"कारवाई होत नसेल" तर "मरायला परवानगी" द्या; संगमनेरच्या "शिवसैनिकाचा" मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर "आत्मदहनाचा" ईशारा...
संगमनेरचं दुखनं इथपर्यंत आलं राव ! |
संगमनेर तालुक्यात प्रशासनाचा इतका अंदाधुंदी कारभार चालु आहे की त्यांच्या मनमानीला काही सिमाच राहिल्या नाही. अर्थात हि हमरुषी ठेेकेदारी, तहसिल, पोलीस, वितरण यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे हेे ना. विखे यांनी कालच नमुद केले आहे. या चिठ्या चपाट्यांनी आणि ठरावीक ठेकेदारांनी संगमनेर लुटल्याचे चित्र दिसत आहे. अर्थात इथे कितीही हुकूमशाही गाजवली जात असली तरी माहिती अधिकारात त्याला वाचा फुटत आहे. बस स्थानक, क्रुषी, आरोग्य, शिक्षण, सहकार यांच्यात घोटाळे होतच आहे. तर संगमनेरात वाळु तस्करांनी उच्छाद मांडला आहे. आवाच्या सव्वा बिले आणि अवैध उपसा. यामुळे प्रवरामाई पुरती नग्न करुन सोडली आहे. यावर सामाजिक कार्यकर्ते आवाज उठवायला गेले की, त्यांची गळचेपी केली जात आहे. माहिती अधिकारातून भलेही दलाली आणि गळचेपी होत असल्याचे दिसते आहे. मात्र, सागळेत त्यातले नसून काही धक्कादायक प्रकार समोर येत आहे. त्यातला एक प्रकार म्हणजे
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी अनधिकृत वाळुसाठे अधिकृत दाखवताना सादर केलेल्या बनावट वाळू वाहतूक पासांचे पुरावे देऊनही सबंधित ठेकेदार कंपनीला पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश धात्रक यांनी केली आहे. या प्रकरणी कारवाई न झाल्यास मरणार परवानगी द्यावी किंवा १५ ऑगस्टला मुंबईत वर्षा बंगल्यासमोर विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा इशारा धात्रक यांनी दिला आहे.
संजय राऊत आणि गणेश धात्रक |
सबंधित ठेकेदार कंपनीने सरकारची फसवणूक केली असून पुरावे देऊनही कारवाई केली जात नाही. बनावट वाळू वाहतूक पासांचे पुरावे देऊनही सबंधित कंपनीला पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर १४ ऑगस्ट पर्यंत कारवाई न झाल्यास १५ ऑगस्टला मुंबईत वर्षा बंगल्यासमोर विषप्राशन करून आत्महत्या करणार असल्याचे धात्रक यांनी निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्री, महसूलमंत्री तसेच राज्याच्या मुख्य सचिवांना पुराव्यासहीत निवेदन दिल्याची माहिती धात्रक यांनी दिली. मात्र, अध्यापही प्रशासनाने दाखल घेतली नसल्याचे धात्रक यांनी सांगितले.
I want Suicide |
सरकारला धात्रक यांनी काही दिवसांचा अल्टीमेट दिला होता. त्यातील एक दिवस बाकी आहे. कारवाई न झालेल्या या शिवसैनिकाने जो इशारा दिला आहे. तो पुर्ण करण्यासाठी त्यांनी घर सोडल्याची माहिती सुत्रांनी दिली. आता तहान लागली की प्रशासन विहीर खोदू पहात आहे. पोलीस धात्रक यांच्या शोधात असून ते "आऊट आॅफ कव्हरेज क्षेत्र" आहे. त्यामुळे या प्रकाराकडे प्रशासन किती गांभिर्याने पाहते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.=====================
-- सुशांत पावसे
(संगमनेर प्रतिनिधी)
---------------------- ---
जाहिर आभार
----------------------------------
प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने २८ दिवसात ५७ बातम्यांच्या जोरावर ३ लाख ६५ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी व निर्भीड शब्दांमुळे आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
---धन्यवाद ---
आपला
-------------------------------------------