खाकीतील "दानशुर कर्ण" वर्दीच्या पलिकडे माणूस म्हणून जगणारा अधिकारी.!
आज खाकी वर्दीकडे पाहिलं तर अनेकांना तिरस्कार निर्माण होेतो. होय..! अगदी मलाही. कारण, खूप जूनी म्हण आहे. "खाकीसे ना दोस्ती अच्छी ना दुष्मणी". या वाक्याला मी अजिबात छेद देणार नाही. कारण, यात तिळमात्र चूक नाही. हे आजवर अनुभवले नाही अशी अगदी बोटावर मोजता येतील इतकीच माणसं पहायला मिळतील. पोलिसांना तोंडावर गोड बोलतीलही, पण मागेपुढे ! बाप रे.! कानाला सहन होणार नाही असले शब्दप्रयोग असतात. पण असो. लोकं देवाची गाऱ्हाणी करतात, ही तर माणस आहेत. शिव्या-शाप देवाला चुकले नाही, तेथे यांची काय मिजास.
खरं महत्वाचं सांगायचं ठरलं तर एखाद्याने एक डिगरी घेतली तर त्याचा मिजास काय विचारावा. पण साहेब अॅग्री, एमबीए, एमए, एलएलबी, एलएलएम, डिसीजे (पत्रकार) अशा डिगऱ्या घेऊन अजूनही शिकत आहे. काय अस्था आणि आवड म्हणायची शिक्षणाची. साहेब तसे तर मराठा. पण त्यांनी डॉ. बाबासाहेब डोक्यात घेतला डोक्यावर नाही. ते जेव्हा आभ्यास करायचे तेव्हा टेबलावर प्रेरणा म्हणून फक्त आणि फक्त बाबासाहेबांचा फोटो असायचा. याला म्हणतात अनुयायी. आता अजकालच्या अनुयायांविषयी भाष्य न केलेलेच बरे.
काही असो, पण एक सांगू ? अगदी मानातूून. कोणी कितीही मोठ्या पदावर जावो, कितीही माज करो, पण त्याने माणूसकी सोडायला नको. हवंतर जशास तसे वागा, पण मनमानी राजवाट नको. जेव्हा आकाशाला गवसणी घालुनही तुमचे पाय जमिनीवर असतील ना, तेव्हा समजून घ्या आपल्यातला माणूस जिवंत आहे. समजायचं तरी कशाला लोक आपोआप अशा व्यक्तीला डोक्यावर घेतात. नकळत आणि अनपेक्षीत त्याचा उदो-उदो होत असतो. तेव्हा तो खाकीच्या पलिकडील लोकमान्य अधिकारी ठरत असतो. आता तुम्हाला इतके प्रमाण का द्यावे लागले असतील ? कारण पोलीसाला कोण चांगलं म्हणतय का ? पण, त्यांच्यातही एक माणूस असतो. हे विसरून कसे चालेल. हे मी एकटा नव्हे नगर जिल्ह्यातील लाखो लोकांनी लोकमान्य केलेले पोलीस अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांचा जनता लोकमान्य म्हणून शब्दोशब्दी गाैरव करते. तेव्हा त्यांच्यासोबत पोलीस दलाचा सन्मान वाढतो. खाकीत माणूस आहे. हे जर कोणाला खरं वाटलं असेल तर चव्हाण सरांकडे पाहुन वाटते. आज त्यांच्या वाढदिवसानिमीत्त हे प्रकर्षाने वास्तव लिहावे वाटते.ग्रामीण भागात शिक्षण घेत त्यांनी स्वत:ला सिद्ध केले. अगदी दहावीत असताना घरो-घरो गल्ली-बोळात सायकलवर अागरबत्तीचे पुडे विकणारा हा विद्यार्थी. अनेक दुकानांमध्ये बालमजूर म्हणून काम करतो. शिकावं की उभं रहावं, लढावं की सोडून द्यावं. पण हार मनात होती ना रक्तात इतक्या विपूल परिस्थितीत त्यांनी प्रथम श्रेणीत शिक्षण पुर्ण केले. कधी पहिला क्रमांक पटकावत त्यांनी स्वत:ला बळ दिले. ते काळ मला नाही आठवत, पण आरक्षणामुळे त्यांना अॅग्रीकल्चरला धुळ्याला जावे लावले. तो अभ्यासक्रम अगदी मिरीटमध्ये येऊन संपन्न केला. नंतर राहुरी विद्यापिठात त्यांचे पुढील शिक्षण झाले. अर्थात नेत्रुत्वगुण अंगी असल्यामुळे विद्यापिठात ते बाॅस होते. त्यांच्या हाताखाली अनेक अधिकारी यशाच्या शिखरावर गेले. आज ते पदाने बाप असतील, पण माणूस म्हणून साहेब कालही आणि आजही बाप माणूस आहे. नंतर गुजरातला ते बँक मॅनेजर झाले, पण व्यावहारात त्यांचे मन रमले नाही. पुन्हा पीएसआय झाले. नकळत घरच्या दबावापोटी ही नोकरी स्विकारावी लागली, नाहीतर कलेक्टर, आयपीएस, डेप्युटीसारखा माणूस आपण गमविला असे म्हटल्यास वावघे ठरणार नाही.
साहेबांची पहिली पोष्टींग गडचिरोलीला झाली. लोकं तिकडे जायला घाबरतात हो. पण हे महाशय तेथे इतके रमले की ते तेथील बटालियनचे प्रमुख झाले. त्यांच्या टिमने अनेक दहशतवादी व नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. अगदी गडचिरोलीच्या इतिहासात सुवर्णाक्षरात लिहावा असा इतिहास त्यांच्या काळात झाला. त्यानंतर साहेब थेट अहमदनगरला आले. पहिलाच जय हिंद ठोकला एसपी लखमी गाैतम यांना. उंचपुरा, गाेरापान, काटक अंगकाठी, कपड्याची प्रचंड स्वच्छता, चालीचा रुबाब, आणि शब्दात उतुंग आत्मविश्वास. कर्मयोगी व्यक्तीमत्व जाणणार नाही ते आयपीएस कसले? त्यांनी पहिल्याच वेळी चव्हाण साहेबांना नगर तालुका पोलीस ठाणे बहाल केले. मग काय. असं गाव नाही, तेथे त्यांची भेट नाही. असा तरुण नाही, ज्याच्या पाठीवर त्यांचा हात नाही. असा व्रद्ध नाही, ज्याच्या तोंडी त्यांचे नाव नाही. असा गुन्हेगार नाही, ज्याच्या अंगावर त्यांचे नाव एेकताच काटा उभा राहिला नाही. पोलीस जनतेसाठी असतात याची प्रचिती जर लोकांना झाली असेल तर ती चव्हाण साहेबांच्या रुपानं नगरला झाली. नंतर कोतवाली पोलीस ठाण्यात असताना स्थानिक पीआय त्यांना ढाण्यावाघ म्हणत असे. कारण कोठेही जायचं ठरलं तर जिल्ह्यातील सर्वांत मोठं पोलीस ठाणं हा एकटा ढाण्यावाघ अगदी सहज सांभाळत असे. त्यांच्या काैतुकाच्या कहाण्या आम्ही खूप एकल्या आहेत. म्हणूनतर त्यांना लोकमान्य अधिकारी संबोधले जाते.या पलिकेड त्यांनी स्नेहालय, मदरसा, अनाथ आश्रम, वस्तीशाळा आणि हजारो गरजूंना लाखो रूपयांचे दान दिले आहे. कोठे अन्नाच्या स्वरुपात तर कोठे धान्याच्या, कोठे वही पुस्तके तर कोठे रोख रकमा. काय लिहावं या खाकीतल्या दानशुर कर्णाबाबत. लोक असेच लोकमान्य होत नाहीत. त्याला झिजावं लागतं चंदनासारखं. साहेबांनी नंतर भिंगार, एमआयडीली पोलीस ठाणे संभाळले. एसपी डॉ. साैरभ त्रिपाठी यांनी दिलेल्या प्रत्येक संधिला ते सार्थ ठरले.
खरं महत्वाचं सांगायचं ठरलं तर एखाद्याने एक डिगरी घेतली तर त्याचा मिजास काय विचारावा. पण साहेब अॅग्री, एमबीए, एमए, एलएलबी, एलएलएम, डिसीजे (पत्रकार) अशा डिगऱ्या घेऊन अजूनही शिकत आहे. काय अस्था आणि आवड म्हणायची शिक्षणाची. साहेब तसे तर मराठा. पण त्यांनी डॉ. बाबासाहेब डोक्यात घेतला डोक्यावर नाही. ते जेव्हा आभ्यास करायचे तेव्हा टेबलावर प्रेरणा म्हणून फक्त आणि फक्त बाबासाहेबांचा फोटो असायचा. याला म्हणतात अनुयायी. आता अजकालच्या अनुयायांविषयी भाष्य न केलेलेच बरे.
आहो-! इतकेच काय. एखाद्याची पत्नी साधी शिपाई असूद्या. आणि मग नवऱ्याचा रुबाब पहावा. पण खरं सांगू.! ताईसाहेेब आमच्या जज (न्यायाधिश) आहेत. पण माऊली जसा न्यायालयात न्याय देतात तशा घरालाही. अगदी सर्व कामे करून टापटीप असतं घर. दोन मुले आहेत राम-लक्ष्मण पण इतके छान संस्कार आहेत. साहेबांकडून शिकावं ते पालक आणि ताईंकडून शिकावं ते मात्रत्व. दोघांचाही आई-वडिलांवर प्रचंड जीव आहे. आई-बाबा म्हणजे अगदी देव माणसं. मग त्यांच्या पोटी जन्म घेणार तरी कोण? देवच ना.! किती लिहावं साहेबांवर... शब्दच पुरू शकत नाही. खरंतर मला भाग्य लाभावं त्यांच्या आयुष्याला एका पुस्तकात बंधिस्त करण्याचं. त्यासाठी माझं आयुष्य खर्ची पडलं तरी मी हसत द्यायला तयार आहे. सानिध्य नाही साहेबांचं आम्हाला. पण जिथं-तिथं काैतुक होतं. म्हणून ते कर्म पेरत गेले आणि आज आमच्यासारखे त्याची मशागत करत आहेत. उगविण्यासाठी. कारण चांगलं पेरुनही उगवलं नाही तर लोकं पेरायचं सोडून देतील आणि विघातक समाज निर्माण होईल. म्हणून चांगल्या बियांची जोपासना आम्ही लिखानातून करतोय. त्यातलं हे एक अनमोल "बी" म्हणजे साहेब. ज्या झाडाला समाजकल्याण नावाची पालवी आहे. आणि कोणत्याही परिस्थितीत सहकार्य नावाचे फळ आहे. अशा औदुंबरास उदंड आयुष्य लाभो.