"आचारसंहिता" म्हणजे काय ? कोणत्या गोष्टींवर असते बंदी, मतदान व मतमोजणी कधी ?


                  

मुंबई (प्रतिनिधी) :-
         आचारसंहिता म्हणजे काय ? असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. त्याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झालेला असतो. मात्र, यात वेगळे काही नसून, दक्षतेच्या द्रुष्टीकोणातून  काही ठराविक काळासाठी कायदे व नियम लागू केले जातात. त्यावर निवडणूक आयोगाचे लक्ष असते. जे प्रत्येक राजकीय पक्ष आणि उमेदवारांना पाळावेच लागतात. निवडणुकीच्या काळात लागू केलेले निर्देश आणि नियमांना आचारसंहिता असे म्हटले जाते. एखाद्या उमेदवाराने याचे उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाला त्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे. उमेदवाराच्या विरोधात एफआयआर दाखल केली जाऊ शकते. त्याला निवडणूक लढवण्यास रोखले जाऊ शकते. दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास तुरुंगवास देखील होऊ शकतो. निवडणुकीच्या तारखांची घोषणा होताच आचारसंहिता लागू केली जात असते. सरकारी कर्मचारी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगाचे कर्मचारी असतात. ते आयोगासोबत राहून त्यांनी दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी करतात.

# आचार संहिता लागू झाल्यानंतर 
या कामांवर होते बंदी

# आचार संहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची नवीन घोषणा करता येत नाही.
कुठल्याही योजना किंवा इमारतीचे अनावरण, लोकार्पण किंवा भूमिपूजन केले जाऊ शकत नाही.

 # सरकारी खर्चातून असे एकही काम केले जाऊ शकत नाही, ज्यातून कुठल्याही राजकीय पक्षाला फायदा होईल.
# धार्मिक स्थळांचा वापर निवडणुकीच्या प्रचाराचे मंच म्हणून करता येत नाही.
उमेदवार, राजकीय पक्षांना सभा, संमेलन किंवा रॅली काढण्यापूर्वी पोलिसांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

# राजकीय पक्षांना कुठल्याही कार्यक्रमाच्या आयोजनापूर्वी पोलिसांना कळवणे आवश्य आहे.
 कुठल्याही व्यक्तीकडे ५० हजारांपेक्षा अधिक रोकड किंवा १० हजार रुपयांपेक्षा अधिकचे गिफ्ट सामुग्री सापडल्यास कारवाई केली जाऊ शकते.
 # या काळात कुठल्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची बदली करता येत नाही. अत्यावश्यक असल्यास त्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागेल.
मंत्री सरकारी खर्चावर होणाऱ्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे अतिथी म्हणून सहभागी होऊ शकत नाहीत.हे काही आदर्श आचारसंहितेचे महत्त्वाचे मुद्दे आहेत.

 विधानसभेचे बिगुल..

--------------------
▪महाराष्ट्रात आचारसंहिता लागु.
महाराष्ट्रात 8.94 कोटी मतदार नोंदणी.
▪महाराष्ट्रात 1.8 लाख EVM.
▪महाराष्ट्रात विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर पर्यंत
▪निवडणुकीच्या तोडांवर खास सुरक्षा व्यवस्था तैनात करणार.
▪उमेदवार यांनी गुन्हेगारीची माहिती देणे बंधनकारक.
▪निवडणुकीत प्लास्टिकचा वापर टाळावा.
निवडणुकीत पैशांचा गैरवापर टाळण्यासाठी विशेष पथक.
▪उमेदवारांने 30 दिवसात हिशोब देणे बंधनकारक.
▪28 लाखांपेक्षा जास्त खर्च करण्याची परवानगी नाही.
▪अधिसूचना 27 सप्टेंबर.
▪उमेदवारी अर्ज मुदत 4 ऑक्टोबर.
उमेदवारी अर्ज छाननी 5 ऑक्टोबर.
अर्ज मागे घेण्याची मूदत 7 ऑक्टोबर.
21 ऑक्टोबरला महाराष्ट्रात एकाच टप्यात मतदान.
▪24 ऑक्टोबरला महाराष्ट्रात मतमोजणी होणार.सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक नंतर होणार, विधानसभेसोबत नाही- निवडणूक आयुक्तांची माहिती. उदयनराजे यांच्या राजीनाम्यामुळे सातारा लोकसभेची जागा झालीय रिक्त.

 --  सागर शिंदे

     सुशांत पावसे

 ===============

             "सार्वभाैम संपादक"
                 

    - सागर शशिकांत शिंदे   

Rajratna.sagar@gmail.com

          -------------

(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" ६९ दिवसात १२० लेखांचे ६ लाख ३५ हजार वाचक)