मी निवडणुक "लढविणार" नाही. पण, मला "पिचडांचा पराभव" हवा आहे.- भांगरे
अकोले (प्रतिनिधी) :-
मुख्यमंत्र्यांच्या सभेचे रोखठोक सार्वभौमने काय हवे होते आणि काय नको होते. याचे सविस्तर विश्लेषण केले होते. तो लेख वाचकाच्या पसंतीस उतरला होता. त्यामुळे आपल्या आग्रहखातर राष्ट्रवादीच्या सभेचे देखील विश्लेषण करण्यात येणार आहे. नक्की वाचा. पुढील भागात. "रोखठोक सार्वभौम" आजच्या सभेत कोणी काय भाषणे केली. यावर थोडक्यात महत्वाच्या व्यक्तींच्या भाषणातील सारंश मांडला आहे.
अशोक भांगरे म्हणाले की, दादा माझा पक्षप्रवेश हा नेहमी पिचडांच्या विरोधात राहिला आहे. तिकीटासाठी मला नेहमी संघर्ष करावा लागला. पुन्हा पिचडांनी भाजपत प्रवेश केला. मग प्रश्न पडला. आता पुढे काय.? पर्याय राहिला नाही. मग आम्ही राष्ट्रवादीत आलो. पण, मी शब्द देतो. मी उमेदवारी करणार नाही. पण, मला पिचडांचा पराभव करायचा आहे. मी काय कमवलं राजकारणातून ? जमिनी विकल्या, संघर्ष केला. माझ्यावर आरोप झाले. त्याचे पुरावे द्या. मी राजकारणातून सन्यस घेईल. निवडणुक आली की एखादे काम करायचे आणि त्याचा बाऊ करुन जनतेची फसवणूक करायची असेच राजकारण, पिचडांनी केले आहे. कारखाना, दुधसंघ यात अनेक घोटाळे करून ठेवले आहे. आदिवासी समाज्याच्या वतीने मी आभार मानतो. की नऊ टक्के बजेट पवार साहेबांनी दिले. तेव्हा आमचा विकास झाला. पण, पिचडांनी अकोले ते नाशिक शेकडो एकर जमिनी घेतल्या, "सुगाव" ते मुंबई बंगले बांधले, खोटो आदिवासी दाखला, गोर-गरिब आदिवासी समाजाच्या जमिनी लुटल्या, १०० एकर जमिनी यांनी नावे करून घेतल्या. जो उमेदवार पवार साहेब देणार आहेत. त्याला निवडून दादांच्या हाती द्यायचे आहे. असे ते म्हणाले.
डॉ. किरण लहामटे म्हणाले, दादांनी मला शब्द दिला होता की, तुमच्या प्रवेशासाठी खास अकोले तालुक्यात येईल. अकोल्यात नद्या, शिखरे, धर्म, परंपरा हे सर्व तालुक्यात आहे. पण, उन्हाळ्यात टँकरने पाणी आणावे लागते. पण, टँकरने पाणी आणले की त्यातून पैस मिळतो. ही त्यांची दुरद्रुष्टी असावी. साहेबांचा मुलगा दुर्दैवाने गेल्यानंतर वाटले होते. तालुक्यात मोठा दवाखाना होईल. पण, तसे काही झाले नाही. रोजगार नाही म्हणून अकोल्याची मुले नारायणगावला जातात. रोजगार हा सर्वात प्रश्न मोठा आहे. पिचड साहेब म्हणाले, तालुक्याच्या विकासासाठी भाजपत गेलो. पण, साहेब तुम्ही जेल वारी वाचवायला भाजपात गेलात. असे आरोप लहामटे यांनी केले. त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला. की, मुख्यमंत्री कार्यालयातून मला फोन आला होता. पिचडांची केस मागे घ्या. या कारणास्तव. पण, ते मला ते शक्य नाही. मी जनतेचा विश्वास तोडू शकत नाही. म्हणून मी नकार दिला. मी पिचडांचा कट्टर विरोधक आहे. तसे पिचड पवारांचे समर्थक होते. तर ते सोडून गेले कसे ? एका रात्रीत काय झाले. जे भाजपात जावे लागले. मी सकाळी देवाचे दर्शन घेऊन आलो. आणि अगस्ती महाराजांना म्हणालो, दादा आणि पवार साहेब "बळीराजा" आहेत. इडा पिडा टळूदे अन त्यांचे राज्य येऊदे. त्यांचे राज्य आणायला आपण एक होणार आहोत.
दशरथ सावंत म्हणाले की, मुख्यमंत्री व अजित पवार या दोन सभांची तुलना करताना मला वाटते की, मुख्यमंत्र्यांच्या सभेला "भाडोत्री" आले होते व आज क्रांतीच्या मुठी आवळून हा समाज येथे आला आहे. माझे ८१ वय चालु आहे. दिड वर्षे आणिबाणीत जेलमध्ये होतो. पण, सत्तेसाठी झुकलो नाही. पिचड नेहमी आमच्या लढ्यात उतरले आणि त्याचे श्रेय घेतले. एव्हाणा मुख्यमंत्री देखील झाले. ते उभी हयात व्हेजिटेबल राहिले आणि उतारवयात त्यांनी बोंबील मागितला. अशी गत झाली आहे. त्यांच्या बळावर कोणी संस्थापक झाले तर कोणी धनबलाढ्य झाले. त्यांनी पिचडांसोबत जाताना जनतेला विचारले नाही. म्हणून हा जाब विचारायला जनता उद्या रस्त्यावर उतरणार आहे. गद्दारीचा वचपा काढायचा आहे. या तालुक्यातील जनता निर्णयक्षणी राजकीय शहानपण परिधान करून चळवळीच्या विरोधात उभी राहिल. आम्ही मोदी अनुभविले आहे. त्यांच्या बेंबीत बोट घालून आलो आहे. आम्हाला विंचवासारखा झटका बसला आहे. स्वामिनाथन आयोग, शेतकऱ्यांना न्याय, शेतमालाला भाव अशी अश्वासने दिली. नंतर त्यांनी हा आयोग पास करण्यास नकार दिला. त्यामुळे शेतकऱ्यांची सर्वात मोठी फसवणुक केली आहे.
विनय सावंत म्हणाले की, पिचडांनी गेली ४० वर्षे फुले, शाहु, आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण केले. ते अकोल्यात कमळाबाईला घेऊन नाचत आहे. पण, येथे कमळ फुलनार नाही. हे त्यांनी विसरु नये. या लढाईला आता पक्षिय स्वरुप राहिले नाही. तर, ज्यांनी घराणेशाही केली. त्यांना जाब विचारायला जनता रस्त्यावर उतरणार आहे. दादा फक्त एक विनंती आहे. आता या सर्वांनी एक निर्धार केलाय. की पिचडांचा पाडाव हेच उद्दीष्ठ आहे. आता लोकांच्या मनातले नेत्रुत्व द्यावा. यश नक्की आहे.
अमित भांगरे म्हणाले की, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी राष्ट्रवादीचे काम करेल, हे मी ठामपणे सांगतो. पिचडांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे हाती लागले म्हणून त्यांनी भाजपात प्रवेश केला. विधान भवनात तीन मिनिट बोलून प्रश्न सुटणार नाही. पिचडांचे तीन मुले शिकले नाही. म्हणून त्यांनी सगळा तालुका शिक्षणापासून वंचित ठेवला आहे. पिचडांच्या घरात कारखान्यातून साखर येते तर दुध संघातून दुध जाते. पिचडांनी माझ्यावर गुन्हे दाखल करायचे प्रयत्न केले. मात्र, मी खंबीत आहे. असे भांगरे यांचे पुत्र म्हणाले.
सौ. सुनिता भांगरे म्हणाल्या; भविष्यात जेव्हा राजकीय इतिहास लिहीला जाईल तेव्हा तो सुवर्णाक्षरांनी लिहीला जाईल. दादांना सांगते की, अकोल्यात शिक्षणाच्या सुविधा, पाणी, रस्ता, रोजगार नाही. हे प्रश्न राष्ट्रवादीच्या माध्यमातून आपल्याला सोडवायचे आहेत.
संपत नाईकवाडी म्हणाले की, अजित दादा आपण, ठराविक नेते उभे केले आणि त्यांनीच आपल्या पाठीत खंजिर खूपसला. आता आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत. येथील शिवसेना देखील तुमच्या पाठीशी आहोत.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तिकांडे सर होते. तर राजेंद्र फाळके, कपिल पाटील, अशोक भांगरे, डॉ. किरण लहामटे, सुनिता भांगरे, बाळासाहेब जगताप, संपत नाईकवाडी, बबन वाळूंज यांच्यासर कट्टर राष्ट्रवादी, शरद पवारांचे निष्ठावंत, पिचड साहेबांचे गुप्तहेर, अजुबाजूच्या हॉटेल, खोल्यांत भाजपच्या बड्या नेत्यांसह ८ ते १० हजारांचा समुदाय उपस्थित होता.
सागर शिंदे - ८८८८७८२०१०
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ६९ दिवसात १२३ लेखांचे ६ लाख ६० हजार वाचक)