म्रुत्युनंतरही "वेदांतच्या तपासावर" पोलिसांचा "अत्याचार" एसपींनी नेमली "एसआयटी"
मी वाट पाहतोय न्यायाची..! |
अकोले तालुक्यातील "उंचखडक" येथे 'वेदांत देशमुख' (वय ७) या बालकाची "निघ्रुन हत्या" करण्यात आली होती. पोलीस प्रशासनाच्या "हालगर्जीपणामुळे" तो "न्यायापासून वंचित" राहिला. हे शल्य त्याच्या नातेवाईकांना झोप येऊ देईनासे झाले होते. त्यामुळे या "निष्पाप बालकाच्या" पाठीशी उभे राहण्यासाठी 'संपुर्ण तालुका' या कुटुंबाच्या सोबत अगदी "सह्याद्रिसारखा" ठाम उभा राहिला. वेदांतची हाक म्हणून दि. "१५ आॅगस्ट" रोजी हजाराेंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत होता. मात्र, पोलीस अधिक्षक "ईशु सिंधू" यांनी निवेदन करून "वेदांतचा आकांत" या समन्वय शिष्ठमंडळास बोलावून त्यांचे म्हणणे एकून घेतले. हा तपास "सीबीआयकडे" जाण्यापुर्वी पुन्हा पोलीस प्रशासनाला तपास करण्याची संधी द्यावी असे मत मांडले. त्यानंतर एकमत होताच, एक डिवायएसपी, दोन पोलीस निरीक्षक, एक एपीआय अशा "विशेष एसआयटीची" स्थापना करून तपास यंत्रणा "कार्यान्वीत केली" आहे. त्यामुळे उद्याच्या "अमरण उपोषणाला" स्थगिती देण्यात आल्याची माहिती शिष्ठमंडळाने दिली.
एसपी ईशु सिंधू साहेब |
आता एक प्रश्न सर्वसाधारण आहे. जर पाचशे लोकांच्या चौकशा होतात आणि पोलीसांच्या हाती काहीच लागत नाही. हे आश्चर्यकारक वाटत नाही का ? जोवर तपास केला तोवर त्याला मुळ संशयीत दिशा काय होती ? आणि यांनी काेणत्या दिशेने तपास केला ? किती कागदे रंगविली आणि किती पुरावे जमा केले ? जो संशयीत म्हणून अटक केला. त्याच्याकडून काय हस्तगत केले ? साधा एक जबाब देखील पुरक मिळू शकला नाही. ! "एक ना धड भाराभर चिंध्या" जमा करुन दोषारोपपत्र दाखल केले खरे. त्यामुळेच संशयीताला देखील "जामिन" मिळाला. कारण, न्यायलयाने देखील लक्षात घेतले, यात "सर्कमटन्स" सोडून अन्य कोणताही "प्रत्यक्षदर्शी" किंवा "सबळ" पुरावे नाहीत. या युक्तीवादावर उद्या केस स्टँड झाली तरी वेदांतला न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेऊ नका.
ज्या संशयीत खरात यास आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. त्यांच्या नातेवाईकांनी देखील "पोलीस तपासाचे वाभाडे" ओढले आहे. जर "सबळ पुरावे" असते तर आम्ही आमच्या व्यक्तीला पाठीशी घातले नसते. परंतु केवळ कोणीच मिळेना म्हणून "बळाचा वापर" करून आमच्या व्यक्तीस आरोपी करण्यात आले आहे. नातेवाईक पुढे म्हणतात, निरापराध मुलाचा बळी गेला आहे. त्याचे दु:ख आमच्या मनाला देखील आहे. त्यामुळे या घटनेची खरोखर सखोल चौकशी व्हावी. मात्र, तपास भर्कटून "चोर सोडून सन्याशाला फाशी" दिली जात असेल तर, हे नैतिकतेला धरुन नक्कीच नाही. जर नार्कोचा विषय असेल तर सलोख्याने आजवर सगळे केले. नार्कोलाही होकार दिला होता. मात्र, पोलीस आणि प्रतिवादी यांच्याकडून नेहमी गुन्हेगाराचीच वागणूक दिली गेली. त्यामुळे खरे आरोपी मिळावे यासाठी आम्हीच आता प्रयत्नशिल आहोत. असे मत त्यांनी माडले.
उपोषण स्थगीत |
आज मितीस हा तपास "पोलीस यंत्रणा, "संशयीत आरोपी" आणि "तक्रारदार" यांच्यात वेदांतचा आवाज दबला आहे. काय खरे काय खोटे, यावरील पडदा उघडण्यासाठी एसपी ईशु सिंधू यांनी प्रयत्न सुरू केले आहे. त्यासाठी त्यांनी पोलीस उपअधिक्षक नकुल पंडित, पोलीस निरीक्षक प्रविणकुमार लोखंडे, पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील या विशेष पथकाची नेमणूक केली आहे. आता पंडीत आणि गाडे ही दोघे या प्रकरणात नवखे आहे. घटनास्थळ आणि स्थानिक पातळीचा तपास संपल्यात जमा आहे. त्यामुळे करतील ते पाटील आणि लोखंडे हेच वेदांतसाठी "देवदूत" म्हणून तारक ठरतील असे अकोलेकरांना वाटते. बाकी लोखंडे आणि पाटील यांचा इतिहास तपासला तर ते क्राईम डिटेक्शनमध्ये मास्टर मानसे आहेत. त्या तुलनेत गाडे यांची कार्यकिर्द सर्वद्न्यात असून वेंदात देशमुख प्रकरणात त्यांचा खरा कस लागणार आहे. जर, महिनाभरात काही रिझल्ट मिळाला नाही तर, ही जनता त्यांच्याच विरोधात आता रस्त्यावर उतरेल यात शंका नाही.===================
-- सागर शिंदे
(संपादकीय)
------------------------
जाहिर आभार
----------------------------------
प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने ३० दिवसात ५९ बातम्यांच्या जोरावर ३ लाख ७७ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी व निर्भीड शब्दांमुळे आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
---धन्यवाद ---
आपला
-------------------------------------------