"काँग्रेसमध्ये" राहुन आख्खी "दहा वर्षे वाया गेली", म्हणून मी "राष्ट्रवादीत" आलो होतो !! पण आता...!


अकोले (प्रतिनिधी) :-
                अकोल्यात "कम्युनिष्ट चळवळीने" आता जाेर धरला होता. कारण, शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांची उत्तरे आता सहज-सहज शोधू लागली होती. तर "संघर्ष" हा देखील आमच्या "रक्तात" मिसळला होता. याचे कारण म्हणजे जो "लाल बावटा" आमच्या खांद्यावर होता. त्याचे ब्रिद हे "शेतकरी कामगार" यांच्या "उन्नतीचे" होते. त्यामुळे नकळत "रक्तरंजीत" झेंडा "रक्तमिश्रीत" अंगात भिनून गेला होता. दरम्यानच्या काळ पाणी प्रश्नामुळे "दशरथ सावंत" हे "मधुकर पिचड" यांच्यासोबत होेते. त्यामुळे कॉ. उगले यांच्या पाठीशी आम्ही "मुठी आवळून" ऊभे रहात होतो. तर अरविंद नवले, शांताराम वाळुंज यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांसह एक नवोदीत कार्यकर्ता म्हणून माझा चेहरा पुढे येत होता.

शेतकऱ्यांविषयी आत्मियता आणि न्याय देण्याची उर्मीही प्रखर होती. त्यामुळे, मी जेव्हा सेक्रेटरी होतो. तेव्हा अकोल्यात ७२ सभासद होते. तर, नंतरच्या काळात १९९७ पर्यंत मी २ हजार ९०० शे सभासद उभे केले होेते. एक विशेष बाब म्हणजे तेव्हा संपुर्ण महाराष्ट्राचे २ हजार ५०० सभासद होते. तर एकट्या अकोले तालुक्यात २ हजार ९०० सभासद आम्ही केले होते. त्यामुळे, तालुक्यातील काम काय ? हे कोणाला नव्याने सांगायची गरज कधीच पडली नाही. या सर्व समर्पनाचे फलित म्हणून १९८३ ला ग्रामपंचायत, अकोले एज्युकेशन सोसायटी, खरेदी विक्रीसंघ, सेवा सोसायटी, दुधसंघ अशा अनेक संस्थावर कामे करण्याची संधी मला मिळाली. त्यास मी सार्थपणे यशस्वी ठरलो. तर, १९८९ ला सहकारी साखर कारखान्यावर तर १९८२ ला झेडपीवर मी निवडून गेलो. अशा परिस्थितीत देखील मी आंदोलनाकडे कधीही पाठ फिरविली नाही. कारण, ज्या जनतेने मला उभे केले. त्यांची उतराई होण्यासाठी ही एकच संधी मला होती. ती जर मी गमविली असती. तर, ज्या काळ्या मातीत मी राबलो, त्या मातीने मला कधीच माफ केले नसते. त्यामुळे, पदाचा वापर करून, जनतेची काम करण्याचे भाग्य कपाळी लावून मी मिरवत होतो. तर, काम केल्यानंतर चळवळ व पक्ष आपोआप कसा मजबुत होतो. याची प्रचिती मला तेव्हा आली होती. आता या जनवैभवाने मला कळून चुकले होते. माझे हे "आयुष्य" माझ्यासाठी नाही. तर जनप्रश्नांसाठी अविरत धावत राहणे. हाच आपला "सत्कर्मी" जन्म आहे. त्यामुळे जीवणाची प्रचंड ओढाताण होत होती. परिणामी दरम्यानच्या काळात म्हणजे १९९७ साली माझा "अपघात" झाला आणि संपुर्ण धावपळीला "पुर्णविराम" बसला. गेली तीन वर्षे "प्रचंड अस्वस्थता" मी सहन केली. ज्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी मी लढत होतो. ते मनात मुके होऊन दडून बसले होते. अपघाताने विचारांची "घुसमट" व शरिराची "पोखरण" होत होती. पण, पर्याय शुन्य होता. तो तीन वर्षाचा कालावधी मी "चळवळीसाठी, काळ्या पाण्याच्या शिक्षेत" भोगला असता. तरी मी स्वत:ला भाग्यवान समजले असते. पण, शेतकरी आणि मी ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू झाल्या होत्या. त्यामुळे माझी आवस्था एखाद्या "खिन्न पारव्यासारखी" झालेली होती.

  गेले ते दिवस आणि उरल्या फक्त आठवणी, सन २००० मध्ये मी पुन्हा चळवळीत सक्रिय झालो. एखाद्या माहेरच्या कुटूंबात "सासुर-वाशीनीने" आपला आनंद साजरा करावा. तितका आनंद मला चळवळीच्या सहवासात वाटू लागला होता. कालपर्यंत संपलेल्या आयुष्यात सात जन्माचे बळ आल्याचे भासत होते. पण, "दुर्दैव" असे की, या कुटुंबाला "आक्रमकतेची कळा" राहिली नव्हती. जी "धार" विचारांत अगदी "लखलख" करत होती. ती अगदीच "बोथट" झाली होती. जो चळवळीत "उत्साह" होता. तो "निश्तेज" झाला होता. याचे कारण म्हणजे, डाव्या पक्षातील कार्यकर्ते सहकारी साखर कारखान्यावर निवडून गेले तेव्हा. चळवळीला "सत्तेचे भेरुड" लागले होते. प्रस्तापितांवर होणारी "विरोधाची धार" सत्तेच्या लालसेपोटी अगदी "बोथट" झाली होती. कालपर्यंत अगदी "शौर्याने" लढणारा पक्ष "सत्तेच्या इर्शेत" कधी बुडाला काहीच कळले नाही. "मतभेदाचे टोक पराकोटीला" गेले आणि चळवळीला खऱ्या अर्थाने "उतरती कळा" लागली. कालवर "तत्वांसाठी" हातात हात घेऊन लढणारे "लालबावटे" आज एकमेकांच्या "पायात-पाय" घालू लागली होती. एकवेळी "मतभेद" ठिक होता. परंतु, "मनभेदाने" चळवळ पोखरली गेली. "एकात एक नाही, आणि बापात लेक नाही" असे  कालचे कुटुंब आजचे "विभक्त वैरी" झाले होते. याच कारणास्तव मी २००६ मध्ये कम्युनिष्ट पक्षाचा "राजिनामा" दिला आणि थेट "काँग्रेसमध्ये" दाखल झालो.
               माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते "काँग्रेसच्या छताखाली" कम्युनिष्ट चळवळ सांगू लागले. पण, एक मात्र नक्की, "पक्ष बदलला" म्हणजे आमची "विचारधारा" बदलली असे कोणाला वाटत असेल. तर, ते निव्वळ "अल्पज्ञान" ठरेल. तेथे गेल्यानंतर देखील डाव्या विचारांच्या "मुशीला" मी कोठेही "ग्रहन" लागू न देता, मी माझी मूस "कम्युनिष्ट मुल्ल्यांवर" पक्की ठेवली होती. माझा पक्ष नक्कीच बदलला होता.  मात्र, माझे "तत्व आणि स्वभाव" चळवळीचाच होता. पुढे काँग्रेस पक्षात काम करताना मला अनंत अडचणी आल्या. माझी "दहा वर्षे तेथे फुकट गेली" असे मला आजही वाटते. कारण, काँग्रेस पक्षात मलाच काय माझ्या कार्यकर्त्यांना देखील काम करण्यास वाव मिळाला नाही. तरी काँग्रेस पक्षात मी किसान काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होतो. हे काम करताना तालुक्यात विशेषत: बहुतांशी अडचणी आल्या. येथे काँग्रेसचे "संघटन" अल्प असल्यामुळे आंदोलने, मोर्चे आणि विरोध करताना "संकुचित पाठबळ" मिळत होते. त्यामुळे अडिच वर्षापुर्वी मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. येथे मी महाराष्ट्र किसान सभेचा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे.

क्रमश: भाग 3

शब्दांकन (सागर शिंदे)
जर आपल्याला हा लेख आवडला असेल तर मो. क्र. ८८८८९७५५५५ (मधुकर नवले) साहेबांना फोन करून शुभेच्छा देऊन 
प्रतिक्रिया कळवा.

===============

             "सार्वभाैम संपादक"
                 

    - सागर शशिकांत शिंदे   

Rajratna.sagar@gmail.com
                  -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ७१ दिवसात १२७ लेखांचे ७ लाख वाचक)