भाजपात प्रवेश निश्चित: पुढाऱ्यांचे "पाघरून", चौघांचे"राजीनामे" अन पिचडांचे "मौन"; "राजा स्थिर, सेनापती अस्थिर"...
अकोले (प्रतिनिधी) :-
"राजा स्थिर, तर सेना अस्थिर" हे इतिहासाने कित्तेक ठिकाणी रेखाटले आहे. पुर्वी "कोंडाना" लढताना "तान्हाजी धारातिर्थ पडला" तरी "सुर्याजीने किल्ला सर केला" होता. पण आजकाल असे मावळे राहिलेत कोठे. "मुकादम गेला की आखी टोळी त्याच्यामागे निघते". अशीच काहीशी गंमत अकोल्यात पहावयास मिळत आहे. पिचड साहेब बंड पुकारणार तोच... "पक्षपात होणार नाही" असे पुढाऱ्यांनी क्लेरीफिकेशन दिले. बरं थांबनारच आहे तर मग या चौघाचे राजीनामे का कागदावर आले ? अर्थात "साहेब..! जहा तुम, वहा हम" हेच निदर्शनास आणून द्यायचे आहे. हे अकोल्याचे राजकीय नाट्यमय वातावरण काही दिवसात निवळणार आहे. पण, एक मात्र निश्चित. अकोल्यातील काही "कार्यकर्ते नाैटंकीबाज व लबाड" आहे. त्यामुळे प्रवाहात राहण्यासाठी साहेब कोठेही गेले तरी त्यांना चिंता करायची गरज नाही. शेवटी वळणाचे पाणी वळणाकडेच येईल. ते लहामटेंच्या डुबत्या जहाजात थोडीच बसणार आहे. त्यामुळे, "साहेब तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है" ! हाच नारा दबक्या आवाजात मोठ्ठा येणार आहे. पण काळजावर दगड ठेऊन ते बंड पुकारतील ते ही अकोल्याच्या विकासासाठी. असे निश्चित झाले आहे.
राष्ट्रवादी सेनेची बैठक |
अर्थात स्पष्ठच सांगायचे झाले तर, काल सांगण्यात आले, साहेबांच्या मुलीचे अॅडिशन घेण्यासाठी मुख्यमंत्र्याचे भेट घेतली. मात्र, लोकांना असे वाटते की, माजी मंत्री यांचे राज्यात नव्हे, देशात वजन आहे. त्यामुळे त्यांना अॅडमिशन घेण्यासाठी कोणाची गरज भासेल असे वाटत नाही. जरी वाटलीच तर मुख्यमंत्री पवार साहेबांपेक्षा पदाने मोठे असतील. मात्र, शब्दाने आणि वजनाने नक्कीच नाही. आणि काम कोणतेही असो, मुख्यमंत्र्यांना भेटण्यास ना. विखे साहेबाची गरज पडते. हे सर्व अनाकलनिय आहे. मग गेली ३५ वर्षे माजी मंत्र्यांनी काहीच इमेज कमविली नाही का ? किवा दोन टर्म आमदार होऊनही ज्यांना आपण "अकोल्याचे वैभव" म्हणतो ते अर्थशुन्य आहे का ? हे प्रश्न सामान्य मानसांना पडले आहे. तर सोशल मीडियावर हात भडिमार होत आहे. पिचड साहेबांच्या शक्तीचा अंदाज अकोलेकरांना नसता तर त्यांनी अर्धशतक होईपर्यंत त्यांना आमदार केले नसते. त्यामुळे, कार्यकर्त्यांनी उत्तरे देताना त्यावर हजारदा विचार केला असेल. कोणास ठाऊक हे असेलही सत्य. पण, जनतेला ते पटणार नाही. कारण, राजकारण्यांना वाटते तितकी जनता दुधखुळी राहिली नाही.
साहेब, कोणता झेंडा घेऊ हाती |
दरम्यान कार्यकर्ते कितीही लपवाछपवी करीत असले तरी वैभव पिचड पक्षांतर करण्याचे सुतोवाच स्वत: त्यांनीच दिले आहे. आजच्या बैठकीत ते म्हणाले; अकोल्याच्या विकासासाठी आपण चांगले काम केले आहे. मात्र, मागिल काही काळापासून आपल्याला भरीव निधी मिळाला नाही. त्यामुळे अकोल्याच्या विकासासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले. म्हणजे त्यांच्या पक्षप्रवेशावर त्यांनी मोहर लावली आहे. आता त्यांना हातातील घड्याळ काढले असून हाती धनुष्य घेतात की बान हेच फक्त पाहणे शिल्लक आहे.
-------------------------------------
सागर शिंदे