आता "ब्रिटीश आमदार" नको, "आदिवासी आमदार" हावा. अशोक भांगरेंचा "पिचडांवर प्रहार"
अकोले (प्रतिनिधी) :-
अकोले तालुक्यावर जवळ-जवळ अर्धशतक पिचडांनी वर्चस्व गाजविले आहे. त्यामुळे ही परंपरा खंड करीत आता एक उमेदवार अदिवासी आमदार असा नारा अशोक भांगरे यांनी दिला आहे. पिचडांच्या इतिहासातील आरोपांवर हात घालत बिटीश अकोल्यातून हटविण्याची शपथ यावेळी घेण्यात आली. जागतीक अदिवासी दिनानिमित्त ते अकोल्यात बोलत होते. यावेळी मंचावर आमदार रेसमध्ये असणारे डॉ. किरण लहामटे, सतिष भांगरे, मारुती मेंगाळ, रिपाईचे शांताराम संगारे, सौ. सुनिता भांगरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
भांगरे यांनी पिचड घराण्यावर चांगलीच तोफ डागविली. ४० वर्षे आमदार असून आदिवासी समाज्याच्या पदरात काय पडले, कोणता विकास झाला ? तालुक्यासह आपल्या समाज्याच्या पदरात अवहेलनाच पडली आहे. आमदार होण्यासाठी नेहमी एकापेक्षा अनेक उमेदवार उभे करायचे आणि मतांचे विभाजन करून निवडून यायचे. हिच पद्धत पिचडांनी वापरली आहे. त्यामुळे, आता अदिवासी आमदार करण्यासाठी सगळ्यांनी मिळून एकच उमेदवार उभा करायचा आहे. तसेच पिचडांच्या विरोधात माघार घ्यायची नाही. आता लढायचे. काल परवा जो बेकायदा जातीचा दाखला याविषयी आदिवासी समाज्याने आवाज उठविला होता. त्याचे पडसाद उमटू लागले आहे. प्रशासनाने दखल घेत सुगावच्या शाळेतून दाखले जमा करून दप्तरी दाखल केले आहे. त्यामुळे पिचडांना आता हद्दपार करायचे आहे. असे मत भांगरे यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले.
तर मारुती मेंगाळ यांनी अजित नवले यांचे नाव न घेता घरकुल घोटाळ्याची सफाई दिली. मात्र, आदिवासी भागातच घरकुल घोटाळे खरोखर झाल्याच्याही चर्चा जनतेत सुरू होत्या. मेंगाळ म्हणाले, इथे सर्वांनाच आमदारकीचे डोहाळे लागले आहे. मात्र, मंचकावर उपस्थित असणाऱ्यांपैकी एकच उमेदवार दिला जाईल व प्रस्तापितांना शह दिला जाईल. विनय सांवत यांनी सर्वांना हातात हात घेऊन एकत्र लढण्याची विनंती केली. तर डॉ. किरण लहामटे यांनी देखील एकीचा नारा दिला आहे. गेल्या दोन वर्षापुर्वी दसरा मेळाव्यात जी एकीची शपत घेतली होती. ती कायम ठेवण्याचा निर्धार केला. तसेच याचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर बहिष्कार टाकण्याची भाषा त्यांनी केली. त्यामुळे आता येणाऱ्या काळात एकी होती की काय असे दर पंचवार्षीकसारखे पोकळ वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान अशोक भांगरे, सुनिता भांगरे, मारुती मेंगाळ, सतिष भांगरे, डॉ. किरण लहामटे, कातोरे यांच्यासह सगळ्यांनीच गुढग्याला बाशिंग बांधले आहे. मेंगाळ, भांगरे, लहामटे या तिघांच्या मुलाखती आपण मीडियातून ऐकल्या आहेत. मात्र, तुर्तास जागतीक दिनानिमित्त व्यासपिठ मिळाले आणि ज्यानेत्याने एकीचा नारा दिला नाही. तो "एक कोण" ? तर तो एक "मीच" हेच प्रत्येकाच्या मनात आहे. इतकेच एकीचे बळ होते तर सगळ्यांनी मिळून व्यासपिठावर एकच उमेदवार का दिला नाही ? असा प्रश्न जाणकार आदिवासी समाज्यातून येत आहे. त्यामुळे ही निव्वळ दिशाभूल असून उद्या बघा. एबीफॉर्म आणण्यासाठी किती जणांची धडपड होते. किंवा ज्या डॉ. लहामटे व भांगरे यांनी एकीचा नारा दिला. तेच आमनेसामने दिसले तर आश्चर्य वाटून देऊ नका. त्यामुळे कोणताही पिछडा समाज असो. त्यांचे वाटोळे अन्य समाजाने नाही. तर, त्याच समाज्यातील शिकल्या सवरलेल्यांनी त्यांना धोका दिलाय. असे डॉ. बाबासाहेब म्हणायचे. तेव्हा ते हे आजचे शिकले सवरले उमेदवार जनतेची दिशाभूल करतात. हे नवे नाही. असे मत सुशिक्षीत तरुणांनी व्यक्त केले आहे.=====================
-- सागर शिंदे
---------------------------------------जाहिर आभार
----------------------------------
प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने २३ दिवसात ५१ बातम्यांच्या जोरावर ३ लाख ४२ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी व निर्भीड शब्दांमुळे आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
---धन्यवाद ---
आपला
-------------------------------------------