"सत्ताधारी भाजपने" विकासात "राष्ट्रवादीची कोंडी" केली, म्हणून साहेबांची "बंडखोरी" मान्य -- कार्यकर्त्यांची कागाळी
अकोले (प्रतिनिधी) :-
माजी आमदार मधुकर पिचड यांच्या काळात कार्यकर्त्यांची अनेक काम होत होती. तसेच लोकप्रतिनिधींना प्रशासनात सन्मान होता. विकास कामांना गती होती. आज मात्र, विरोधी सरकार आल्यामुळे काम होत नाही. अधिकारी एकत नाहीत, शासन जरबारी सामान्य नागरिकांना न्याय नाही. या सगळ्यांना कारण सत्तेकेंद्र आहे. त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजपने विकास कामांत राष्ट्रवादीची कोंडी केली अशी कागाळी कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात केली.
आज शनिवार दि.२७ जुलै २०१९ रोजी दुपारी माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली अकोल्यातील पंकज लॉन्स येथे कार्यकर्ता मेळावा कार्यक्रम सुरू आहे. आ. वैभव पिचड यांचा "भाजपात पक्षप्रवेश" हा या मेळाव्याचा अजेंडा आहे. मात्र, प्रत्येक कार्यकर्ता अद्याप सावधरितीने भाषणे करीत आहेत. राष्ट्रवादीला दुय्यम स्थान देऊन भाजप कसे चांगले आहे. देवेंद्र फडणविस हे उत्तम प्रशासक कसे आहेत यावर कार्यकर्ते भर देताना दिसत आहे. गेली पाच दहा वर्षे तालुक्यातील डावे- उजवे कॅनाॅल अाणि अन्य कामे रखडली. त्यामुळे अकोल्याचा विकास राहुन गेला. त्यामुळे वैभव पिचड यांनी भाजपात प्रवेश केला नाही तर कार्यकर्त्यांनी त्यांना राष्ट्रवादी सोडायला भाग पाडले आहे.
यावेळी, मार्गदर्शक मधुकर पिचड, आ. वैभव पिचड, कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा बॅकेचे अध्यक्ष सीताराम पाटील गायकर होेते. तर, केलासराव वाकचोरे, यशवंतराव आभाळे, मिनानाथ पांडे, विठ्ठलराव चासकर, गिरीजाजी जाधव, मधुभाऊ नवले, बाळासाहेब भोर, पर्बतराव नाईकवाडी, संपत नाईकवाडी, रावसाहेब वाकचोरे,अॅड के. डी धुमाळ, बाळासाहेब वडजे, सुरेशराव गडाख, बाळासाहेब नवले, विक्रम नवल, विकास शेटे, जि प सदस्य रमेश देशमुख, भाऊमामा खरात, हेमलताताई पिचड, आशाताई पापळ, अंजनाताई बोंबले, अशोक देशमुख, राहुल देशमुख, बाळासाहेब सोनवणे, शुंभू नेहे यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.
-------------------------------------------
आभार : - प्रिय मित्रांनो आपल्या सहकार्याने रोखठोक सार्वभाैम या पोर्टलने १२ दिवसात २९ बातम्यांचे १ लाख ४५ हजार वाचक पुर्ण केले आहे. हा सर्वात लोकप्रिय बहुमान आपल्याला मिळाला आहे. हे सर्व श्रेय तुम्हा वाचकांना जाते.
🙏🏻धन्यवाद🙏🏻
------------------------------------🙏🏻धन्यवाद🙏🏻