"राष्ट्रवादीच्या" सभेत, "पडद्याआडचे राजकारण"; "तिकीटासाठी" एकी, बाकी सगळी "नौटंकी"

हात जोडतो, आता तरी एक व्हा !

अकोले (प्रतिनिधी) :-
                  काल माजी "उपमुख्यमंत्री" अजित पवार यांच्या प्रतिउत्तराची सभा काही औरच संदेश देऊन गेली. राष्ट्रवादीकडून आलेला "एकच वाघ" तालुक्यात एटीत आला आणि छाप पाडून गेला. पण, एक बाकी नक्की. जी प्रस्तापितांकडून झालेली मुख्यमंत्र्यांची सभा आणि त्याला तोडीस-तोड देणारी  विस्तापितांची सभा. यात जमीन आसमानचा फरक होता. यात तिळमात्र शंका नाही. ती "गर्दी" आणि ही "दर्दी" यातील उत्साह काही क्षणात तुलना करून गेला. पण, "उमेदवारीची घुसमट" काही वेगळाच संदेश देऊन गेली. त्यामुळे "रोखठोक सार्वभौमच्या" सीसीटिव्हीत जे भरले. त्याचे "विश्लेषण" आम्ही करु शकलो नाही. तर आम्ही "जातीवंत पत्रकार" कसले. म्हणून दोन्ही सभांचे "प्लस - मायनस" आपण वाचकांसमोर मांडले आहे. याला एक ना दोन तब्बल "दिड लाख" लोकांनी आपल्या मेंदुत उतरविले आहे.(एकूण वाचक ६ लाख ७० हजार) यातून कोणाला मतांचा फायदा होईल ना होईल देव जाणे. पण, "मतदार राजा" जागा होऊन "योग्य उमेदवार" निवडेल हेच आमचे "निर्पेक्ष फलित" राहिल. पण, या सगळ्यात राष्ट्रवादीने उमेदवार निच्छित न केल्यामुळे सेनापतीशिवाय बहुतांशी सैन्य सैरभैर झाल्याचे दिसून आले. तर, मी नाही तो करेल असे म्हणून जबाबदाऱ्या झटकून पडद्याआडचे राजकारण पहायला मिळाले. तरीसुद्धा सभा सक्ससे झाली. हे नाकारता येणार नाही.

पाच उमेदवार, तर भाऊ आमदार..!

               वैभव पिचड यांच्या सभेला प्रतिउत्तर व राष्ट्रवादीच्या दिशाहीन कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी दि.१७ सप्टेेंबर रोजी सभेचे आयोजन केले होते. मात्र, डॉ. कोल्हे यांच्या "शुटिंगचा वेळ रिझर्व" असल्यामुळे ती तारिख रद्द होऊन २३ ठरविण्यात आली. जसे पिचडांच्या सभेला १७ विघ्ने आली. तसे राष्ट्रवादीसाठी सगळे काही अलबेले होते असे म्हणाल तर तो निव्वळ मुर्खपणा ठरेल.  या सभेचा खर्च कोणी करायचा, बॅनर कोणी लावायचे, साहेबांच्या गाडीत कोणी यायचे, स्वागत कोणी करायचे, स्टेजवर कोणी बसायचे, इतकेच काय, खर्चाची कॉन्ट्री काढून ती पुन्हा वाटून कशी द्यायची इतकेच नाही. हजारो प्रश्न पडद्याआड शिजताना दिसले. आणि यातूनच सुरू झाले. "पडद्याआडचे राजकारण".
           सगळ्यात मोठी चर्चा तीन व्यक्तींची होती. एक म्हणजे डॉ. अमोल कोल्हे त्यांचे भाषण एकण्यापेक्षा त्यांना छत्रपती शिवराय आणि छावा संभाजी राजे यांच्या अभिनयाचे प्रतिबिंब म्हणून जनता पाहण्यासाठी उत्सुक होती. दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या महाराष्ट्राला ओरडून सांगणारे धनंजय मुढे. कि, शरद पवार साहेबांनी पिचड पिता-पुत्रांना काय कमी केले. ते अकोल्यात काय बोलतील. यासाठी लोक उताविळ होते. सर सर्वात महत्वाचे म्हणजे, पिचड साहेबांचे वजिर गायकर व अडिच पावली वाकचौरे  यांच्यावर दादा काेणत्या शब्दात संहार करतील. त्यामुळे सभेला तालुक्यातून हवसे, नवसे, गवसे अगदी अवर्जुन उपस्थित होते. पण, पहिल्याच दिवशी अकोलेकरांचा भ्रमनिराश झाला आणि फक्त एकट्या दादांनी सह्याद्रीचा किल्ला लढविला.

जागा देत नाही कोण, मिळवाव्या लागतात

     आता झाले असे की, दादा लेंडीत (म.फु चौक) आले आणि खुल्या गाडीत दादा आणि अशोक भांगरे यांनी उभे राहण्यासाठी जागा निच्छित केल्या. तेथे डॉ. किरण लहामटे यांची घुसमट पहिल्यांदा जनतेला पहायला मिळाली. दादा आणि लहामटे यांच्या घोषणांनी जोर धरला तेव्हा कोठे चाळत-चाळत डॉ. लहामटेंचा चेहरा पुढे आला. ती रॉली स्टेजवर येऊन ठेपली. स्टेजवर नेते कमी इतक्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. अर्थात ती सहाजिकच होती. कारण, पिचड साहेबांनी ठराविक चेहरे वगळता कोणाला सक्षमपणे उभे केले नाही. त्यामुळे ज्यांनी साहेबांच्या गाडीची दार उघडली, पाणी द्यायचे, बुट उचलायचे, गाडीपुढे पळायचे, नको-नको ती उठाठेव केली. ते तरुण नेते दादांच्या व्यसपिठाचे नेत्रुत्व करताना दिसले. विशेषत: ज्या उभी हयात राष्ट्रवादीचे पटकुरे गळ्यात टांगले होते. ते वयस्कर वंचित नेते जास्तच खार खाऊन स्टेजवर दिसले. अखेर पोलीस प्रशासनाला हस्तक्षेप करून स्टेज खाली करावे लागले. तर तालुक्यातील काँग्रेसचे नेते दादापाटील वाकचौरे यांनाही स्टेजवर स्थान मिळाले नाही. याचेही शल्य काँग्रेस कार्यकर्त्यांनी बोलून दाखविले.                     
अर्थात जेव्हा अशोक भांगरे दादांच्या जवळ बसले होते. तेव्हा डॉ. लहामटे यांना पहिल्या रांगेत बसायला जागा नव्हती. मात्र, काही मिनिटात भांगरे स्टेजच्या पश्चिम बाजुला गेले असता डॉ. लहामटे यांनी स्वत:ची शिट मजबूत केली आणि ते जागेवर ठाम राहिले. दरम्यान भांगरे पुन्हा जागेवर आले असता, त्यांना पहिल्या रांगेत कोठेही जागा मिळाली नाही. ते  सौ. सुनिता ताईंच्या बाजुला बसू शकले असते. मात्र, त्यांनी ताईंच्या जागेला कोणतीही दाटी निर्माण केली नाही. तेच काय ?  अमित देखील पहिल्या रांगेत पहिल्याच जागेवर होते. पण, भांगरे साहेबांनी दोघांच्या सिटला अडचण होईल असे काही न करता. खालून एक खुर्ची स्टेजवर पाचारण करून स्वत: मोठेपणातून बाजुला राहिले. तर याच काळात डॉ. लहामटे यांची सिट देखील संपुष्टात आली होती. त्यांनाही खालून खुर्ची बोलविण्यात आली. आता खऱ्या अर्थाने राष्ट्रनादीच्या किल्ल्याला दोन बाजुंना दोन शिलेदार उभे करण्यात पवारांना यश आले होेते. मात्र, काही काळात डॉ. लहामटे यांनी पुन्हा आपापल्या जागेवर पदग्रहन केले. अशा अनेक जुगलबंद्या स्टेजवर पहावयास मिळाल्या. यामागे देखील "पडद्याआडचे राजकारण" सुरूच होतो. असे बोलले जात आहे.

दोन बाजुंनी दोन शिलेदार

                आता मोजक्या भाषणांनी जनतेच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण केले. जेव्हा वैभव पिचड यानी भाजपात प्रवेश केला. तेव्हा  संपत नाईकवाडी सरांनी भाषण करून अनेकांच्या टाळ्या मिळविल्या होत्या. ते म्हणाले होते की, पिचड साहेबांना आम्हीच भाजपात जायला उद्युक्त केले होते. कारण, पाच वर्षे विकास रखडला होता. तर हेच सर राष्ट्रवादीच्या स्टेजवर गरजताना दिसले. त्यांनी दादांना विनंतीवजा शब्दांनी जाणिव करून दिली की, दादा तुम्ही ठराविक लोकांना नको तितकी किंम्मत देऊन मोठे केले. आणि त्यांनीच तुमच्या पाठीत खंजिर खुपसला. त्यांच्या या वाक्याने दादांना नक्कीच वेदना झाल्याचे हावभाव त्यांच्या चेहऱ्याने परावर्तीत केले. दुसरीकडे विनय सावंत यांच्यासारखे पुरोगामी विचारसारणीचे नेते जनतेच्या मनावर छाप पाडून गेले.
           यात अदखलपात्र. पण, चर्चेचा विषय ठरला तो. अमित भांगरे यांचा. खरे पाहता त्यांच्या वयानुरूप त्यांनी जे भाषण केले. त्याला नक्कीच तोड नाही. जे मुद्दे मांडले. ते अगदी विचार करायला लावणारे होते. मात्र, एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, त्यांना जनतेचा कौल मिळाला नाही. त्यांनी जी दादांच्या पाया पडण्याची नौटंकी केली. त्यावर अनेकांनी टिकच केली. विशेष म्हणजे मी शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीचे काम करील हा शब्द म्हणजे मोठा विरोधाभास झाला. कारण, जे शब्द पाळतात ते म्हणजे अजित दादा, ज्यांनी नऊ वेळा पक्ष बदलले ते अशोक भांगरे आणि  भाजपतून नुकतेच राष्ट्रवादीत आलेले अमित भांगरे. आणि त्यांनी आवेशाने दिलेला इतका मोठा शब्द. हे सर्व अनाकलनिय आहे. तरी दादांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. भांगरे यांनी शिक्षण हा विषय घेऊन वैभव पिचड यांच्यावर आरोप केले. मात्र, वैचारिक द्रुष्टीकोण लक्षात घेता. शिक्षण हा मुद्दा राजकिय हेतू होऊ शकत नाही. मोदी, वसंत दादा, तावडे, यशवंतराव, फुलंदेवी, आठवले यांच्यासह अनेकांचे शिक्षण तपासले तर ते कमीच आहे. मात्र, कर्तुत्व उतुंग आहे. तो अधिकार त्यांना संविधानाने दिला आहे. म्हणून शिक्षण हा मुद्दा होऊ शकत नाही. तर, विकासावर धारेवर धरले असते. तर तो विषय जनतेच्या जिव्हाळ्याचा ठरला असता. या दरम्यान अबोल जनतेच्या तोंडातून एक गोष्ट बाहेर पडली की, खरोखर हा मुलगा कायम राष्ट्रवादीच्या वाटेवर राहिला. तर कमी वयात आमदार होण्याचे भाग्य त्याच्या नशिबी पडेल. आता या वास्तव चर्चेला कोण किती गांभिर्याने घेते. हे महत्वाचे आहे.
             
 अशोक भांगरे यांचे भाषण अगदी तळमळीने  झाले. त्यांची पत्नी, मलगा व स्वत: साहेब म्हणाले माझ्यावर नेहमी पिचडांना सहाय्य करण्याचे आरोप झाले. मात्र, त्यावर कोणी पुरावे देऊ शकले नाही.  केवळ "वाल्गनेपोटी" आम्ही बदनाम झालो. त्यामुळे या वर्षी मी निवडणुक लढविणार नाही. मला फक्त पिचडांचा पराभव पहायचा आहे. आणि खरोखर असे झाले तर सौ. सुनिता भांगरे ताई म्हणाल्या की, या वर्षीचा इतिहास सुवर्णाक्षरांनी लिहीला जावा असा घडेल. या वाक्याला मजबुती मिळाली. पण, भांगरे साहेब लढणार नाहीत. असे ते म्हणाले. पण, त्यांच्या व्यतिरिक्त कुटुंबातील कोणीही पुढे येऊ शकते. ही पाचर फक्त डॉ. लहामटेंच्या उमेदवारीसाठी उडवी येऊ शकते. अर्थात डॉ. लहामटेंनी जी गावोगावी पेरणी केली आहे. त्याची फळे कालच्या सभेत पहायला मिळाली. ते जनतेच्या मनातील उमेदवार आहेत. कोणीच नाकारु शकत नाही. अमित भांगरेंच्या भाषणाला फटाक्यांची आतिषबाजी झाली. तर लहामटेंच्या भाषणाला टाळ्या वाजल्या. वात पेटविणारा एक होता. तर टाळ्याचा कडकडाट करणारे हजारो होते. त्यामुळे डॉ. लहामटे भलेही आर्थिक बाबीत सक्षम नसतील. मात्र, जनतेच्या मनात ते भक्कम असल्याचे दिसून आले.

पुन्हा भरगोस आश्वासने

                काल सगळी जनता दादांच्या भाषणाला अतूर झाली होती. आचारसंहिता सुरू असताना त्यांनी सातबारा कोरा करू, एमआयडीसी आणू, पर्यटण विकास, धरणे, बंधारे, शेतमालास भाव, असे अनेक प्रश्न सोडविण्याची अश्वासने दिली. मात्र, वर्षानुवर्षे दादांनी जनतेकडे नाही. तर ठराविक नेत्यांचे बाहु बळकट केले. ४० वर्षापासून शेतकरी आत्महत्या करीत आलाय. तेव्हा हमीभाव, कर्जमाफी, रोजगार, पाणीवाटप, पर्यटन हे प्रश्न नव्हते का ? की पिचड साहेब, गायकर साहेब आणि वाकचौरे साहेब यांच्या पलिकडे तालुकाच नव्हता ? असा अद्रुश्य प्रश्न डॉ. लहामटे व नाईकवाडी सरांनी विचारला होता. याला उत्तर देताना दादांच्या आखडलेल्या जीभेची लगाम सुटला आणि ते थेट धोतराकडे घुसले. नशिब..! त्यांनी धरणे भरायचा विषय काढला नाही. नाहीतर, पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर बोंबाबोंब झाली असती. अर्थात त्यांनी सगळे भाषण अगदी तारतम्य बाळगून केले. मात्र, गायकरांवर बोला म्हणताच त्यांच्याकडून अनावधानाने तो शब्दप्रयोग झाला. त्यांनी कोणाचे नाव घेतले नाही. मात्र, सुताहुन स्वर्ग गाठणार नाही. ते पत्रकार कसले. पण, दुसरी बाजू पाहता. दादा म्हणाले, पिचडांचे हात बळकट करण्यासाठी जिल्हा बँक ताब्यात दिली. त्या विश्वासाला पात्र ठरत १९९५ ची निवडणूक वगळता. पिचडांना आमदार करण्यात गायकर कोठे कमी पडले नाही.
        त्यामुळे त्यांच्या धोतरापर्यंत जाण्यापुर्वी त्यांच्या व्यक्तीनिष्ठेचे देखील कौतुक केले पाहिजे. आज पिचड बाहेर पडले म्हणून ते टिकेचे धनी झाले आहेत. गेली ४० वर्षे हे कोणी पोसले ? याचे उत्तर न दिलेलेच बरे.  आज आश्वासने देऊन साहेब म्हणाले, जर वरिल कामे केली नाही. तर "पवारांची औलाद" नाही. !!! जनतेने टाळ्या वाजविल्या, शिट्ट्या मारल्या. पण, आज तालुक्याची काय बिकट परिस्थिती आहे. ८० हजार लोक रोजगारासाठी ये जा करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तेव्हा मतदारांहो, व्यक्तीनिष्ठ किंवा पक्षनिष्ठ राजकारण करू नका. तर विकासकेंद्रीत समाजकारण करा. अशी साद जाणकारांनी मतदारांना दिली आहे. सभेचा समोरोप झाला. त्यानंतर अजित पवार ज्यांनी संगमनेरात भाजप मुख्यमंत्र्यांच्या सभेचे नियोजन केले त्या मालपाणी कुटूंबास भेटून पुढे रवाणा झाले.

           सागर शिंदे - 

 ===============

             "सार्वभाैम संपादक"
                 

    - सागर शशिकांत शिंदे   

Rajratna.sagar@gmail.com
                  -------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७० दिवसात १२५ लेखांचे ६ लाख ७० हजार वाचक)