...अखेर अजित पवारांच्या "राजीनाम्याची" उत्सुकता उलगडली, दादा अजूनही "नाँटरिचेबल"

भाऊ लै लोड नाय घ्यायचा !!!

             
मुंबई (प्रतिनिधी) :-  
                  माजी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी वैराग्य धारण करून शरद पवार (काका) यांना हकनाक ईडीच्या गुन्ह्याला सामोरे जावे लागले. त्यांची कोणतीही चूक नसताना, त्यांचे नाव गोवले गेले. याचे शल्य दादाच्या मनाला बोचले आहे. देशाचे राजकारण अगदी धानेरडे आहे. त्यामुळे आता राजकारण करायचे नाही. तर, शेतीत उद्याेग करून गुजरान करायची. असा संदेश त्यांनी मुलाजवळ दिला. आणि ते बाहेर पडले व अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. विधानसभेचे सभापती हरीभाऊ बागडे यांना फोन करून कार्यालयात राजिनामा दिल्याचे सांगितले. व तो मंजूर करण्याची विनंती केली.

हात जोडला या घाणेरड्या राजकारणाला


        शरद पवार पुण्यात असताना त्यांना समजले की, अजित पवार यांनी राजिनामा दिला आहे. त्याची कारण, मिमांसा काहीच कळली नाही. दादांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पीए व त्यांचा स्वत:चा फोन बंद होता. मात्र, त्यांच्या कुटुंबाला विचारले असता. त्यांनी सांगितले. साहेब घरी आले होते. ते प्रचंड अस्वस्थ होते. ते म्हणाले. मला शिखर बँक गुन्ह्या प्रकरणी काहीच वाटत नाही. कारण, त्यात काहीच तत्थ्य नाही. ११० हजार कोटींच्या ठेवी आणि २५ हजार कोटींचा घोटाळा होऊच कसा शकतो. त्यामुळे केवळ राजकीय अकसापोटी एखाद्याला गुंतवायचे आणि राजकारण संपवायचे हा किती घाणेरडेपणा आहे. मला माझी चिंता नाही. परंतु माझ्यामुळे काकांना (शरद पवार) हकनाक त्रास होत आहे. ते कोणत्याही बँकेत संचालक देखील नाही. तरी सुद्धा त्यांना आरोपी करण्यात आले आहे. हे माझ्या मनाला प्रचंड त्रास देणारे आहे. 
         शिखर बँके ही शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठीच आहे. जेव्हा कारखाने अडचणीत आले. तेव्हा ते डबघाईल गेले तर शेतकरी अडचणीत येईल म्हणून कर्जवाटप करण्यात आली होती. अर्थात या बँकांना शेतकऱी उभा करण्याचे काम करता आले नाही. तर, यांचा उपयोग काय ? पण, नको ते आरोप करुन गुन्हे दाखल करण्यात आले. काकांचा यात काही एक संबंध नाही. त्यामुळे त्यांना होणारा त्रास पहावत नाही. म्हणून नैतिक जबाबदारी म्हणून हा राजिनामा दिल्याचे कारण समोर आले आहे.
      ज्या काकांनी ५१ ते ५२ वर्षे संसदेत काम केले, महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केेले. अनेक मंत्रीपदे भुषवली, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले. विविध क्षेत्रात नाव लौकीक केले. त्यांच्यावर आमच्या कारभारामुळे ही वेळ आली आहे. अशी खंत व्यक्त करून त्यांनी राजिनामा दिल्याची माहिती शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

अजित पवार यांनी आपल्या आमदार पदाचा राजीनामा दिल्या नंतर त्यांचा फोन दुपारपासून बंद होता , दरम्यान सूत्रांच्या माहिती नुसार अजित पवार हे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील त्यांच्या अंबालीका साखर कारखान्यावर असल्याची माहिती मिळाली आहे.

  - सागर शिंदे

===============

             "सार्वभाैम संपादक"
                 

    - सागर शशिकांत शिंदे   

Rajratna.sagar@gmail.com
                  -------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७० दिवसात १२५ लेखांचे ७ लाख वाचक)