"भांगरे, तळपाडे, डॉ. लहामटे, मेंगाळ खुद्द शरद पवाराच्या भेटीला" काय ठरलं पुणे करार बैठकीत.!


दोघांचेही राजकारण संपवायचे आहे !

     अकोले (प्रतिनिधी) :- दि. २४ डिसेंबर १९३२ रोजी "डॉ. बाबासाहेब आंबेडकर" व "महात्मा गांधी" यांच्यात "समझोता" म्हणून "पुणे करार" झाला होता. अर्थात त्या चारही मागण्या "सामाजिक अभिसरणासाठी" होत्या. असेच "राजकीय अभिसरण" अकोल्यात घडवून आणण्यासाठी शरद पवार यांनी पिचड विरोधकांशी अकोले समझोता करार केल्याची माहिती हाती आली आहे. कारण, आत्तापर्यंत "४० वर्षे" शरद पवारांच्या "बोटाला धरून" मधुकर पिचड आणि वैभव पिचड यांनी "राजकारण" केले. मात्र, "सत्तेच्या म्हणा" की "इडीच्या भितीपोटी" त्यांनी भाजपात प्रवेश केला. केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या "अत्यंत पडत्या काळात" पिचड साहेबांनी साथ सोडली तो निर्णय पवार साहेबांच्या चांगलाच "जिव्हारी" लागला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. म्हणून या "फितुरीचा वचपा" काढण्यासाठी पवारांनी "सगळे विरोधक" बुधवार दि.२८ रोजी दुपारी पुण्यात बैठकीसाठी बोलविले होते. यात अशोक भांगरे, डॉ. किरण लहामटे, मधुकर तळपाडे, सौ. सुनिता भांगरे, मारुती मेंगाळ, एस. भांगरे या सर्व विरोधकांचा सामावेश होता. आता "एकास एक लढत" करायची. असा निर्धार झाल्याची माहिती "गोपनिय" सुत्रांनी दिली आहे. 
               

पिता.............पुत्र

               आजवर स्वत: शरद पवारांनी जे मनावर घेतले ते तडीसे नेले. हे "श्रीगोंदा" निवडनुकीत "बबनराव पाचपुते" यांनी पाहिले आहे. कालवर "राजमिजासात" फिरणारे  पाचपुते यांचे आज काय हाल आहेत. तेच हाल "पिचड कुटुंबियांचे" पहायला आवडेल. अशाच काहीशा "भावना" पवार साहेबांनी व्यक्त केल्या आहे. त्यामुळे कधी नव्हे इतक्या मोठ्या व्यक्तीने सगळ्यांशी "मध्यस्ती" करून "पिचडांच्या पराभवाचे बांधकाम" सुरू केल्याचे दिसत आहे. जर हा "श्रीगोंदा पॅटर्न" अकोल्यात यशस्वी झाला तर पिचड साहेबांना ना "घरका ना घाटका" त्यात "बनावट जातीचा दाखला" प्रकरण. या सर्वांतून ते सावरतील असे वाटत नाही. त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेशाचा निर्णय म्हणजे "करायला गेले गणपती आणि झाली मारुती" असे व्हायला नको. यासाठी पिचडांनी "मोर्चेबांधनी" सुरू करणे गरजेचे आहे. असे सामान्य कार्यकर्त्यांना वाटते आहे.

विजय फेटा कोणाला, भांगरेंच्या हाती !

        गेली अनेक वर्षे पिचड साहेबांनी "अकोल्यावर निर्विवाद वर्चस्व" गाजविले. त्यांना जनतेने स्विकारले. असे आपण  एकतो. पण, एक गोष्ट नमुद करावीशी वाटते. १९९५ ची अपवादात्मक निवडणुक वगळता. साहेबांनी कोठेही "एकतर्फी किंवा फारसे लिड" घेऊन निवडणुक जिंकल्याचे पुरावे इतिहास देत नाही. पण, हो..! प्रत्येकवेळी अगदी "अटातटीची व काट्याची टक्कर" होऊन त्यांनी गुलाल उधळलेला आहे. १९९९ साली अशोक भांगरे यांनी अगदी सगळी ताकद पणाला लावली आणि उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर अकोल्यात भगवे वादळ गुंजून गेले. तेव्हा अवघ्या दोन हजार दोनशे मतांनी भगवा सन्मानाने फडकू शकला नाही. त्यानंतर तळपाडे साहेब उभे राहिले तर भांगरे साहेब प्रतिस्पर्धी उभे रहात होते. तर यांच्या व्यतिरिक्त अन्य गट-तट मतांच्या विभाजनात भर घालून पिचड साहेब अगदी दहा ते पाच पंधरा हजारांच्या लिडने निवडून येत राहिले. अर्थात ही मते एक झाली असती तर पिचडांचा पराभव शक्यतो यापुर्वीच पहायला मिळाला असता. पण, दुर्दैवाने तसे झाले नाही.
         

अब की बार एकास एक उमेदवार !

 आज पिचडांच्या डोक्यावर असणारा पवारांचा वरदहस्त निखळून पडला आहे. त्यामुळे फडणवीस महोदय काय करतील ते खरे. मात्र, दगाबाजी करून निष्ठावंत म्हणून घात केल्यानंतर पिचडांवर कारवाईस करण्यास भाग पाडणार नाही. ते पवार कसले. त्यामुळे ही राजकिय गणिते खूप गुंतागुंतीचे होत चालले आहे. आजवर साहेबांच्या काळजात घर करून बसलेल्या व्यर्तींना त्यांनी घासातला घास दिला. पण, तरी देखील त्यांनी घात केला. अशांचे राजकारण साहेबांनी गैरेज पार्कींगला लावले आहे. हे श्रीगोंदा येथील बबनराव पाचपुते यांच्या रुपाने सगळ्या राज्याने अनुभवले आहे. आता त्याची पुनरव्रुत्ती अकोल्यात होणार आहे. म्हणून तर पवारांनी भांगरे, तळपाडे, लहामटे व मेंगाळ ही सर्व मंडळी एकत्र बसविली आहे. जर हे सर्व एक झाले तर जनतेच्या मनात जी पिचडांच्या विरोधात सुप्त लाट आहे. ती प्रत्यक्षात अमलात येईल आणि त्यांना पराभवाला सोमोरे जावे लागेल. ज्याप्रमाणे शेजारी आ. बाळासाहेब थोरात मताधिक्याने विजयी होतात. तसे अकोल्यात चित्र नाही. जनतेने त्यांना नेहमीच नाकारले आहे. त्यांना फायदा फक्त मत विभाजनाचा होतो. त्यामुळे ते विजयी होत आले आहे.

अकोल्याचे काऊंट-डाऊन सुरू !

          आता सर्व पिचड विरोधकांनी एक येण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते आहे. पवार साहेबांनी त्यांना काय कानमंत्र दिला. हे अद्याप गुलदस्त्यात असेले तरी साहेबांच्या या भुमिकेमुळे पिचडांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे दिसते आहे. अजून घोडा आणि मैदान जवळच आहे. भाजप सेना युती नक्ती नाही. त्यामुळे सद्यातरी वेट अॅण्ड वॉच हिच भुमिका योग्य राहणार आहे.

 ============

        -- सागर शिंदे 

   ------------------------  -----------------------------------

         जाहिर आभार
----------------------------------
 प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने  ४१ दिवसात  ७६ बातम्यांच्या जोरावर  ४ लाख ७० हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी व निर्भीड शब्दांमुळे  आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
                          ---धन्यवाद ---
                              आपला
-------------------------------------------

        "सार्वभाैम संपादक

     

                     - सागर शिंदे