म्हणून मी "राष्ट्रवादी" सोडून "भाजपात प्रवेश" केला; आ. "वैभव पिचड" यांचे "कबुली भाषण"
अकोले (प्रतिनिधी) :-
अकोल्याचा विकास करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत होतो. अकोल्याचे प्रश्न मांडताना विरोधी पक्षात राहुन खूप अडचणींना सामोरे जावे लागले. मधुकर पिचड साहेब आमदार किंवा सत्तेत असताना जनतेला रस्त्यावर उतरायची वेळ आली नाही. आज आम्ही विरोधी असताना भेटले काय तर फक्त तीन किलोमिटरचा रस्ता. पण जेव्हा सत्तेतील आमदार पाहिला तर त्यांच्या मतदारसंघात प्रचंड कामे झाल्याचे दिसले. त्या तुलनेत अकोल्यात काहीच कामे नाही असे प्रकर्षाने जाणवले. खरे पाहता जेव्हा पक्ष बदलायचा विचार मनात आले तेव्हा मनाला प्रचंड वेदना होत होत्या.
तेव्हा मातोश्री हेमलताताई देखील याला विरोध करीत होत्या, मात्र अकोल्याच्या विकासासाठी मला पर्याय नव्हता. मी केवळ आमदार होणे अपेक्षीत नाही तर जनतेची कामे महत्वाची आहे. जर जनतेला न्याय मिळत नसेल तर मी आमदार असून तरी काय उपयोग. नुसते आमदार रहायचे असते तर मी राष्ट्रवादीत राहुनही तुम्ही मला निवडून दिले असते. मात्र मी अकोल्याचे हाल पाहु शकत नाही. जेव्हा मला मुख्यमंत्री साहेबांचा फोन आला तेव्हा माझे पहिले साकडे होते की; मुख्यमंत्री महोदय मी भाजपात येतो. मात्र, माझ्या अकोल्याच्या जनतेचे सर्व प्रश्न सोडवत असाल तरच मी आपल्या पक्षात येतो. त्यांनी शब्द दिल्यानंतर मी भाजपत जाण्याचा निर्णय घेतल. पर्यटण, पाणी, बंधारे, रोजगार, शिक्षण, वीज, एमआयडीसी असे अनेक प्रश्न सोडविण्याचे अश्वासन फडणविस साहेब, गिरीश महाजन, ना. विखे पाटील यांनी दिले आहे.
मराठा आरक्षणात सरकारने चांगली भुमिका पार पाडली. एकंदरीत भाजपने जनतेचा काैल पाहून आणि त्यांच्या कार्याची पद्धत पाहता आपण भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
मी पक्षबदलाबाबत हेच सांगतो माझ्या कार्यकर्त्यांच्या कामांची भूक भागविण्यासाठी मी भाजपात प्रवेश केला आहे. मी शरद पवार, दादा यांचे आभार मानतो. तसेच भाजपात फडणविस, ना. विखे, राम शिंदे, गिरीश महाजन अशा अनेकांनी मला शुभेच्छा दिल्या त्या सर्वांचे आभार.
-------------------------------------------
आभार : - प्रिय मित्रांनो आपल्या सहकार्याने रोखठोक सार्वभाैम या पोर्टलने १२ दिवसात २९ बातम्यांचे १ लाख ४५ हजार वाचक पुर्ण केले आहे. हा सर्वात लोकप्रिय बहुमान आपल्याला मिळाला आहे. हे सर्व श्रेय तुम्हा वाचकांना जाते.
🙏🏻धन्यवाद🙏🏻
------------------------------------🙏🏻धन्यवाद🙏🏻