"मुख्यमंत्री दौरा" म्हणजे "झिरो बजेटचा क्रुत्रीम विकास" सगळ्यांची "पळापळ"..!
अकोले/संगमनेर :-
जनतेकडून मुख्यमंत्र्यांच्या "महाजनादेश" यात्रेचे "कौतुक" काही औरच होऊ लागले आहे. कारण, कधी नव्हे, पण "बरगडी ढिल्ली" करणारे रस्ते आता थिगळं दिल्याने "प्लेन" दिसू लागले आहेत. झाडा-झुडपांची तोड होऊ लागली आहे. रस्त्यात "वाकलेले विजेचे खांब" ताठ उभा राहिले आहेत. तर अगदी 'बैलगाडीला' लागणाऱ्या "वीजतारा" उंच-उंच गेल्या आहेत. इतकेच काय, रस्त्यांची सफाई होऊन "तालुका स्वच्छ" असल्याचा "कांगावा" स्थानिक लोकप्रतिनिधींची यंत्रणा करताना दिसत आहेत. त्यामुळे या यात्रेला तात्पुरता "क्रुत्रीम विकास" असे म्हटले असते तर वावघे काय ? असा प्रश्न "जनतेला" पडला आहे. कारण, जे काही चालु आहे. ते निव्वळ "शोभा वाढविण्यासाठी" आहे. त्याचा कोणताही फायदा जनतेला नाही. त्यामुळे "स्वत:ची काळजी" घेण्यासाठी सरकार किती "यंत्रणा वेठीस" धरते. मात्र, "खड्ड्यांनी" कोणाचा बळी गेला तरी सरकार सुस्थ झोपतं. त्यामुळे "आपलं ते पोरगं आणि लोकाचं ते कारट" अशीच भुमिका सरकारने घेतल्याचे जनतेला वाटते आहे. खरे पाहता कालवर जनता रस्त्यांची डागडूजी मागत होती. पण, निधी नाही असे म्हणून टोलवा-टोलवी झाली. आज मुख्यमंत्री येणार तर कोठून आला यांच्याकडे निधी, प्रशासनाने कोठे दरोडा टाकला का ? कोठून केली निधीची फिरवा-फिरवा हा सर्व "झिरो बजेटचा क्रुत्रीम विकास" आहे. अशी टिका मतदारांकडून होत आहे. त्यामुळे उद्याचे सरकार कोणाचे हे जनतेतील "सुप्त लाटच" ठरविणार आहे. असे जाणकारांना वाटते.
गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी !
गेली ५० वर्षे अकोले तालुक्यात अजूनही "मुलभूत सुविधा" दुर्गम आदिवासी समाजापर्यंत पोहचली नाही. याला कारण कोण ? हे शोधण्यासाठी "साहेबांच्या अध्यक्षतेखाली" एक समितीच नेमली पाहिजे. गेल्या "पाच वर्षात भाजप सरकारमुळे विकास खुंटला" असे जर कोणाला वाटत असेल तर ते आम्हालाही मान्य आहे. मात्र, "४० वर्षे" कोणामुळे विकासाची "प्रगती खुंटली" या प्रश्नाचे उत्तर कोणीच कसे द्यायला समोर येत नाही. ज्यांनी आजवर "विरोधी भुमिका" बजावली त्यांनी "हातमिळवणी" केली आणि खऱ्या अर्थाने "जनतेची दिशाभूल" केली. नाहीतर "१९९५" वगळता पिचड साहेबांना अकोल्याने एकदाही "लिड" दिले नाही. जनतेला "पक्षबदल" नको आहे. "परिवर्तन" पाहिजे आहे ते प्रतिनिधीत्वामध्ये" असे सरळ-सरळ जनतेला वाटते. पण, आजवर "कुंपनच शेत खातय" हे जनता ओळखून चुकली आहे. म्हणून आता फक्त "डॉ. लहामटे" याच्यावर जनतेने 'विश्वास' टाकल्याचे "सोशल मीडियातून" पहावयास मिळत आहे.विकास हा तर एक बहाना, लाल दिवा हाच खरा निशाना ! |
"अश्वासनांची पाटीलकी" |
येणार साहेब माझा...! "श्रमदान" |
बलिदान करू, तारा उंच उंच चढवू |
असो..! ईव्हीएम, ईडी, पक्षांतर, निष्ठा, पक्ष, यात्रा या सर्वांशी अकोलेकरांना घेणेदेणे नाही. उद्याच्या काळात कोणीही आमदार होवो. खरोखर अकोल्याचा विकास होवो, राेजगार, शिक्षण, मुलभूत गरजा, पाणी, शेतमालाचा भाव, पर्यटन, रस्ते, दळणवळण, बाजारपेठ अशा अनेक समस्या सुटोत असेच जनतेला वाटते आहे.=====================
-- सुशांत पावसे
(संगमनेर प्रतिनिधी)
=====================
जाहिर आभार
----------------------------------
-- सागर शिंदे
------------------------ -----------------------------------जाहिर आभार
----------------------------------
प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने ३८ दिवसात ७३ बातम्यांच्या जोरावर ४ लाख २५ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी व निर्भीड शब्दांमुळे आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
---धन्यवाद ---
आपला
-------------------------------------------