सोशल मीडियावर आ. पिचडांचा "पक्षप्रवेश"; "पुन्हा फुटले अफवांचे प्याव"


अकोले (प्रतिनिधी) :- गेली चाळीस वर्षे अकोल्यावर "माजी मंत्री मधुकर पिचड" यांनी निर्वीवाद वर्चस्व गाजविले. कैक विरोधक तयार झाले आणि पुन्हा राजुरच्या कुशीत जाऊन स्थिरावले. कोणी विरोधात बसून साहेबांचे गुप्तहेर झाले तर कोणी ऐन निवडणुकीच्या तोंडावर अंतर्गत हात मिळवून गेले. पण "या कानाची खबर त्या कानाला नाही ". हे जमो जाणे ते फक्त पिचडांनाच. म्हणून राजकारणाबाबत कोणीतरी म्हणाले आहे. "येथे पाहिजे जातीचे, येड्या गबाळ्याचे काम नव्हे". उद्या विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. अशातच पिचड साहेब "राष्ट्रवादीला रामराम" ठोकणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे जेवढे ऐकवटले तेवढे सुरकटले आहेत. जर असे झाले तर अकोल्यात भाजप आणि शिवसेना या सर्वांचे चेहरे पाहण्यासारखे होतील. असो तो एक "दिवास्वप्नाचा" भाग आहे. मात्र, त्यात काही तत्थ्य नाही असे मत पुर्वीच माजी मंत्र्यांनी मांडले आहे. त्यामुळे हा निव्वळ अफवांचा वर्षाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.
         
 निवडणुका लागल्या की "भोंडबाऱ्यासारखी फुटतूट" चालूच राहते. कोणाला निवडून येणे अपेक्षित असते तर कोणाला सत्तेशिवाय करमत नाही. त्यामुळे राज्याचा विरोधीपक्षनेता देखील मंत्रीपदाची शपत घेताना उभ्या देशाने पाहिले आहे. तर आ. बाळासाहेब थोरातांसारखे एकनिष्ठ नेते देखील जनतेच्या नजरेत भरले आहेत. मात्र, मोदी सरकारची इतकी हवा आहे की, बडे-बडे नेते त्या लाटेच्या प्रवाहात वाहून गेले. त्यामुळे विपक्ष बसण्यापेक्षी सत्ताधाऱ्यांमध्ये बसलेले कधीही बरे या विचारांनी कोणी शिवबंधन बांधले तर कोणी कमळाला जवळ केले. महाराष्ट्रातील याच वातावरणामुळे भाजपच्या कमळाचे "देठ बळकट" झाले तर "काँग्रेसचे हात कलम" झाले. अशातच उद्या येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षबदलाचे वारे वाहु लागले. त्या अफवेच्या वावटळीने पिचडांची फिरकी घेतली. आणि साहेब शिवबंधन हाती घेणार अशी वावडी उठली.
           पिचड साहेब का पक्ष बदलतील यावर जरा विचार केला तर ती शक्यता फार कमीच वाटते. पण, सत्ता, मंत्रीपद आणि डॉ. सुजय विखे यानी ठरविले तर शक्यता नाकारता येत नाही. असे असले तरी मधुकर पिचड हे मा. शरद पवार यांच्या विश्वासातले आहेत. त्यामुळे हा निव्वळ खोडशाळपणा म्हणावा लागेल. पण, राजकारण हे सामान्य मानसांच्या
विचारापलिकडचे आहे. आजकाल नात्यागोत्याचे राजकारण हा लोकशाहीला लागलेला काळींबा आहे. तरी बापानंतर मुलगा हे सुत्र अटळ आहे. पण, आजकाल एक राजकीय ट्रेंड निघाला आहे. बेटा जे करायचे ते करून बसतो, पक्षाने बापाला जाब विचारला तर ते सरळ वर हात करतात. तो माझे एकत नाही. त्याला त्याचे जिवण जगणे व निर्णय घेण्याचा अधिकार आहे. असा पायंडा रुजू होऊ पहात आहे. याचे दोन उदाहरण म्हणजे नगरच्या महानगरपालिकेत राष्ट्रवादीच्या आ. संग्राम जगताप यांनी चक्क शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपच्या दिलीप गांधी गटाला १८ नगरसेवकाचा बिनशर्त पाठिंबा दिला. अरुण जगताप यांना शरद पवारांनी जाब विचारला तर त्यांनी सांगितले, तो संग्रामचा वैयक्तीक निर्णय होता. त्याबाबत मला काही माहित नाही. तर दुसरे उदाहरण म्हणजे डॉ. सुजय विखे यांना नगर दक्षिण लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही, तर त्यांनी काँग्रेसला बायबाय करून भाजपकडून तिकीट प्राप्त करून विजय मिळविला. ना. विखेंना पक्षश्रेष्टींनी जाब विचारला असता ते म्हणाले, तो सुजय विखेंचा वैयक्तीक निर्णय होता. त्याच्या बंडाची मला कल्पना नाही.
येता की काय भाजपात
            थोडक्यात व स्पष्टच सांगायचे झालेे तर, आ. वैभव पिचड यांना डॉ. विखे व जगताप यांनी गळ घातला आणि पक्षबदल झालाच तर कोणी आच्छर्य वाटू देऊ नका. अर्थात देशाच्या राजकारणात अनेक अमोलाग्र बदल झाले आणि होत आहे. राष्ट्रवादीचे संग्राम जगताप हे शिसेनेच्या वाटेवर असल्याचे व्रत्त हाती येत आहे. त्यामुळे हा बदल जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिसून येईल. त्यामुळे आज हातात घड्याळ बांधणाऱ्या कार्यकर्त्याच्या गळ्यात उद्या कमळ किंवा मनगटात शिवबंधन दिसू शकते.
       अर्थात असे होऊ शकते असे नाही, परंतु हे नाकारुन देखील चालणार नाही. असो......! घोडा आणि मैदान समोरासमोर आहे. सद्या ही अफवा आहे असे अनेकजण आपापल्या मतावर  ठाम आहे. त्यामुळे या विषयास इथे पुर्णविराम दिला तोच योग्य.

      "परंतु जर वैभव पिचड यांचा बीजेपी किंवा शिवसेनेत प्रवेश झाला तर ? नेमके काय होईल."

     वाचा क्रमश: भाग २_
       सागर शिंदे