नशिब, "भंडारदरा धरण" बांधताना "शिवसेनेची सत्ता" नव्हती
काल परवा चिपळून येथे तिवरे धरण फुटले. तेवीस जणांना आपला देह पाण्यात गुद्मरून समर्पित करावा लागला. अर्थात ही कल्पना केली तरी अंगावर शहारे उभे राहतात. बरं, जे झाले ते नैसर्गीक होते असे समजू. पण, दोषींना पाठीशी घालण्यालाही काही मर्यादा असतात. म्हणे तो ठेकेदार शिवसेनेचा आमदार होता. म्हणून खेकडांवर धरण फोडल्याचे खापर फोडले. हे कारण एकले आणि मन सुन्न झाले. मी ही प्रवरेच्या काठीच राहतो, अगदी कडेला. जर भंडारदरा धरणातून १५१५ घनमिटरचा सर्वेच्च विसर्ग सोडला तरी पाणी अगदी आमच्याच काय हजारो घरांच्या उंबऱ्याजवळ येेते. देव न करो अन काही अनर्थ घडो. पण तरी आम्ही नशिब आमचे मानतो की भंंडारदरा धरण शिवसेनेच्या काळात आणि त्यांच्या कोण्या ठेकेदाराने बांधलेले नाही. किमान किड्या मुंग्या आणि खेकडांवर लोटण्यापेक्षा ती वेळ तरी येणार नाही. अन आलीच एखादी आपत्ती तर जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा तर होईल.
अर्थात १९१० साली भंडारदरा धरण बांधणीला सुरूवात झाली. तर १९२६ ला लेल्सी यांनी त्याचे उद्धाटन केेले. आज तब्बल १०८ वर्षे होत आली पण कोणत्याही खेकड्याने कधी असली खोडाळी काढली नाही. पण तिवरे धरणाचे दुर्दैव की, अवघ्या २० वर्षात खेकडांनी अगदी आपापल्या पिढीने नेमून दिलेले काम पुढे चालू ठेवत धरणाचे अंतर्गत खोदकाम तडीस नेले. ठेकेदाराशी दुश्मणी म्हणायची की, सरकारशी देव जाणे. पण सरकारी अहवालानुसार कामगिरी दमदार केली हे नक्की. खरंतर कोकणातील नारळ आणि रत्नागिरीचे हापूस आंबे फेमस नाही तर तेथील "रगदार खेकडी" फेमस आहेत असे म्हटल्यास वावघे ठरणार नाही. काय म्हणावं या अहवालास. नाशिकचे गंगापूर धरण, कोल्हापुरचे राधानगरी धरण हे मातीचे असून शंभर वर्षे लोटली तरी अजून थेंब गळेना. आणि कालचे धरण फुटले !!!!!
वास्तव पाहता अकोल्यात ३.२२० सरासरीने पाऊस पडतो. त्यामुळे हा भाग नेहमी ओला असतो. त्यात खेकडांचे वास्तव्य अवाजवी असते. खरंतर अकोल्याच्या शिवसेना आणि बीजेपी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे सरकारला पत्र लिहीले पाहिजे. कि, आमच्याकडे "आधुली" इतक्या मोठ्या आकाराचे खेकडे असतात. ते ही रस्त्यावर. पण, ते माणसाला देखील कधी काटत नाही, इतकी शांत जात आहे ती. मानसं त्याला काटतात तो भाग गाैन, पण त्यांना जर डिवचलं तर मात्र रक्ताळल्याशिवाय सोडत नाही. म्हणून उगच त्या जातीला बदनाम करू नका. जो कोणी दोषी असेल त्याला आरोपी करा. जे निष्पाप जीव गेले त्यांना न्याय द्या. पण समाज्याला लाजवेल अशी कारणे देऊ नका.
उद्या जर कधी आढळा, पिंपळगाव, निळवंडे किंवा भंडारदरा यांची गळती सुरू झाली तर चुकून कोणी शिवसेना भाजपच्या लाेकांशी संपर्क करू नका. अन्यथा असले बालीश कारण एकावी लागतील. कारण, शिवसेनेवर पुर्वीपासून आरोपींना पाठीशी घालण्याची परंपरा असल्याचा आरोप होतो. हे आता नव्याने काय सांगायचं ते सर्वांना दिसतेच आहे.
खरे पाहता दोन वर्षापुर्वी नगर जवळच निंबोडी येथे एक शाळा पडली होती. तीचे बांधकाम असेच २५ वर्षापुर्वीचे होते. त्यात दोन विद्यार्थ्यांचा बळी गेला होता. त्यावेळी शासनाने ३०४ (अ) सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला होता. त्यात मुख्याध्यापक, सरपंच, सदस्य, ठेकेदार, शिक्षण अधिकारी, केंद्रप्रमुख आणि अभियंता यांच्यासह अनेकांना आरोपी केले होते. सावित्री पुल पडला होता. तेव्हाही तेच झाले होते. मग या घटनेत इतकी दिरंगाई का ? वाहुन गेलेली घरे आणि मानसे तसेच निरापराध जीव यांच्या म्रुत्युला दोषी कोण ? तर म्हणे खेकडे ! हे कायद्याचं नाही तर हुकूमशाहीचे सरकार आहे असेच वाटू लागले आहे. हाच ठेकेदार कधी राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा असता तर.? बाप रे..! सरकारने आत्तापर्यंत १० ते १२ पत्रकार परिषदा घेतल्या असत्या. याची प्रचिती नितेश राणे यांना अटक करण्यात दाखविलेली चपळाई तेव्हाच सांगून जाते. "अन्यायाला न्याय नाही, न्यायाला दार नाही, असेच उद्धवा तुझे सरकार".
विषय गंभिर आहे. पण गांभिर्याने कोणी घ्यायला तयार नाही. मेले ते वाहुन गेले, पक्षांचे वाचवा-वाचविचे राजकारण सुरू झाले. जे संसार उध्वस्त झाले त्यांच्याकडे सरकार घरातील वस्तु विकत घेतल्याच्या पावत्या मागत आहेत. काय म्हणावं या सरकारला. म्हणून बरं वाटतं राष्ट्रवादी सरकार अकोल्यात तरी. नाहीतर तिवरे सारख्या तिरड्या देखील बांधायची गरज पडणार नाही. नदिकाठच्या आम्हा मानसांना.
महत्वाचे म्हणजे भंडारदरा धरण मजबूत आहे. ते कोणत्याही पक्षाच्या ठेकेदाराने नव्हे किंवा अनुदानावर नव्हे तर इंग्रजांनी १ कोटी १३ लाख ९० हजार ६० रुपये ही त्याकाळची रक्कम खर्च केली आहे. तसेच नंतरच्या काळात माजी मंत्री मधुकर पिचड यांनी त्याचे चांगले संवर्धन केले आहे. त्यामुळे शास्रद्न्या सरकर व सेनेचे कितीही मोठी खेकडे आली तरी त्याला पोखरू शकत नाही. म्हणून निच्छित रहा. उद्या बेडकांनी उड्या मरून रस्त्याला खड्डे पडले अशा प्रतिक्रिया आल्यातर आश्चर्य वाटू देऊ नका. किंवा उंदरांनी जमीन पोखरली म्हणून भुकंपाचे साैम्य धक्के बसले असा अहवाल बाहेर आला तर कपाळावर हात मारू नका. कारण आपलं सरकार, कामगिरी दमदार......
------------------
एस. एस शिंदे