....अखेर "डॉ. लहामटेंच्या डोक्यावर" शरद "पवारांचा हात", उद्या थेट "मुंबई दाैरा" पिचडांना "शह देणारच"...


बाय बाय भाजप...

      अकोले (प्रतिनिधी) :- "राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य" मधुकर पिचड व "बंडखोर" पुत्र वैभव पिचड यांनी भाजपची वाट धरली आणि घड्याळाची साथ सोडली. त्यामुळे "जाणता राजा" समजल्या जाणाऱ्या "धुरंधर राजकारणी" शरद पवार यांनी डॉ. किरण लहामटे यांच्या डोक्यावर हात ठेवला आहे. त्यामुळे त्यांनी "कमळा"ची साथ सोडून घड्याळाचा हात धरला आहे. काल राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव बाळासाहेब जगताप यांनी लहामटे यांची भेट घेऊन "मुंबई दरबाराचे तिकीट" आॅफर केले आहे. लहामटे हे अजित पवार व जयंत पाटील यांना उद्या दि. २९ जुलै रोजी मुंबईत भेटणार आहे.

बंडखोरीची बैठक, निर्णय रोखठोक

            राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साहेब यांच्या राजकारणाचा आजवर कोणाला अंदाज आलेला नाही आणि येणारही नाही. त्यामुळे त्यांच्या कोणत्या चालीने "कोण उभा राहिल" आणि कोण "भुईसपाट होईल", हे महाराष्ट्राला नवे नाही. सचिन अहिर सारख्या शुन्य व्यक्तीमत्वाला त्यांनी मुबईचे अध्यक्ष केले. त्यांनी माती खाल्ली तो भाग वेगळा, आणि नगरच्या बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादीसमोर दंड थोपटले आणि त्यांची काय परिस्थिती आहे. हे नव्याने सांगायला नको. त्यामुळे एखाद्याला मोठे करायचे हे त्यांना माहित आहे. तर त्यांचे पंख कसे छाटायचे हे देखील त्यांना चांगलेच माहित आहे. काल सुप्रिय सुळे यांनी मोठ्या पोटतीडकीने प्रतिक्रिया दिली. "ज्याला दादा" म्हणायचे त्यांनीच घात केला. पण पक्षाचे दिवस बसून राहणार नाही. जेव्हा आमची वेळ येईल तेव्हा लाईनमध्ये उभे राहिलात, तरी संधी दिली जाणार नाही. त्यांच्या पोटतीडकेने बोलण्यात रोष होता तर साहेबांनी ज्यांच्यासाठी सगळा विश्वास न्योछावर केला. त्यांच्या कर्मावर द्वेष व्यतीत होत होता. त्यामुळे उद्याच्या काही लढाया पवार घराण्यासाठी अस्मितेच्या ठरणार आहे. त्यातलीच एक फाईट अकोल्याची आहे.
           

चलो बुलावा आया है, दादा ने बुलाया है !

पवार साहेबांच्या विश्वासातील पिचड यांनी त्यांच्या वैयक्तीक स्वार्थापोटी विश्वासघात  केला. गेली ४० वर्षे विकास करता आला नाही. तर निव्वळ सत्ता उपभोगली. आणि पाच वर्षे विरोधी बाकावर बसायची वेळ आली तर विकासाचा मुद्दा समोर आणला. आशाताई पापळ म्हणाल्या ते खरे आहे. आम्हाला सत्तेवाचून करमत नाही. "साहेबांनी सत्तेची लालसा लावून दिली" आहे.
        अर्थात पिचड यांना देखील सत्ताच हवी आहे. त्यांना सत्ता नसताना विरोधीपक्षनेते केले. तर, सत्तेवर असताना मंत्री केले. पवार साहेबांनी काय कमी केले होेते ? याचे आत्मपरिक्षण त्यांनी करावे. मात्र, पाच वर्षे हा माणूस "ना व्यक्तीनिष्ठ राहिला, ना पक्षनिष्ठ" त्यामुळे सत्तेसाठी हपापलेल्या व्यक्तीला जनता कधीच माफ करणार नाही. असे मत डॉ. किरण लहामटे यांनी मांडले.

बॅनरहुन कमळ हद्ददपार

                 भाजपवर नाराज होत त्यांनी आपल्या बँनरहुन पक्षाचे चिन्ह हद्दपार केले. ज्या पक्षाला निष्ठा सोडून खोटारडे व सत्तेला हपापलेले लोक प्रिय वाटतात. हे खरे आमच्या पक्षनिष्ठेची पावती आहे. ज्या पक्षाची प्रतिमा आम्ही क्लिन करायचा प्रयत्न केला होता. तो भाजपने पिचडांना घेऊन पुन्हा गलिच्छ केला आहे. ज्या पक्षासाठी आम्ही पिचडांशी वैर पत्कारले. त्याच पक्षाने पिचडांना भाजपात घेताना शब्दभराची विचारणात केली नाही.  हा कोणता न्याय आहे. त्यामुळे मी ठरविले आहे. काही झाले तरी पिचडांना शह द्यायचा. म्हणून मी बंडाच्या पवित्र्यात आहे.
        ते म्हणाले. माझ्याकडे बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसची आॅफर दिली आहे. तर राष्ट्रवादीचे बाळासाहेब जगताप यांनी राष्ट्रवादीची आॅफर दिली आहे. उद्या अजित पवार, जयंत पाटील, वळसेपाटील व धनंजय मुढे यांच्या भेटीसाठी मुंबईला जाणार आहे. एकंदरीत राष्ट्रवादी हा पक्ष निश्चित झाल्याचे मत डॉ. लहामटे यांनी दिले.
---------------------------------------
आभार : - प्रिय मित्रांनो आपल्या सहकार्याने रोखठोक सार्वभाैम या पोर्टलने १३ दिवसात ३२ बातम्यांचे १ लाख ५७ हजार वाचक पुर्ण केले आहे. हे सर्वात लोकप्रिय असल्याचा बहुमान आपल्याला मिळाला आहे. हे सर्व श्रेय तुम्हा वाचकांना जाते. 
---धन्यवाद ---
------------------------------------

   "सार्वभाैम संपादक

       

       - सागर शिंदे