"भ्रष्टाचारी" संगमनेर विरुद्ध समाजसेवकांचा "क्रांती बंड"; "थोरातशाही" आणि पालिकेतील "नऊ मुद्यांची" चौकशी करा.! "उपोषण" सुरू...
संगमनेर (प्रतिनिधी) :-
गेली ३५ वर्षे संगमनेर तालुक्यावर "निर्विवाद वर्चस्व" गाजविलेल्या "थोरातशाही" व "नगरपालिकेच्या" विरोधात "समाजसेवक व लोकप्रतिनिधी" यांनी "दंड थोपटले" आहे. आज "क्रांतीदीनी" (दि.९) शहरासह तालुक्यात स्पष्ट दिसणाऱ्या "नऊ भ्रष्टाचाराविरुद्ध" बंड पुकारण्यात आले आहे. यासाठी प्रांताधिकारी कार्यालयासमोर "लाक्षणिक उपोषण" सुरू केले आहे. त्यामुळे संगमनेरमध्ये चाललेल्या या "अनागोंदी कारभाराचा" उद्याच्या येणाऱ्या "विधानसभेवर" चांगलाच "परिणाम होऊ शकतो" असे बोलले जात आहे.
शासन दरबारी नऊ मुद्दे मांडले आहे. त्यात म्हटले आहे की, संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने बांधलेल्या बेकायदेशीर गाळ्याची चौकशी व्हावी, संगमनेर औद्योगिक वसाहती मधील भूखंड हस्तांतरण तसेच शासन निधी अनुदानात झालेली अनियमितता, जलशुध्दीकरण प्रकल्प आणि नदीपात्रात सोडण्यात येत असलेले प्रदूषित पाणी बंद करावे, साकुर सोसायटी घोटाळा व मनमानी कारभार, लेखापरिक्षण अहवालात दोषींना पाठीशी घालणे. बस स्थानकासमोरील टपऱ्या गेल्या कोठे किंवा विकल्या कशा ?, पुणे- नाशिक विद्युत खांबांचे स्थलांतर व ठेकेदाराची लुट. वडझरी बु ग्रामपंचायतीत रस्ता व वॅलकंपाऊंड घोटाळा. अशा नऊ मुद्द्यांची चौकशी व्हावी आणि दोषी आढळेल त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करावेत. अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी माजी नगरसेवक कैलास वाकचौरे, बाजार समितीचे शासन नियुक्त संचालक संजय फड, नगरसेविका सौ.मेधा भगत, बुवाजी खेमनर, वडझरीचे माजी उपसरपंच शरद गोर्डे, सुनिल सारंबदे आदी कार्यकर्ते आणि पदाधिकार्यानी प्रशासनाला विविध प्रश्नावर उषोषणास बसण्याचे निवेदन दिले आहे.
यासंदर्भात प्रांताधिकारी मंगरूळे यांनी आंदोलनकर्ते आणि संबंधित विभागाच्या अधिकऱ्यांमध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीला पालिकेचे मुख्याधिकारी सचिन बांगर, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, सहकारी संस्थांचे उपनिंबधक गणेश पुरी, बाजार समितीचे सचिव संजय गुंजाळ, विज वितरण कंपनीचे मुळे आदी अधिकारी उपस्थित होते. प्रत्येक प्रश्नावर चर्चा झाली. मात्र, कारवाईचे कोणतेही ठोस आश्वासन मिळू शकले नाही. त्यामुळे उपोषण करून एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यावर पदाधिकारी ठाम असल्याचे उपोषणकर्त्यांकडून सांगण्यात आले.
काय आहेत हे
नऊ घोटाळे ?
1⃣ संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीने बांधलेल्या गाळ्यांना नगरपालीका,नगर रचना विभाग आणि पणन विभागांची परवानगी नाही. तरी देखील त्यांची लिलाव प्रक्रीया पूर्ण करण्यात आली. संचालक या नात्याने अनेक दिवसांपासून माहीतीची मागणी करूनही जाणीवपुर्वक बाजार समितीकडून दुर्लक्ष केले जात आहे. कारण, ते गाळे अनाधिक्रुत आहे म्हणूनच.------------------------
2⃣ संगमनेर औद्योगिक वसाहतीत नविन उद्योजकांना भूखंड मिळत नाही. ज्यांच्यावर साहेबांचा वरदहस्त आहे. त्यांचे भूखंड पडिक असून हस्तांतरण नाही. वसाहतीसाठी आलेल्या शासन अनुदानातील अनियमितता याचा चौकशी अहवाल जाहीर करावा. एमआयडीसीचा कोट्यावधींचा निधी अनाधिक्रुत वापरला गेला. त्याची चौकशी व्हावी.------------------------
3⃣ साकुर सोसायटीत जागा व भाडे मिळकत घोटाळा. तसेच अनाधिक्रुत सभासद भरती केली. त्याची चौकशी व्हावी.-------------------------
4⃣ कत्तलखाने व गटारी तसेच अन्य घाणेरडे दुषितपाणी नदीत सोडले जाते ते बंद करून त्याची योग्य विल्हेवाट लावावी. कारण, ते कोणाच्यातरी पोटात जाते व आरोग्याला घातक ठरते आहे.
5⃣ ३५ वर्षे संगमनेरात साहेबांचे वर्चस्व असून नागरिकांना शुद्ध पाणी नाही. निळवंडे पाणी प्रकल्पात जलशुद्धीकरण यंत्रणा होती. त्याचे १२ वाजविले. आज दुषित पाण्याने डॉक्टरांची घरे भरली आहेत. तर सामान्य नागरिकांची रिकामी झाली. त्यामुळे, नागरिकांच्या आरोग्यासाठी जल शुद्धीकरण यंत्र कार्यान्वीत करावी.-------------------------
6⃣ शासनाच्या लेखा परिक्षण अहवालात अनेक मर्जीतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना दोषी धरून त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत. मात्र, पंचायत त्यांची नावे गुप्त ठेऊन पाठीशी घालत आहे. ती नावे जाहीर करून कारवाई करावी.-------------------------
7⃣ बस स्थानकासमोर ज्या टपऱ्या होत्या. त्या नगरपालिकेच्या होत्या. त्यांचा पंचनामा नाही, नोंद नाही, परस्पर गहाळ झाल्या. व आवाज उठल्यानंतर चेक जमा केले गेेले. त्यामुळे त्या प्रथम कोणी कशा चोरल्या, त्याची परस्पर विक्री का केली याची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत.-------------------------
8⃣ पुणे- नाशिक महामार्ग होण्यापुर्वी जे खांब स्थलांतरीत केले होते. त्यात अवाजवी रकमा घशात गिळणारे सहा निलंबित आहेत. त्यातील कंपनी एजन्सी, ठेकेदार यांना आरोपी करावे.-------------------------
9⃣ वडझरी बु येथे रस्ता व वॉलकंपाऊंडसाठी आलेला पैसा त्या कामासाठी न वापरता नेमकी कोणत्या सेलिब्रेशनसाठी वापरला. पैसे काढले मात्र काम कोठेच नाही. त्यामुळे याची चौकशी व्हावी व दोषींवर कायदेशीर गुन्हा दाखल करावा.=====================
-- सुशांत पावसे
(संगमनेर प्रतिनिधी)
=====================
जाहिर आभार
----------------------------------
-- सागर शिंदे
------------------------ -----------------------------------जाहिर आभार
----------------------------------
प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने २३ दिवसात ५० बातम्यांच्या जोरावर ३ लाख ३७ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी व निर्भीड शब्दांमुळे आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
---धन्यवाद ---
आपला
-------------------------------------------