"मुख्यमंत्र्यांची संगमनेर मोहीम फसली; थोरातांच्या बालेकिल्याचे बुरुंज जैसे थे ! महाजनादेश फौज दक्षिणेकडे..!
कोणताच पॅटर्ण कसा लागू पडेना इथे ! |
महाराष्ट्र "काँग्रेस प्रदेश अध्यक्ष" मा. बाळासाहेब थोरात यांच्या "बालेकिल्ल्यात" स्वत: "ना. विखे, खा. विखे व सौ. विखे" या तिघांनी "सुरूंग" लावायला सुरूवात केली आहे. पण, "थोरातांनी किल्ल्याची बांधनी" अगदी "रायगडासारखी" भक्कम उभारली आहे. त्यामुळे "विखेंच्या तोफा" त्यावर चारही बाजुंनी धडकल्या तरी "खिंडार" पडेल असे वाटत नाही. हा "संगमनेरी मतदार बुरूंज" पाहता "दिल्लीच्या तख्ताहुन" आलेले आदेश घेऊन "मुख्यमंत्री" स्वत: संगमनेरवर चालून आले होते. मात्र, निसर्गाने त्यांची स्वारी "नेस्तनाबुत" केली आणि "भाजप फौज" माघारी परतली ती एकदा "कोल्हापुरच्या महापुराने" तर दुसऱ्यांदा "अरुण जेटली" यांच्या निधनाने. अखेर "सह्याद्रीवर" देवेंद्र आणि नरेंद्र हा फॅक्टर लागू झाला नाही. तसेही पुरातन पाने उचकली असता लक्षात येते की; वसंत नाईक, विलासराव देशमुख, नारायण राणे, प्रुथ्वीराज चव्हाण, सुशिलकुमार शिंदे असे ज्या मुख्यमंत्र्यांनी "संगमनेरात" जाऊन "राजकीय आक्रमण" केले. त्यांना "मुख्यमंत्री पदाहुन पायऊतार व्हावे लागते आहे". हा "इतिहास" आहे. त्यामुळे फडणवीस यांनी "रविवारची मोहीम रद्द" करून सोमवारी "दक्षिनेवर स्वारी" करणे पसंत केले. त्यामुळे अकोल्यात डॉ. किरण लहामटे आणि संगमनेरात थोरातांनी "सुटकेचा श्वास" सोडला आहे. असे विश्लेषकांना वाटते.
संयमाने घ्या, वेळेकडे उत्तर आहे ! |
आज भाजपने काँग्रेसला लोकसभेत "नेस्तनाबुत" केले. त्यासाठी "वंचितचा" आधार घेण्यात आल्याच्या टिका झाल्या. त्यामुळे आता विधानसभेत भाजपने "काँग्रेसच्या मुळावर घाव" घालण्याचा मानस आखला आहे. "विखे व थोरात" कुटुंबाच्या वादात मुख्यमंत्र्यांनी "हातभार" लावायला सुरूवात केल्याचे दिसत आहे. त्यामुळे "राजकीय दृष्ट्या केंद्रभूत" झालेल्या संगमनेर तालुक्यात "राजकीय भूकंप" घडविण्याचे "मनसुबे" मतदार संघातील भाजप नेते व कार्यकर्त्यांनी रचले होते. कार्यक्रमाची जय्यत तयारी संगमनेर मध्ये दिसत होती. अकोले नाका, दिल्ली नाका, संगमनेर बसस्थानक महत्वाच्या ठिकाणी राजकीय नेत्यांनचे बॅनर्स, पक्षाची झेंडे लावण्यात आले होते. थोरात गटातील अनेक "अत्रुप्त आत्मे" भाजपशी सलग्न झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी आणि "चमकोगिरीसाठी" त्यांनी "गुढग्याला बाशिंग" बांधले होते. मात्र, त्यांचे स्वप्न भंगल्याचे सगळ्या जनतेने पाहिले.
बॅनर का जबाब बॅनरसे !!! |
अर्थात आ. थोरातांचे काम अगदी "बुथ निहाय" असते. त्यांचा मतदार वर्ग "प्रोफेशनल" आहे. व्यापारी, डॉक्टर आणि हितसंबंधी मतदान त्याना निवडून आणण्यासाठी पुरक आहे. मात्र, या "मतदारसंघाच्या जबड्यात हात घालुन दात मोजायचे" असतील तर नक्कीच "तीन विखे" आणि "मुख्यमंत्र्यांसह दिल्ली दरबारातून एक तरी वारी संगमनेरी" झाली तर ठिक. नाहीतर "संगमनेरचा बादशाह" आपला "गड कायम राखण्यात यशस्वी" होईल. असे आम जनतेस वाटते.
आजची मोहिम रद्द झाली, कळावे !
दरम्यान आता मुख्यमंत्री दौरा इकडे होईल असे चित्र सद्या वाटत नाही. पण, निवडणुकांचे बिगूल वाजताच पहिल्याच तडाख्यात संगमनेर टारगेट होऊ शकते.=====================
-- सुशांत पावसे
(संगमनेर प्रतिनिधी)
+91 83081 39547
+91 83081 39547
=====================
जाहिर आभार
----------------------------------
-- सागर शिंदे
------------------------ -----------------------------------जाहिर आभार
----------------------------------
प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने ३९ दिवसात ७५ बातम्यांच्या जोरावर ४ लाख ३८ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी व निर्भीड शब्दांमुळे आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
---धन्यवाद ---
आपला
-------------------------------------------