" आठवले दौरा" तो एक "बहाना" था ! "संगमनेर" पर भाजपका "निशाना" था !"

"वेलकम" फॉर संगमनेर "मिशन"

संगमनेर (प्रतिनिधी) :- 
 "केंद्रीय मंत्री" रामदास आठवले म्हटलं की सगळ्यांना "चारोळ्या" आठवतात. "नेता कवी तर कार्यकर्ते कसे असणार" ! पण, त्यांनी जर ठरविले तर "किंग मेकरची" भुमिका ते नेहमी पार पडतात. हे अनेकदा त्यांनी "सिद्ध" केले आहे. त्यामुळे संगमनेरात "थोरातांच्या  बालेकिल्ल्यावर" एक " तोफेचा गोळा" म्हणून काल आठवले यांच्या रुपाने "जय भिमचा नारा" संगमनेर शहरात गुंजला. ही एक मर्गळ आलेल्या कार्यकर्त्यांसाठी नवसंजीवणी म्हणून चाल असल्याचे बोलले जात आहे. अर्थात कालची "पत्रकार परिषद" आणि "रस्त्यांच्या कामांचे उद्घाटन" हा तर एक "बहाना" होता. त्यामागे थोरातांच्या बालेकिल्ल्यावर भाजपचा अद्रुष्य निशाना होता. असेच बोलले जात आहे. कारण, असे विशेष काहीच नसतांना आठवले यांचा दौरा. म्हणजे विशेषच वाटते. मंत्री झाले म्हणून कार्यकर्त्यांचा मेळावा राहुरीत घेण्यात आला होता. त्यामुळे दौऱ्याचे इनपुट-आऊटपुट काय हे देवजाणे. पण, संगमनेरात त्यांनी ठराविक कार्यकत्यांची बैठक घेऊन कमळ म्हणजे कमळ चालले पाहिजे. असे आदेश दिले आहेत. कारण, केंद्रात आणि राज्यात रिपाईत कमळामुळे सुगंध दरवळला आहे. त्याचे प्रॉफिट म्हणून त्यांच्यावर हा दबाव असणे सहाजिक आहे. संगमनेरात चांगले काम करा "थोरातांना पाडा" असे म्हणून त्यांनी ज्येष्ठ नेत्यांना महामंडळावर घेण्याचे अश्वासन देखील दिल्याचे समजते आहे.

ही काय नवीन डोकेदुखी ! आठवलेंना कुणी पाठवले !

        परंतु काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब  थोरात यांना शह देणे वाटते तितके सोपे नाही. जसे "सिकंदरवर" चाल करायला "चंद्रगुप्त व चाणक्यने" छोटेछोटे राज्य सोबत घेतले होते. तेव्हा त्यांना  "अखंड भारत" निर्माण करता आला. आता अशाच पद्धतीची "चाल" भाजपकडून खेळली जात आहे. सध्या काँग्रेसकडे एकच "सगमनेरी सिंकदर" आहे. त्यांचा पराभव करण्यासाठी "आठवले" नावाची "ढाल" वापरण्यात आल्याचे दिसून आले. तर छोट्या-छोट्या मित्रपक्षांची ताकद वाढविण्याचे काम सुरू आहे. याचे कारण म्हणजे, नगर उत्तर जिल्ह्यात "दलितांच्या मतांचे" चांगले" प्राबल्य" आहे. त्यात ना. विखे, व आ. थोरात यांच्याकडे "संस्थात्मक" तर विजय वाकचौरे यांच्या "कुशल नेत्रुत्वामुळे" मागासवर्गीयांची मोठी "व्होटबँक" आहे. ही सर्व मते आजवर विभागली गेली होती. त्यात "वंचित आघाडीचा" मोठा फटका "रिपाईला" बसला होता. त्यामुळे कालपर्यंत "आठवले त्यांच्याच कार्यकर्त्यांना आठवत नव्हते". मात्र, "प्रकाश आबेडकर" यांच्या काही भुमिका आणि "नरेंद्र व देवेंद्र" सरकारने "आठवले व महातेकर" यांनी "मंत्रीपदे" दिल्याने "वंचितची ६० टक्के हवा वितळून" गेल्याचे दिसते आहे. अशात आठवले यांच्या दौऱ्याने संगमनेरात रिपाईने पुन्हा उभारी घेतली आहे. "थोंबे-थेंबे तळे साचे" असे करीत संगमनेरात छोट्या पक्षांचे संघटन बाधण्याचे काम सरू आहे. असे झाल्यास थोरातांचा पराभव करणे भाजपला शक्य होणार आहे. तसेही थोरात साहेब छोटे पक्ष, मागासवर्ग, अल्पसंख्यांक, दलित प्रतिनिधीत्व मानायला तयार नाहीत. हे लोकसभेत अनुभव आला. त्यामुळे जो ग्राह्य धरतो, त्याला साथ नाही. असे मत मागासवर्गीयांनी मांडले आहे. त्यामुळे आजचा संगमनेर दौरा साहेबांना चांगलाच महागात पडू शकतो. हे येणारा काळच सिद्ध करून देईल असे विश्लेषकांना वाटते.

मी काय केले विचारू नका ! मोदींनी काय केले ते वाचून दावतो एका..!

           दरम्यान गुंजाळवाडी येथे "प्राध्यापक" काॅलनीतील आरसीसी रस्त्याचे लोकार्पण केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.
संगमनेर महाविद्यालयासमोर असलेल्या प्राध्यापक काॅलनतील रस्त्याची आवस्था अतिशय बिकट झाली होती. या रस्त्याच्या विकासाकरिता मंत्री आठवले यांनी १० लाखाचा निधी उपलब्ध करून दिल्याने या रस्त्याची समस्या कायमस्वरूपी मिटली आहे.
शुक्रवारी विविध कार्यक्रमाना उपस्थित राहाण्यासाठी नगर जिल्ह्याच्या दौर्यावर आलेले मंत्री रामदास आठवले यांच्या शुभहस्ते या रस्त्याचे उद्घाटन करण्यात आले. यानिमिताने आरपीआय भाजप शिवसेना यांनी मंत्री आठवले यांचे शक्तिप्रदर्शन करून जोरदार स्वागत केले. नाशिकहून आगमन होताच मंत्री रामदास आठवले आणि महायुतीच्या जयजयकाराच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. तसेच प्राध्यापक कसबेसर व ग्रामपंचायत सदस्य शतानंद खामकर यांनी वारंवार पाठपुरावा केला. तालुक्यातील महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच प्राध्यापकांनी मंत्री आठवले यांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञतापुर्वक सत्कार केला.

विजय वाकचौरे (राज्यसचिव)

           यावेळी आरपीआयचे महासचिव विजयराव वाकचौरे, दिपक साळवे, माणिकराव यादव, शिवसेनेचे तालुका प्रमुख जनार्दन आहेर, पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, बीजेपी तालुका अध्यक्ष काशीनाथ पावसे, राम जाजू, राजेंद्र देशमुख, नगरसेविका सौ. मेघा भगत, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, सुधाकर गुजाळ, सुदाम ओझा, गुंजाळवाडीच्या सरपंच वंदना गुंजाळ, सदस्य नामदेव गुंजाळ, शतानंद खामकर, प्रा.भगवान जोशी, प्रा.भांगरे, प्रा.श्रीरंग तलवारे, आदीसह महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
====================

         -- सुशांत पावसे

                  सागर शिंदे
====================