैम संपादक"
                 

    - सागर शशिकांत शिंदे   

Rajratna.sagar@gmail.com
                  -------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७० दिवसात १२५ लेखांचे ७ लाख वाचक)