"अगस्ति" कारखान्यात "गुरुवारच्या" वादावर "गुरुवारीच" पडदा"; एमडी साहेबांचा "सहयोग"...
अकोले (प्रतिनिधी) :-
"अगस्ति सहकारी साखर कारखाना" येथे "कर्मचारी वर्सेस एमडी" साहेब यांच्यात "सलोख्याचे संबंध" प्रस्तापित झाले आहे. कामगार आला तेथे "बॉस" असतो आणि "अधिकारी तेथे वचक" पाहिजे असतो. त्यामुळे कारखान्याच्या हितासाठी "कठोर निर्णय" घेताना एमडी घुले साहेबांनी आपली "म्रुदू भुमिका" कायम घेतली आहे. तर "शेतकरी आणि अकोल्याच्या विकासासाठी" कर्मचाऱ्यानी "सलोख्याची" व "कष्टाची भुमिका" कायम ठेवली आहे. त्यामुळे सुट्टीवरुन रंगलेल्या "वाक्-युद्धाची ललकारी" शमली असून. तुरतास आज "गुरूवार" म्हणून सगळ्या कर्मचाऱ्यांनी "नियमित सुट्टी" घेतली आहे. त्यामुळे विशेषत: पिचड साहेब, एमडी साहेब व गायकर साहेबांचे आभार कर्मचार्यांनी मानले आहे.
"झाले गेले विसरुन जावे, पुढे-पुढे चालावे" हे मराठीतील एक 'गीत' आहे. आयुष्यात खूप "टोकाचे संघर्ष" कधी नसावे. हेच तत्व राखले तरच "प्रगती" आहे. हीच शिकवण आयुष्यात "सक्सेस झालेल्या व्यक्तींनी" अंगिकारली आहे. म्हणून त्यांचे समाज्यात कौतुक होते. त्यातलेच "एमडी घुले साहेब" आहेत. "बेशिस्त" कारखाना "शिस्तीत" आणताना त्यांनी प्रचंड त्रास घेतला आहे. काही कर्मचाऱ्यांच्या "मनमानी" कारभाराला "वेसन" घालून प्रस्तापित जुन्या जाणत्या कर्मचाऱ्यांना त्यांनी "मुसके" घातले आहे. मात्र, काही "अत्रुप्त आत्मे" त्यांची "गरळ" ओकताना दिसतात. मात्र, एकेकाळी "डबघाईस" आलेला कारखाना आज "प्रगतीपथावर" आहे. हे नाकारुन चालणार नाही. त्यामुळे तात्वीक विरोध असावा. परंतु रोष नको. म्हणून या वादावर तत्काळ तोडगा काढून पुढे पाऊल टाकले गेले आहे. त्याचे नक्कीच स्वागत करण्यात आले आहे.
"कर्मचारी आणि व्यवस्थापन" यांच्यात कोणताही "वाद" नाही. "सुट्टीचा प्रश्न तुर्तास प्रलंबित" ठेवण्यात आला आहे. कारखान्याच्या "विकासासाठी चांगले प्रयत्न सुरू" आहेत. "शेतकऱ्यांना वेळीच चांगली सेवा पुरविणे" हाच आमचा 'हेतू' आहे. मात्र, गैरसमजातून "शब्दांचा विपर्यास" झाला. कारखान्यात कोणताही वाद नाही. सर्व कारभार सुरळीत सुरु आहे.-----------------------------------
"कर्मचारी व एमडीसाहेब" आमच्यात "कोणत्याही प्रकारचा वाद" नाही. कारखान्यात जे काही काही चालते. त्यासाठी "कर्मचाऱ्यांना विश्वासात" घेऊन केले जाते. त्यामुळे तेथील "वातावरण अगदी खेळीमेळीचे" आहे. आमच्यात कोणतेही "मतभेद" नाहीत. साहेब "सहकार्यवादी" आहेत. त्यांनी "कर्मचाऱ्यांच्या विरोधात कधी निर्णय घेतला नाही:. त्यामुळे त्यांचे आम्ही युनियनच्या वतीन नेहमी "आभार" मानतो.-------------------------------
-- सागर शिंदे
------------------------ -----------------------------------जाहिर आभार
----------------------------------
प्रिय मित्रांनो सार्वभाैम या पोर्टलने २२ दिवसात ४९ बातम्यांच्या जोरावर ३ लाख ३५ हजार वाचक पुर्ण केले आहेत. हे इतक्या वेगाने लोकप्रिय होणारे पहिलेच पोर्टल आहे. याची गुगलने दखल घेतली आहे. हे सर्व श्रेय्य तुम्हा वाचकांना जाते. माझा कोठेही नंबर नाही, ग्रुप नाही. पण, निव्वळ निस्वार्थी शब्दांमुळे आपण ही लिंक शेअर करता. हे यश तुम्हा सर्वांचे आहे.
---धन्यवाद ---
आपला
-------------------------------------------