"अर्बन बँकेच्या" अकोले, संगमनेर सर्व शाखेंवर "RBI चा ताबा"; आता "गांधिगीरी" बंद...
अहमदनगर (प्रतिनिधी) :-
"नगर अर्बन बँकेवर" काही तांत्रीक कारणास्तव प्रशासक नियुक्त करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेचे निव्रुत्त अधिकारी सुभाषचंद्र मिश्रा यांचे पथक चौकशीसाठी नगरला आले असता त्यांनी थेट बँकेचा ताबा घेतला. नगरचे माजी खासदार दिलीप गांधी हे या बँकेचे अध्यक्ष आहेत. येत्या दोन महिन्यात बँकेची निवडणूक होणार असून ती विरोधकासाठी चांगलीच लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. बँकेतील कर्जवाटप, वसूली, शेअर्स, भरती अशा अनेक प्रकारांबाबत अनेक तक्रारी आरबीआयकडे करण्यात आल्या होत्या. रिझर्व्ह बँकेने अल्टीमेट देऊनही बँकेने योग्य पाऊल उचलले नाही. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
एक शतक यशस्वी पार केलेल्या बँकेला आता उतरती कळा लागली की काय? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजेंद्र गांधी व दिलीप गांधी यांच्यात सत्तेची लढाई सुरू आहे. संस्थापक अध्यक्षांना देखील काही एक न विचारता बँकेत मनमानी "गांधिगीरी" चालत असल्याचे आरोप अनेक दिवस होत होेते. याप्रकरणी सुहालाल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन बँकेच्या कारभारावर ताशेेरे ओढले होते. तेव्हाच या बँकेला आरबीआयने काही निर्बंध घातल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, एकाही अटींची पुर्तता बँकेकडून करण्यात आली नाही. एका डॉक्टरच्या नावे कर्ज वाटप करून त्याची वसूली होणे बँकेच्या "डोईजड" झाले आहे. त्यामुळे सहा डॉक्टरांनी बँकेच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, त्यावर तुरतास तोडगा काढण्यात आला. परंतु त्या समस्येचे रुपांतर ताब्यावर आले. असे बोलले जाते. अशी अनेक प्रकरणे अर्बन बँकेच्या अंगलट आल्याने थेट आरबीआयला हस्तक्षेप करावा लागला आहे.
या बँकेच्या शाखा अकोले व संगमनेर तालुक्यांमध्ये आहेत. नागरिकांनी येथे कोट्यावधी रुपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत. तर, हजारो खाती बँकेत उघडले गेले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, खाते व रकमा तसेच बँकेच्या कारभारावर कोणताही परिणाम होणार नाही. आरबीआय अपेक्षीत बँक पुर्वपदावर येईपर्यंत हे प्रशासक कायम राहतील. यात चिंतेची गरज नाही असे अर्बन बँकेकडून सांगण्यात आले आहे.
----------------------------------
- सागर शिंदे
-----------------------------------
जाहिर आभार
------------------------------------
प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने १६ दिवसात ४१ बातम्यांच्या जोरावर २ लाख ४८ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी शब्दांमुळे आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे. नकळत निर्भिड पणातून कोणाचे मन दुखविले तर क्षमा असावी.
---धन्यवाद ---
आपला
-------------------------------------------