|
बेशुद्ध पाडणारी शुद्ध टाकी
|
अकोले (प्रतिनिधी) :-
अकोले शहरात "ग्रामपंचायतीची नगरपंचायत" झाली. त्यामुळे नागरिकांच्या "सेवा सुविधांचा वनवास" बंद होईल असे वाटत होते. परंतु, "पाण्यासारख्या प्रश्नासाठी" रोज "झगडावे" लागत आहे. शहरातील "२० हजार" नागरिकांनी "पिचड साहेबांच्या भरवशावर" १७ नगरसेवकांना आपले "प्रतिनिधी" केले. मात्र, साधं "शुद्ध पाणी" देखील जनतेला साहेब देऊ शकले नाही. त्यामुळे "शुद्धीवर" नसलेल्या नगरपंचायतीचे "अशुद्ध" पाणी नागरिक "डोळे झाकून" पीत आहेत. ते ही "साहेबांच्या आशिर्वादाने". त्यामुळे, "जनतेच्या विश्वासास अविश्वासू" ठरलेली नगरपंचायत जनता 'निवडणुकीच्या माध्यमातून' येणाऱ्या काळात नक्कीच "बरखास्त" करेल. यात शंका नाही. अशा प्रतिक्रिया "जाणकार नागरिकांकडून" व्यक्त केल्या जात आहे.
|
"प्या" |
शहरात "११ लाख लिटर" पाणी साठविणाऱ्या टाक्या आहेत. तर ०१ "चार लाख लिटर" आणि "दुसरी ०२ लाख लिटर" अशा दोन टाक्यांतून ०६ लाख पाणी एकाच वेळी १९ हजार ८१४ नागरिकंना २०११ च्या माहितीनुसार पाणीपुरवठा केला जातो. मात्र, आता ती लोकसंख्या २५ ते २६ हजारांच्या आसपास गेली आहे. आता विशेष म्हणजे येथे केवळ नाममात्र "बुजगाण्यासारखे जलशुद्धीकरण" यंत्र बसविण्यात आले आहे. जसे ०६ इंची पाईपातून १२ इंची पाईपाचे पाणी सोडले जाते. त्यामुळे शुद्धीकरणाचा पाईप आणि थेट नदीहुन येणारा पाणी सप्लायचा पाईप. यांच्यात कोणताही ताळमेळ बसत नाही. पाणी यंत्रापेक्षा "ओव्हरफुल" होऊन "संचयटाकीत" पडते. इतकेच काय तर फक्त तुरटी आणि ब्लिचींग पावडरचा वापर करून नदीचे आहे तेच पाणी "नागरिकांच्या घशात उतरविले जाते". येथील स्वच्छता यंत्रणा पाहिली तर नागरिक पाणी पिणार नाहीत अशी आहे. त्यामुळे किमान ज्या "विश्वासाने" पिचड साहेबांना नव्याने सत्ता दिली होती. त्या विश्वासाने नागरिकांच्या "डोळ्याआड" असले "घाणेरडे" पाणी नागरिक पीत असल्याचे समोर आले आहे. यााबाबत सामान्य नागरिकांनी तेथे जाऊन याची चाैकशी केली तरी यातील वास्तव लपणार नाही.
|
सत्य दाखवाल तेथे ,नो ऐन्ट्री
|
एक गोष्ट नमुद करावीशी वाटके की, जी ठिकाणे नागरिकांच्या "आरोग्याशी संबंधित" आहे. तेथे नागरिकांना, समाजसेवकांना आणि मीडियास जाण्यास "मज्जाव" करण्यात आला आहे. ही कोणती "हुकूमशाही" म्हणायची. या घटनेचा पाठपुरावा केला असता, एका अधिकारी महाशयाने नागरिकावर "खोटा गुन्हा" दाखल केल्याचे समजले. अकोल्यासारख्या ठिकाणी इतकी "मोगलाई माजली" असेल तर सामान्य जनतेने आवाज उठवायचाच नाही का ? "अशुद्ध पाणी आहे की शुद्ध" हे पाहण्याचा अधिकार नाहीच का ? खूशाल ३५३ (सरकारी कामात अडथळा) आणल्याचे गुन्हे दाखल करू असल्या धमक्या देतात. तर, यांचे "काळे पाणी" झाकण्यासाठी तेथे जाण्यास मज्जाव करतात. ही निती योग्य नाही. एका व्यक्तीने "जलशुद्धीकरण" यंत्राची पहाणी करण्यासाठी अर्ज केला असता, त्यास परवानगी नाकारण्यात आली. सरकारी कागदावर सांगितले जाते "नगरपंचायतीची बदनामी" होते, किंवा ही जागा थेट नागरिकांच्या "आरोग्याशी संबंधित" आहे. तेथे काही झाल्यास हनी होऊ शकते. म्हणून परवानगी देऊ नये. मात्र, नगरपंचायत सगळ्याच्या "डोळ्याआड" नागरिकांना "अशुद्ध पाणी पाजते", हा प्रकार "नागरिकांच्या आरोग्याशी खेळल्यासारखा" नाही का?
जेव्हा नदीला पाणी आले. तेव्हा अतिशय गढूळ पाणी टाक्यांमध्ये सोडण्याचे आदेश याच काही नगरसेवकांनी दिले होते. कोणतेही जलशुद्धीकरण यंत्र नाही ना कोणता उपाय. अक्षरश: पाणी नितळ होऊपर्यंत या नगरसेवकांनी दम काढला नाही. त्यांच्या बेजबाबदार पणामुळे सगळ्या २५ हजार लोकांनी घाणेरडे पाणी पिले. याच काळात अकोल्यातील सरकारी रुग्णालयात जुलाब, थंडीताप आणि सर्दी खोकल्याचे पेशंट वाढल्याचे वैद्यकीय अधिक्षकांनी सांगितले. ती देखील अकडेवारी आम्ही जनतेसमोर माडणार आहोत.
|
तुम्ही घानेरडे पाणी पिताय वाटतं
|
अर्थात वैभव पिचड यांनी पुन्हा मंत्री सोडा आमदार व्हायचे असेल तर असल्या बेजबाबदार लोकप्रतिनिधींना हद्दार केले पाहिजे. जे काम करीत असल्याचा आव आणतात व नागरिकांच्या आरोग्याशी खेळतात. नागरिकांच्या आत्मियतेची जाणिव असणारे लोकप्रतिनिधी निवडून गेले तर पिचड साहेब आमदार काय राज्याचे आदीवासी मंत्री तेच राहतील यात शंका नाही.
"अशुद्ध पाण्याने जुलाबाचे पेशन्ट वाढले होते" गेल्या काही दिवसांपासून अशुद्ध पाणी होते. म्हणून नागिकांना या समस्येला सामोरे जावे लागले. आता वातावरण बदलत आहे. त्यामुळे सर्दी खोकला ताप हे रुग्ण वाढते आहे. आम्ही त्यावर योग्य उपचार करत आहोत.
-- डॉ. म्हेत्र साहेब ( वैद्यकीय अधिक्षक)
यापुढील एक्सक्लिझीव पोलखोल वाचा (क्रमश: भाग २)