"ना. विखे" व "आ. जगताप" यांच्यापेक्षा "मधुकर पिचड" स्पष्टोक्ती व्यक्तीमत्व
अहमदनगर प्रतिनिधी :-
लोकसभेला डॉ. सुजय विखे यांनी भाजपत प्रवेश केला. मात्र अखेरच्या क्षणापर्यंत ना. विखे यांनी मुलगा काय करतो आहे. हे मला माहित नाही. अशी वरवरची उत्तरे दिली. त्यापुर्वी नगर महापालिकेत आ. संग्राम जगताप यांनी शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपला पाठींबा दिला. मात्र, याचा जाब आ. अरुण जगताप यांना विचारला असता त्यांनी मुलगा काय निर्णय घेतो याची मला कल्पना दिली नव्हती. असे सांगितले. अर्थात मुलांचे हे कारणामे वडिलांना माहित नाही असे म्हटले तर यांनी राजकारणात कमविले काय ? त्यामुळे माहित असूनही हे आमदार वरिष्ठांच्या डोळ्यावर आले नाही. याऊलट आज आ. वैभव पिचड यांनी भाजपात प्रवेश केला हे सांगताना राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड यांनी जराही लपाछपिची भुमिका घेतली नाही. उलट मुलाच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यामुळे बाप म्हणून दोन्ही आमदारांपेक्षा पिचड स्पष्टोक्ती ठरले आहे. अशी चर्चा राजकीय विश्लेषक करीत आहे.
डॉ. सुजय विखे यांच्यापासून राजकीय बदलाचे वारे वाहु लागले. त्यांच्या एका निर्णयाने नगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. मात्र, या नाट्यमय घडामोडीत ना. विखेपाटील कोठे दिसून आले नाही. ही खंत डॉ. सुजय विखे यांनी प्रचारादरम्यान बोलून दाखविली. अर्थात हे सर्व वडिलांच्या मार्गदर्शनाने चालु नव्हते असे म्हणणे धाडसाचे ठरेल. पण, नामदार साहेब अगदी शेवटपर्यंत रंगमंचावर आले नाही. मात्र, पडद्याआड त्यांच्यासारखा मार्गदर्शक कोणी नव्हता.
एकीकडे विरोधीपक्षनेते तर दुसरीकडे मुलाचा प्रचार, त्यांनाही नैतिकतेने कोठेतरी वाईट वाटत असेल. मात्र, त्यांच्यावर ही वेळ का आली. याचेही चिंतन राष्ट्रवादी व काँग्रेसने केले पाहिजे. अखेर पडद्याआडून त्यांनी मुलगा सुजय विखे यांना दिल्लीदरबारी पाठविले. जेव्हा मुलाच्या बंडाचा प्रश्न पुढे आला तेव्हा मुलगा माझे एकत नाही. त्याला त्याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र आहे. असे उत्तर श्रेष्ठींकडे पाठविले गेले. मात्र, नामदार समोर आले नाही. जेव्हा आले तेव्हा थेट मंत्री होऊनच काँग्रेसचा हात सोडला.
तसेच नगरच्या महानगरपालिका निवडणुकीत केडगावच्या घटनेचा वचपा काढण्यासाठी राष्ट्रवादीने भाजपला बिनशर्त पाठींबा दिला. ज्या शिवसेनेमुळे आमदारास तीन महिने कोठडीत रहावे लागले. त्यांनी शरद पवार साहेबांच्या आदेशाला डावलून भाजपशी युती केली. अर्थात त्यांचे तत्व ठरलेले होते. जो भोगतो त्यालाच खोट्यानाट्या आरोपांची कळ लागते. पण, दिल्ली, मुंबईत बसून आदेश देणे आणि त्याचे पालन लोकप्रतिनिधींनी करणे ही हुकूमशाही आहे. लोकशाही नाही. म्हणून आ. संग्राम जगताप यांनी अगदी ठामपणे भाजपला सत्ता बहाल केली. मात्र, या युतीचा जाब विधानपरिषद सदस्य आ. अरुणकाका जगताप यांना विचारला तर त्यांनी सांगितले. तो निर्णय स़ग्रामचा आहे. मला यात काहीच माहित नाही. त्यांनी हात वर केले. मात्र, स्वत:च्या अंगाला चुनूकही लागून दिली नाही. हे असे म्हणजे "बाप नंबरी तर बेटा दसनंबरी" त्यामुळे "मुलगा एकत नाही" असा टिकात्मक संदेश सोशल मीडियावर फिरत होता.एकीकडे विरोधीपक्षनेते तर दुसरीकडे मुलाचा प्रचार, त्यांनाही नैतिकतेने कोठेतरी वाईट वाटत असेल. मात्र, त्यांच्यावर ही वेळ का आली. याचेही चिंतन राष्ट्रवादी व काँग्रेसने केले पाहिजे. अखेर पडद्याआडून त्यांनी मुलगा सुजय विखे यांना दिल्लीदरबारी पाठविले. जेव्हा मुलाच्या बंडाचा प्रश्न पुढे आला तेव्हा मुलगा माझे एकत नाही. त्याला त्याचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र आहे. असे उत्तर श्रेष्ठींकडे पाठविले गेले. मात्र, नामदार समोर आले नाही. जेव्हा आले तेव्हा थेट मंत्री होऊनच काँग्रेसचा हात सोडला.
आता अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांनी भाजपत प्रवेश केला. वैभव यांचे पिता मधुकर पिचड हे राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य आहेत. त्यांच्या मुलाने पक्ष सोडणे म्हणजे शोकांतीका आणि पक्षाला मोठा धक्का आहे. त्यामुळे मधुकर पिचड यांच्यावर किती दबाव व अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागले असेल. पण, त्यांनी इतरांप्रमाणे मुलावर ढकलले नाही. चार चाैघांच्या मेळाव्यात येऊन वैभवला माझा पाठींबा आहे. जर विकास कामांसाठी तो भाजपात जात असेल तर मला मान्य आहे. त्यांनी सगळ्या तालुक्याला त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. त्यामुळे नामदार साहेब व अरुण जगताप साहेब यांच्यापेक्षा मधुकर पिचडांची स्पष्टोक्ती सगळ्या महाराष्ट्राला पहावयास मिळाली आहे.
-------------------------------------------
आभार : - प्रिय मित्रांनो आपल्या सहकार्याने रोखठोक सार्वभाैम या पोर्टलने १२ दिवसात ३० बातम्यांचे १ लाख ४९ हजार वाचक पुर्ण केले आहे. हा सर्वात लोकप्रिय होण्याचा बहुमान आपल्याला मिळाला आहे. हे सर्व श्रेय तुम्हा वाचकांना जाते.
🙏🏻धन्यवाद🙏🏻
------------------------------------🙏🏻धन्यवाद🙏🏻