संगमनेर "नगरपरिषदेला"... "साष्टांग दंडवत"... "सार्वभाैम पोर्टलची यशस्वी घोडदाैड"
सार्वभाैमच्या बातमीने गटारीला कवच |
"नगरपरिषदेच्या आशिर्वादाने संगमनेर गेलं खड्ड्यात" या मथळ्याखाली सार्वभौम पोर्टलने संगमनेर बस स्थानकाच्या समोरील गटारींवर वास्तव लिखान केले होते. त्याची दखल घेत नगरपरिषदेने तत्काळ पाऊले उचलून गटारींना संरक्षण पोल उभे केले आहे. त्यामुळे खरोखर प्रवाशांच्या जीवितांचे रक्षण केल्यासारखे आहे. म्हणून भारताच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या सर्व नागरिकांच्या वतीने सर्वात लोकप्रिय सार्वभाैम पोर्टल नगरपरिषदेस "साष्टांग दंडवत" घालत आहे. कारण, चुकीला चूक, योग्य कामाचे काैतुक, अन्यायावर घाव आणि वास्तवाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करणारे हे पोर्टल आहे. हे कोणा एका व्यक्तीची किंवा पक्षाची मक्तेदारी घेतलेले माध्यम नाही. ना प्रस्तापित प्रिंट आणि इलेक्ट्राॅनिक माध्यमांसारखे जाहिरातीसाठी दबाव टाकणारे हे माध्यम नाही. हे प्रकर्षाने नमुद करावे वाटते. त्यामुळे मुलभूत प्रश्नांवर लढताना व चांगल्या कामाचे काैतुक करताना आमच्या मनात कधीही संकुचित भावना किंवा किंतु परंतु येणार नाही. आमच्या निर्भिड लेखणीला दाद देणाऱ्या सर्व ५० हजार वाचकांचेही मन:पुर्वक आभार.
अशी होती उघडी गटार |
आता बस स्थानकाच्या बाहेर गटारी उघड्या आहेत. सार्वभाैमच्या बातमीनंतर त्याला संरक्षण कवच बसविण्यात आले. उद्या पुन्हा पाऊस आला किंवा वाहने गटारात जाण्यापासून वाचली तर त्याचा फायदा कोणाला होणार आहे.? नागरिकांनाच ना ? मग येथे कसला आलाय स्वार्थ.? त्यामुळे हे पोर्टल फक्त वास्तव आणि न्याय देण्याच्या द्रुष्टीने सुरू करण्यात आले आहे. यावर कोण्या राजकीय पक्षाची हुकूमशाही नाही ना मक्तेदारी. हे वाचकांनी लक्षात घ्यावे.
नगरपरिषदेने जी तत्परता दाखविली त्याबद्दल त्यांचे आभार मानने हे क्रमप्राप्त आहे. नगराध्यक्षा दुर्गाताई ताबे यांच्या या निर्णयाचे काैतुक सर्व स्थरातून झाले पहिजे कारण, चुका दाखविणे हे माध्यमांचे काम आहे. त्यावर दखल घ्यायची की नाही हे नगरपरिषदेचा निर्णय आहे. मात्र, ज्या कामाला त्यांनी अग्रक्रम दिला. त्यामुळे नक्कीच समाजहीत होणार आहे. म्हणून कळत नकळत ज्यांनी या यशात सहभाग नोंदविला त्यांचेही आभार.
खरे पाहता मोठमोठी व्रुत्तपत्रे ही न्यायाचे किंवा वास्तव व्यक्त होण्याची माध्यमे राहीली नाहीत. पुर्वी झोपलेली मानसे जागी करायला मीडियाचा वापर होत होता. आता मात्र, मानसे "झोपवायला" याचा वापर होत आहे. हे सगळे व्यवसाय होऊन बसले आहे. या व्यवस्थेला कंटाळूनच हे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. याची वाचकांनी नोंद घ्यावी. त्यामुळे येथे बातमीची किंमत होत नाही तर किंमत करणाऱ्यांची किंमत कमी केली जाते. त्यामुळे या पोर्टलवर कोणत्या राजकीय पक्षाचा, व्यक्तीचा अथवा संस्थेचा शिक्का मारु नये ही विनंती.
लोकप्रिय सार्वभाैमचे स्टेटस |
--------------------------------------
सुशांत पावसे
सागर शिंदे