अक्षरश: "दादा" भर पत्रकार परिषदेत "ढसढसा" रडले.!! "थू" असल्या "राजकाणावर".!! शरद पवारांवरील आरोप मला "असहाय्य" झाले - अजित पवार
सॉरी मतदार राजा |
मुंबई (प्रतिनिधी) :-
काल माझ्या सद्सद विवेक बुद्धीला जे पटले ते मी केले. कोणत्याही गोष्टींचा विचार न करता. थेट आमदारकीचा राजिनामा दिला. त्यामुळे नेते, कार्यकर्ते माझ्यावर नाराज असतील. मात्र, मी त्यांची क्षमा मागतो. कारण, मला हे सर्व आरोप आणि शरद पवार साहेबांना जो त्रास झाला. तो असहाय्य झाला होता. ज्या शिखर बँकेच्या ठेवी ११ ते १२ हजार कोटीच्या आहेत. तेथे २५ हजार कोटींचा घोटाळा होऊच कसा शकतो. जनतेला यात वास्तव काय आहे. हे माहित नाही. मात्र, असे आकडे पाहुन लोक काय म्हणत असतील. हे माझ्या विचारांच्या पलिकडे होते. तसेच मा. शरद पवार साहेब साधे संचालक नाही, निर्णय मंडळात नाही, त्यांचा अप्रत्यक्ष सहभाग नाही. अशा व्यक्तीला उतारवयात इतका त्रास होतोय. त्याला मी कारणीभूत आहे. त्यामुळे मी नैतिक जबाबदारी म्हणून राजिनामा दिला आहे. असे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
दादांसोबत जा अन् संभाळून घ्या !! |
आज शनिवार दि. २८ रोजी दुपारी ३:४५ वाजता अजित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले. मी तीन दिवसांपुर्वीच ठरविले होते. की, राजिनामा देऊन टाकायचा. त्यासाठी मी बागडे साहेबांना फोन केला होता. त्यानंतर काल मी ही प्रक्रिया पुर्ण केली. कारण, हे आरोप मी सहन करू शकलो असतो. मात्र, शरद पवार साहेबांना यांनी हकनाक अडकविण्याचा प्रयत्न केला आहे. सन २०१० चे प्रकरण २०१९ मध्ये उकरून यांनी आम्हाला वेदना देऊ केल्या आहेत. हे शल्य मनाला बोचत होते. मात्र, मी जर पवार साहेबांना किंवा कार्यकर्ते नेते यांना विचारणा केली असती. तर, यांनी मला राजिनामा देऊ दिला नसता. म्हणून मी अचानक हा निर्णय घेतला.
दादा म्हणाले की, मी सर्वांना सांगू इच्छितो की, जेव्हा कारखाने, सुतगिरण्या अडचणीत येतात. तेव्हा त्यांना कर्जपुरवाठा करणे हिच कामे शिखर बँकेची असतात.जेव्हा बँकांना ठरलेली रक्कम दिली जाते. ती थेट कारखान्यांच्या खात्यात जमा होते. त्यामुळे ही अकडेवारी यांनी आणली कोठून. ? हे यांना दहा वर्षे सुचले नाही. मात्र, उद्या निवडणुका तोंडावर आल्यावर बरे घोटाळे दिसू लागले आहेत. जेव्हा पवार साहेब ईडीच्या कार्यालयात जाणार होते. तेव्हा मी बारामतीत होतो. कारण, कधी नव्हे इतके पाणी नदीला सोडण्यात आले होते. रात्री उशिरा निघालो तर पुण्यात येऊन थांबलो. सकाळी मुंबईकडे निघालो तर दोन टोलनाक्यांवर प्रचंड ट्राफीक लागली. तोवर पवार साहेबांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय बदलला होता. मात्र, मी मुंबईत पोहचलो. तेव्हा राजिनामा देण्यावर ठाम झालो. आणि तो दिलाही. या दरम्यान मी प्रचंड अस्वस्थ होतो. त्यामुळे मी नातेवाईकाच्या घरी थांबून आराम केला. मी चुकीचे काही केले नाही. यावर देखील मी ठाम होतो. कारण, ज्या पवार साहेबांनी मला उभे केले. ज्या पक्षाने मला पाठबळ दिले. त्यांना माझ्यामुळे त्रास होतोय. हे मी कदापी सहन करू शकलो नाही. मात्र, माध्यमांनी भलतीच अफवा पसरविली की, ग्रुहकलह झाला, मतभेद झाला. असे काही नाही. या फालतू अफवा आहेत.
जोवर काका आहे तोवर घाबरायचं नाय !! |
तुम्ही टाईमींग शॉट मारला हं !! |
दरम्यान, एकीकडे पवार कुटुंब कलह आणि दुसरीकडे भाजप शिवसेना युतीचा तिढा. अशात संजय राऊत यांनी फायदा घेत पवार साहेबांची भेट घेऊन गुप्तगू करणे. हा केवळ एक स्टण्ट असून. राऊत यांची भेट म्हणजे केवळ भाजपला धमकीचा संदेश पोहचविणे अशी आहे. हाच असू शकतो. असे बोलले जात आहे. म्हणजे पवारांना एकीकडे इडीचे टेन्शन, त्यात दादांचा राजिनामा, वरून राष्ट्रवादीत होणारी फुटतूट आणि यात संधी साधली ती शिवसेनेने. त्यामुळे "मांजराच खेळ होतो, उंदराचा जीव जातो" अशी टिका होऊ लागली आहे.
सोशल मीडियाची कुरापत !! |
निखिल पवार (मुलूंड)
===============
"सार्वभाैम संपादक"
- सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७१ दिवसात १२७ लेखांचे ७ लाख वाचक)