|
चेहरा बोलता है ! १, ७ सावधान !
|
अकोले (प्रतिनिधी) :- गेली अनेक दिवसांपासून वैभव पिचड यांचा पक्षप्रवेश हा विषय उगळला जात होता. अखेर त्याला पुर्णविराम मिळाला. वैभव पिचड यांनी एका बैठकीनंतर भाजप कार्यकर्त्यांच्या गळाभेटी घेतल्या. मात्र, त्यांचे चेहरे कमळासारखे फुललेले दिसले नाही. तर, देठ गळून पडलेल्या फुलांसारखे जाणवत होते. पण, आता काय करणार ? हे सुत्र स्थानिक पातळीवर थोडेच हलले आहे. त्यांचा 'ग्रुहप्रवेश' "ग्रुहनिर्माण खात्याकडून" (ग्रुहनिर्माण मंत्री विखे पाटील) झाला आहे. त्यामुळे भाजपनिष्ठ जालिंदर वाकचौरे यांनी औपचारिक सु-स्वागतम केले. मात्र, अशोक भांगरे व शिवाजी धुमाळ यांनी नि:शब्द धोरण अवलंबविले आहे. तर डॉ. लहामटे यांनी बंडाची भुमिका घेतली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बळच या निर्णयाला स्विकारल्याचे दिसते. मात्र, शरद पवारांच्या व दादांच्या निष्ठावान कार्यकर्यांनी त्यांच्याशी संपर्क केला असून पक्षाशी आम्ही एकनिष्ठ व बांधील असल्याची शपत घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी व भाजपात अस्वस्थता निर्माण झाली आहे. ती दुर करण्यासाठी साहेबांनी मनोमिलनाच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. मात्र सगळ्यांच्याच "घड्याळाचे" बारा वाजलेले दिसत आहे.
|
बळजबरीचा रामराम !
|
आज आ. पिचड साहेबांचा भाजप पक्षप्रवेश फिक्स झाला. पण, तो स्थानिक नेत्यांना पचणी पडेना. गेली ४५ वर्षे राष्ट्रवादीशी एकनिष्ठ असणारे पिचड साहेब बंडखोर झाले तरी कार्यकर्त्यांच्या मनात अजूनही घालमेल सुरु आहे. त्यामुळे गेल्या लोकसभेत पक्षाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी भाऊसाहेब कांबळे यांना ३१ हजारांचे लिड दिले आणि भाजप व शिवसेनेच्या नाकावर टिचून आजवर कार्यकर्ते उर तानून वावरत होते. मात्र, काही महिन्यात आज होत्याचे नव्हते झाले. त्यामुळे आता कार्यकर्त्यांची घुसमट झाली आहे. आता पिचड साहेबांसोबत "व्यक्तीपरत्वे आणि पक्षपरत्वे" असे दोन गट झाले आहेत. जे "स्वर्थापोटी" जोडले गेले ते सगळ्या तालुक्याला माहित आहे. तर दुसरा पक्षनिष्ठ गट आहे. ते अजूनही नाराज आहेत. तर फुले, शाहु, आंबेडकर सांंगनारा पुर्वीचा डावी चळवळ कथन करणारा मधुभाऊंचा एक अबोल अलिप्त गट आहे. त्यामुळे या तीनही गटातून येणाऱ्या काळात कार्यकर्ते काय निर्णय घेतात. याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.
|
"विरोधकांची मांदीआळी"
|
पिचड साहेबांनी भाजपमध्ये प्रवेश करुन चांगल्या-चांगल्यांची मुस्कटदावी केली आहे. कालपर्यंत डॉ. किरण लहामटे यांनी आमदारकीसाठी भाजपकडून गुढग्याला बाशिंग बांधले होते. एक कट्टर पिचड विरोधक म्हणून त्यांचे नाव पुढे आले होते. सगळ्या राजूर पट्ट्यात आमदारकीसाठी पोस्टरबाजी आणि भिंती रंगल्या होत्या. पण अचानक सगळी स्वप्न धुळीस मिळाली. त्यामुळे त्यांचा भ्रमनिराश झाला. आता साहेबांचे गुनगान गायचे, नाहीतर बाहेर पडायचे. याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे "बंडाची भुमीका" हेच त्यांचे आगामी पाऊल असणार आहे. पण, एक बाकी नक्की. आजचे लहामचे उद्या भांगरे आणि तळपाडे यांची जागा घेतील यात शंका नाही. कोठे थांबायचे आणि कोठे लढायचे हे लक्षात आले की, ते बघता बघता विरोधी राहुन तन, मन धनाने बलाढ्या होतील. हाच इतिहास अकोले विधानसभेचा आहे. हे येणारा काळ सिद्ध करेल. यातच वैभव पिचड यांचे माजी मंत्री महोदयांप्रमाणे यशस्वी ३५ वर्षे निघून जातील.
|
जब बैठे चार विरोधक यार..!
|
आता पिचडांच्या विरोधात पहिले बंडाचे निशान उभे राहिले आहे. महेश तिकांडे यांनी आपली भुमीका ठाम असून "हातातून घड्याळ काढणार नाही". असा पवित्रा घेतला आहे. "ये तो शुरुवात है ! पिक्चर अभी बाकी है" ! असे म्हणत तिकांडे यांना सोशल मीडियावर मोठा जनाधार मिळाला होता. त्यामुळे "अंतर्गत घुसमट" बाहेर पडायला सुरूवात झाली आहे. याची दखल साहेबांना घ्यावी लागणार आहे. नाहीतर १८५७ ची लढाई अशीच अतर्गत बंड आणि घुसमट यातूनच घडली होती. इंग्रजांचेच सैन्य त्यांच्यावर चालून गेले होते. हे विसरून चालणार नाही. त्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांची मोट बांधणे हे कौशल्य साहेब कसे वापरतात. यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.
---------------------------------------
आभार : - प्रिय मित्रांनो आपल्या सहकार्याने रोखठोक सार्वभाैम या पोर्टलने १२ दिवसात २९ बातम्यांचे १ लाख ४० हजार वाचक पुर्ण केले आहे. हे सर्वात लोकप्रिय असल्याचा बहुमान आपल्याला मिळाला आहे. हे सर्व श्रेय तुम्हा वाचकांना जाते. 🙏🏻धन्यवाद🙏🏻
------------------------------------
"सार्वभाैम संपादक"
- सागर शिंदे