"४० वर्षे" तळेगावात "भोजापुर व निळवंड्याचे" पाणी आणता आले नाही. ते भोजपूर "ओव्हरफ्लोचे" पाणी "पिंपळेत" आणण्याचे "श्रेय" घेऊ लागलेत - चकोरांचा "थोरातांना टोला"...!

भोजापुरचं पाणी श्रेयवादानं ढवळीलं

संगमनेर (प्रतिनिधी) :-
                 अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामधील कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या निमोण तळेगाव निमोण-तळेगाव परिसरासाठी काही अंशी वरदान ठरलेले भोजापुर धरण सध्या पूर्णपणे भरले असून म्हाळुंगी नदीमध्ये ओव्हर फ्लो चे पाणी सुरू आहे. यावर्षी भोजापूर धरण शुक्रवार दिनांक २ ऑगस्ट 2019 रोजी ओव्हर फ्लो झाले असून दिनांक 4 ऑगस्ट पासून  कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आलेले आहे. भोजापूर धरणांमधील ओव्हर फ्लो चे पाणी निमोन तळेगाव परिसरा तील गावतळे, पाझर तलाव, साठवण बंधारे व लपा तलाव इत्यादीमध्ये सोडून भरून देण्यात यावे अशी मागणी 3 आॅगष्ट 2019 रोजीच भोजापूर पाटपाणी कृती कृती समितीचे निमंत्रक इंजिनियर हरिचंद्र चकोर यांनी जाहीरपणे मा. मंत्रीमहोदय, जलसंपदा , महाराष्ट्र राज्य, मुंबई व त्याचप्रमाणे मा. जिल्हाधिकारी अहमदनगर,मा. कार्यकारी अभियंता, नाशिक पाटबंधारे विभाग नाशिक, माननीय प्रांताधिकारी व तहसीलदार संगमनेर यांचेकडे केली होती.

ओव्हर फुल कॉन्फिडन्स

                  त्यानुसार लघू पाटबंधारे तलाव पिंपळे मध्ये ओव्हर फ्लो चे पाणी सोडणे विषयी महसूल विभागाने व पाटबंधारे विभाग नाशिक कारवाई सुरू केली आहे, कारण लघू पाटबंधारे तलाव पिंपळे धरणाच्या खाली पिंपळे, नान्नज दुधाला, पारेगावगडाख व चिंचोली गुरव या 4 गावांच्या पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी असलेल्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांचे उद्धव आहेत,  याकामी इंजिनियर हरिश्चंद्र चकोर यांनी महसूल व जलसंपदा विभाग नाशिक, ग्रामपंचायत पिंपळेसहित पंचक्रोशीतील गावांमधील ग्रामपंचायतींशी समन्वय ठेवून भोजापूर चे पाणी सोडणे विषयीची महत्त्वपूर्ण कार्यवाही करण्यामध्ये तत्परता दाखवुन ओव्हर फ्लो चे पाणी कालव्यात सोडण्याची कार्यवाही जलसंपदा विभागाच्या सहकार्याने करून घेतली आहे ,परंतु पाणी आणण्यामध्ये ज्यांचे महत्त्वपूर्ण योगदान नाही व गेली चाळीस वर्ष तळेगाव-निमोण परिसराला पाणी मिळवून देण्यासाठी जे निष्क्रिय राहिले आहेत, त्यांचे प्रतिनिधी लपा तलावात पाणी न पोहोचताच व जेमतेम १००० लिटर्स पाणी जमा झालेले नसताना ल .पा.तलाव न भरताच जलपूजनाचे सोपस्कार पार पाडून आम्ही जनतेचे कैवारी आहोत असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत, मात्र निमोन तळेगाव परिसरातील जनता व मतदार यांना वस्तुस्थिती माहीत असून पाण्यावाचून 40 वर्षे वंचित ठेवणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदानातून आपली आपली शक्ती व नाराजी निश्चितपणे दाखविल्याशिवाय राहणार नाहीत.

मिशन संगमनेर, जागो-जागी गुप्तहेर

 गेल्या पंधरवड्यात नामदार राधाकृष्ण विखे पाटील  मंत्री, गृहनिर्माण ,महाराष्ट्र राज्य यांनी भोजापुर धरण व कालव्याच्या अडचणींविषयी नामदार गिरीशजी महाजन, मंत्री, जलसंपदा, महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे विशेष बैठक लावून सर्व प्रश्न सोडवण्याचे निमोन तळेगाव परिसरातील शिष्टमंडळाला आश्वासन दिलेले आहे .लवकरच याविषयीची बैठक बोलावली जाणार असल्याची माहिती याकामी प्रामुख्याने चार वर्षापासून सातत्याने अभ्यासपूर्ण मांडणी करून शासनाकडे विविध मार्गाने पाठपुरावा करीत असलेले इंजि. हरिश्चंद्र चकोर यांनी दिली आहे.

निळवंडे धरण

           गेल्या वर्षी हरिश्चंद्र चकोर यांच्या पुढाकाराने पोलीस संरक्षणामध्ये भोजापूर धरणाचे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी लपा तलाव पिंपळे सहपंचक्रोशी साठी आणण्यात आलेले होते हे जनतेला माहित आहे.
        महत्वाचे म्हणजे निमोण सहचार प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना, भोजापूर असो किंवा निळवंडे असो, पाणी प्रश्न सोडवण्यात  श्री चकोर यांना युतीच्या शासनाकडून निश्चितपणे यश मिळताना पाहून संबंधित  लोकप्रतिनिधी हे विधानसभेच्या येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचलित झालेले दिसून येत आहेत,त्यामुळे संबंधित लोकप्रतिनिधी चे प्रतिनिधी जनतेचे प्रश्न सोडविण्याची नौटंकी करीत असल्याची चर्चा तळेगाव परिसरासह संगमनेर तालुक्यात सुरू आहे. तसेच भोजापुर धरण व कालवा अडचणी सोडविण्याविषयी 23 जुलै 2019 रोजी भरत फटांगरे, जिल्हा चिटणीस, भाजप, अ. नगर व इंजि हरिश्चंद्र चकोर  यांनी मा. मुख्यमंत्री,महोदय  महाराष्ट्र राज्य व मा. जलसंपदा मंत्री महोदय यांचे कडे निवेदने सादर केली असून भोजापुर धरणाच्या सांडव्याची ऊंची वाढविणे व कालव्यावरील बांधकामे दुरुस्ती करून वहनक्षमता  300 क्युसेक्स करण्याची मागणी केली आहे. या विषयावर शासनाकडून कार्यवाही सुरू आहे.

  ===================

                    --  सुशांत पावसे

    (संगमनेर प्रतिनिधी)

----------------------  ---


         जाहिर आभार
             ----------------------------------
 प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने  २९ दिवसात  ५८ बातम्यांच्या जोरावर  ३ लाख ७४ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी व निर्भीड शब्दांमुळे  आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
                          ---धन्यवाद ---
                          आपला
-------------------------------------------

        "सार्वभाैम संपादक

           

                        - सागर शिंदे