साहेब..! "मी एकटा" राहिल "राष्ट्रवादीत"; फक्त "लढ म्हणा" "काळीज गलबलून टाकणारा निष्ठावान कार्यकर्ता"..
साहेब..! मी हाय, राष्ट्रवादीत,शेवटपर्यंत. |
- सागर शिंदे
एखाद्या झाडाला "पानगळ" लागावी तशी "राष्ट्रवादी-काँग्रेसला" पानगळ लागली आहे. "शरद पवार" साहेबांनी ज्यांना "सत्तेच्या अंगाखांद्यावर खेळविले", तेच "राष्ट्रवादीचे बाळावते ओले अन घान" करून गेले. पण, "आई आणि बाप" नावाचं "छत्र" असे असते. ज्याला, कधीच आपलं "बाळ" कितीही वाईट वागलं तरी "नको वाटत नाही". अशा "राष्ट्रवादीच्या जन्मदात्याला" पडत्या काळात सोडून गेलेल्यांना त्यांनी अगदी "तोंड भरून" शुभेच्छा दिल्या. परंतु, "अंत:करण" किती जड होत असेल हे त्या "दु:खी काळजालाच" माहित. पण, "वसा" आहे या महाराष्ट्राचा. "आई-बापाला" अगदी "म्हतारपणात लाथाडून" होम- "मिनिस्टरांचा गुलाम" व्हायचा. त्यामुळे "निष्ठा", "प्रेम", "समर्पन" हे फालतू शब्द आहेत. "स्वार्थी आणि ढोंगी" लोकांसाठी. पण, साहेब..! सकाळी एक "व्हिडिओ" पाहिला आणि "मन गलबलून" गेलं. "कोण कुठला म्हतारा" माहित नाही. पण, काय आत्मियता आणि निष्ठा होती त्याच्या बोलण्यात. "साहेब...! कोणी असो नसो, मी हाय राष्ट्रवादीत", उर बडवून जाणत्या राजाला मावळा ग्वाही देत होता. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या शब्दांनी माझ्यातील "सागर" उसळत होता. म्हणून अगदी रहावेनासे झाले. मी तुमच्यापर्यंत पोहचू शकत नाही. इतका मी सामान्य "पत्रकार". पण, शब्दात मी "जगापर्यंत पोहचूशकतो". म्हणून "निष्ठा" या विषयावर "व्यक्त होत" आहे.
"सत्तेचे वारकरी, भाजपच्या दारी" |
सगळ्यांना भरभरुन दिलं हिच चूक होय ना ! |
"नाईक" झाले भाजपचे "पाईक" |
"बळजबरीचा राम-राम" |
स्वाभिमान गहान ठेवलेल्यांवर काय बोलायचं ! |
अर्थात हे सर्व लिहीण्याचे कारण, केवळ "त्या सामान्य अजोबाची तळमळ" आहे. "शरद पवार" व दादांना माननारे नेते "तोंडावर एक, अन् मनात एक" असे असले तरी, साहेब..! तुम्ही पोहचले नसाल तेथे तुमची "पुजा करणारा तरुण वर्ग अद्याप "जिवंत" आहे". आजही "पिचड साहेबांच्या सहवासात, नकळत "पवार" साहेब "काळजात बसून गेले". त्यांनी "पक्ष बदलला", "निष्ठा बदलली", पण "इथला तरून आजही तुम्ही एकदातरी अकोल्यात याल याची "चातकासम" वाट पाहतोय". इतकी "सुप्त लाट" कधीनव्हे अशी "घालमेल" निर्माण झाली आहे. "पिचड साहेबांना सोडू वाटेना, अन् पवार साहेबांना मन विसरेना" , हिच परिस्थिती प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणून, "पक्षनिष्ठा" येथे कोणाला कळत नाही. पण "स्वामिनिष्ठा" म्हणून तुम्हाकडे जनता "जाणता राजा" म्हणून पाहते आहे. या "महाराष्ट्रातला" तमाम "बहुजनवर्ग" तुम्हाला साद घालतो आहे. "फक्त लढ" म्हणण्यासाठी. "छगन भुजबळ", "उदयनराजेे", "अजित दादा", "सुप्रियाताई" "नवनितजी कौर" जयंत पाटील "धनंजय मुढे", "जितेंद्र आव्हाड", "अमोल कोल्हे", राेहित पवार", यांच्यासह अनेक "निष्ठावान मावळे" तुमच्या दिमतीला आहेत. तुम्हाला हे "संविधान" टिकवायचे आहे. आणि हे "हुकूमशाहीकडे" चाललेले "राज्य" पुन्हा "रयतेचे" करायचे आहे. म्हणून तर म्हातारा झालेला "ऐंशीतला" माणूस तुम्हाला साद घालतो आहे. "पवार साहेब" कोणी नाही राहिलं तरी "मी एकटा" राहिल "राष्ट्रवादीत"; "छत्रपती शिवरायांची रयत" उभी करायला..! साहेब, हेच बोल इथल्या अनेक तरुणांमध्ये आहे. फक्त तुम्ही साद घाला आणि "पाठीवर हात ठेऊन, फक्त लढ म्हणा"--------------------------
--- सागर शिंदे ---
rajratna.sagar@gmail.com
8888782010
------------------------------------
जाहिर आभार
------------------------------------
प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने १६ दिवसात ४० बातम्यांच्या जोरावर २ लाख ४५ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी शब्दांमुळे आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे. नकळत निर्भिड पणातून कोणाचे मन दुखविले तर क्षमा असावी.
---धन्यवाद ---
आपला
-------------------------------------------