"जेव्हा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे" आ. "संग्राम जगताप" यांचे एसपींना 'पत्र'...!
संयमाचा संग्राम |
अहमदनगर (प्रतिनिधी) :-
"आयुष्यभर" लोक ज्याला "आदर्श" मानतात, ज्याने "ऊभ्या आयुष्यात" कोणाचे वाईट केले नाही किंवा "चारित्र्य जपले" अशा व्यक्तीवर अचानक "गुन्हेगारीचा ठपका" लागतो. त्यावेळी त्याची "खंत आणि सल" काय असते हे आजवर अनेकांनी अनुभवले आहे. असाच काहीसा प्रकार "प्रथम महापौर भगवान फुलसौंदर" आणि "आमदार संग्राम जगताप" यांनी अनुभवला आहे. त्यामुळे विरोधी पक्षाचे असून देखील संग्राम जगताप यांनी फुलसौंदर यांच्यावर झालेल्या गुन्ह्याची चौकशी करावी असे "पत्र" एसपी साहेबांना दिले आहे. त्यामुळे खरोखर त्यांच्या "मनाचा मोठेपणा" दिसून आला आणि ज्यांनी त्यांना "आरोपाच्या पिंजऱ्यात" बसविले, त्यांच्या न बोलता "कानाखाली चपराख" बसली आहे. अशा प्रतिक्रिय सोशल मीडियातून उमटू लागल्या आहेत.
खऱ्याला खरे म्हणा, खोट्याला खोटे |
सगळ्या राज्यात कोठेही नाही, इतके "गलिच्छ आणि घानेरडे" राजकारण नगरमध्ये होते. एखाद्याला पाडण्यासाठी "बाई बाटली आणि पैसा" यांचा नको तसा वापर होतो. तर "राजकीय वैमनस्य" काढण्यासाठी एखादी मोठी घटना घडली तर त्याचे 'राजकारण' करून भल्या-भल्यांना पळता भुई थोडी केली जाते. हे केडगाव प्रकरणात आपण पाहिले आहे. एखादा मोठा होत असल्याचे डोळ्यात सलले की त्याचे पाय खेचायला "प्रस्तापित व्यक्ती" किंवा "तोतया समाजसेवक" कोणत्या निच थराला जातील याचा काही नियम नाही. नगरची थेरी म्हणजे एखाद्याचा काटा काढायचा असेल तर "ओरडायचे कमी आणि कन्हायचे जादा" असे प्रकार सर्रस पहायला मिळतात. म्हणजे आपल्या जवळच्याचे काही चुकत असेल तर त्याला समजून सांगायचे नाही. मात्र, त्याची गरळ दुनियाभर ओकायची. आणि वेळप्रसंगी व्यक्ती संपवून टाकण्यासाठी व्युहरचना आखायची असली "राजनिती" फोफावत चालली आहे. आणि तो वाईट कसा होता याचा अपप्रचार करायचा. हे जमूजाणे ते नगरी लोकांनाच.
शहरात "मुस्लिम कम्युनिटी" जास्त आहे. त्यांच्यात जर वाद झाले तर त्यांच्या "एफआयआर" पहायच्या. भली मोठी नावांची यादी असते. सगळं "खानदान" आणि त्यांचे "नातेवाईक" देखील 'आरोपी' म्हणून कागदावर घेतले जातात. खाकीला काय ! मज्जाच. नाव वगळायचा म्हणजे खूप मोठी "अर्थ"पुर्ण तडजोड करायला संधी स्वत:हुन चालत येते. यातून "सामाजिक" आणि "कौटुंबिक तेढ" अगदी मरेपर्यंत टिकून राहते. अशावेळी 'मध्यस्ती किंवा सलोखा' म्हणून कोणी पुढे येत नाही. पण, तेल ओतायची कामे त्यांच्याकडून अगदी चोख पणे पार पाडले जाते.
एक गोष्ट आवर्जुन नमूद करावी वाटते, पोलीस प्रशासनाने "दरोडे, खून, मारामाऱ्या" म्हणजे जी "सराईत गुन्हेगारी" आहे त्यावर अंकुश बसविण्यात "खाकी" कोठेच कमी पडली नाही. सोपान गाडे, गणेश भुतकरचे मारेकरी, पिन्या कापसे, रम्या भोसले, चन्या बेग यांच्यासह अनेक सराईत टोळ्या "गजाआड" केल्या. पण, शहरातील "सामाजिक आणि राजकिय आश्रयाने" चालणारी "गुन्हेगारी" संपविण्यात एकाही अधिकाऱ्याला यश आले नाही. तो प्रयत्न तत्कालिन एसपी "लखमी गौतम" यांच्याकडून झाल्याचे पहायला मिळाले. कारण, त्यांनी एका "आमदाराला" जुन्या एसपी कार्यालयातून हकलून दिले होते. नंतर त्यांनी लोकप्रतिनिधीचा अवमान झाला म्हणून 'पत्रकार परिषद' घेतली. तसेच पोलीस मुख्यालयातील "राजकीय हेलीपॅड" उखडून फेकले. त्यानंतर, ना. विखे साहेबांशी त्यांचे वाद सर्वद्न्यात आहे. इतकेच काय त्यांनी मीडियाला सुद्धा जुमानले नाही. अशा अनेक कारणामुळे त्यांना अवघ्या आठ महिन्यात नगरला "बळजबरीचा रामराम" ठोकावा लागला.
एसपी ईशु सिंधू साहेब |
पोलिसांनी छापे मारले की, लगेच भैया भाऊ, दादा, मामा, काका यांचे फोन येणार. मारामाऱ्या झाल्या की राजकीय फौजफाटा पोलीस ठाण्यात दाखल. दोन पक्ष एकमेकांना भिडले की मग "एफआयआर" पहायच्या दरोडा (३९५) आणि खूनाचा प्रयत्न (३०७) चोऱ्या (३७९) यांच्याशिवाय कलमे लागत नाहीत. हे किती टेकनिकल आहे हे माहित असूनही पोलीस गुन्हे दाखल करून घेतात. घेण्याची हतबलता असते तर अटक करण्याची घाई का केली जात नाही ? आणि नेहमी असेच होत नसेल तर कलम कायदा आणि धाक असा काही प्रकार नाहीच का ? असाही प्रश्न पडतो. त्यामुळे सरकार, प्रशासन आणि दबावतंत्र. हे सर्व अनाकलनिय आहे. याची किंमत केडगाव सारख्या घटनेतच कळून येते.
ही घटना घडली तेव्हा आमदर असणाऱ्या व्यक्तीला पक्षाने अगदी वाऱ्यावर सोडले. तर केसरकर नगरात ठाण मांडून होते. त्यामुळे आपलेच आपल्यामागे वेळप्रसंगी उभे राहतील हा देखील गैरसमज भल्याभल्यांनी काढून टाकावा. म्हणून तर "फुलसौदर" हे कोणत्या पक्षाचे आहे हे महत्वाचे नाही. पण, त्यांच्यावर झालेली एफआयआर ही खोटी असेल तर नक्कीच ती "ए बी सी" ज्या कोणत्या समरीत बसेल त्याची अंमलबजावणी करण्याची विनंती संग्राम जगताप यांनी केली आहे. ९० दिवस आत राहिल्याने त्या खोट्या आरोपांची सल काय असते हे "जेव्हा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे" या म्हणीतूनच प्रतित होते. जगताप यांच्या या पत्राने नक्कीच राजकीय सलोखा निर्माण होईल असे नगरकरांना वाटते आहे.=====================
-- सागर शिंदे
=====================
जाहिर आभार
----------------------------------
प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने ३७ दिवसात ७३ बातम्यांच्या जोरावर ४ लाख २३ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी व निर्भीड शब्दांमुळे आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
---धन्यवाद ---
आपला
-------------------------------------------