"पक्षप्रवेशापुर्वी" विधानभवनात "अजित दादांनी" धरला "वैभव पिचडांचा" हात अन्....

पक्षप्रवेश करू नका..!

मुंबई :-
     अकोल्यात दहा वर्षे आमदार राहुनही सत्तेची मजा चाखायला  मिळाली नाही. त्यामुळे भाजपचे वाहते वारे पाहुन अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. ही प्रक्रिया लपत छपत सुरू असताना काल अचानक विधानभवनात अजित दादा पवार व पिचड साहेब यांची अचानक समोरासमोर भेट झाली. दादांनी भाऊंचा हात धरताच डोक्यात काय उधान माजले असेल हे मी काय सांगू ! पण पक्षप्रवेश करण्यापासून त्यांना पराव्रुत्त करण्यात आल्याचे संकेत दादांनी दिले. या दरम्यान त्यांच्यासोबत असणाऱ्या दोन नेत्यांना मात्र पळता भूई थोडी झाली होती. याचे चित्रण प्रत्यक्ष पहावयास मिळाले.
राष्ट्रवादीचे आमदार वैभव पिचड हे भाजपात जाणार की शिवसेनेत यावर उलटसुलट चर्चा सुरू आहे. ना. विखे साहेबांच्या सहकार्यातून ही राजकीय सुनामी जिल्ह्यात सुरू झाली आहे. त्याची सुरूवात अकोल्यापासून झाली आहे. राजकीय कारणास्तव अकोल्याचे "अपराजित" आमदार मुंबईत ठाण मांडून आहे. तर राज्याचे ग्रुहनिर्माणमंत्री विखे पाटील हे देखील मुंबईत आहेत.
      दरम्यान आ. पिचड हे विखे साहेबांच्या बंगल्याजवळ असताना विजय वेडट्टीवार यांच्या बंगल्यासमोरुन अजित दादा पवार यांचा ताफा चालला होता. अचानक ही दोघे समोरासमोर आले व दादांनी भाऊंचा हात धरला. सगळे कार्यकर्ते भान विसरून गेले. मात्र, जास्त काही खळबळ होण्याच्या आधीच दादांनी काही शब्द पुटपुटले. पक्षप्रवेश करु नको असे म्हणून काही देहबोलीच भाषा झाली. यावेळी अनेकांचे चेहरे पाहण्यासारखे होते. यावेळी अकोल्यातील बडे मानले जाणारे दोन नेते तोंड लपवून मागे सरकले व तेथून पळ काढला. अर्थात दादांनी त्यांच्याकडे वळून पाहिले. मात्र, त्यांची हतबलता ओळखून जो-तो आपल्या मार्गाने निघून गेला.
     

सु स्वागतम

हा प्रकार लायू पाहण्याचे भाग्य अकोले व संगमनेर येथील कार्यकर्त्यांच्या नशिबी आला. यावेळी काही खलबते झाली. मात्र, काही गोष्टी गोपनिय ठेवण्यात आल्या आहेत.
-------------------------
     -- सागर शिंदे