राष्ट्रवादीच्या "उमेदवार मुलाखत" हजेरी पटावर; दोन्ही "पिचड" गैरहजर


 
अहमदनगर (प्रतिनिधी) :-
                    पक्षांतराच्या चर्चा एकीकडे सुरू असताना दुसरीकडे राष्ट्रवादीच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. बंडाची भूमिका घेतलेले आमदार वैभव पिचड व राष्ट्रवादीचे मार्गदर्शक मधुकर पिचड साहेब आपली हजेरी लावतील का ? यासाठी सगळ्यांच्या नजरा राष्ट्रवादी भवनाकडे लागल्या होत्या. मात्र, अखेरपर्यंत दोन्ही पिचड राष्ट्रवादीच्या पटावर गैरहजरच असल्याची नोंद झाली.
          राष्ट्रवादीसाठी हा दिवस काळा म्हणायचा की काय माहित नाही. पण, आज दि.२५ जुलै रोजी सकाळी सचिन अहिर सेनेत दाखल झाले. अगदी फारशी चर्चा नसताना त्यांनी "झट मंगनी, पट ब्याह" अशी भुमिका घेतली. मात्र, गेली कित्तेक दिवस पिचड व संग्राम जगताप यांच्या पक्षपाताच्या बातम्या व्हायरल होत आहे. आज मुलाखतीची वेळ आली तरी अजूनही "भिजत घोंगडेे" पडले आहे.
वैभव पिचड शिवसेनेत की भाजपत यावर उलट-सुलट चर्चा होत असली तरी वास्तवावर कोणताही नेता व जवळचा कार्यकर्ता बोलायला तयार नाही. अर्थात ना.  विखे साहेबांना हे तरुण नेत्रुत्व भाजपत घ्यायचे आहे. मात्र, शिवसेना जागा सोडायला तयार नाही. "मुख्यमंत्री पदाची खुर्ची" कोणाची ? हा नवा वाद उठल्यामुळे दोन्ही पक्ष एकमेकांना आजमावु शकतात. ज्याचे संख्याबळ तो खुर्चीचा दावेदार. त्यामुळे मातोश्रीवरून अकोल्याच्या जागेसाठी "हो" शब्दोच्चार येईना. तरी, राहुरीची जागा शिवसेनेला व अकोल्याची भाजपला अशी मांडवली सुरू आहे. मात्र, शिवसेनेचे कार्यकर्ते अकोल्यावर ठाम आहे. त्यांना भाजपची हुजरेगिरी नको तर पिचड शिवसेेनेत हवे आहे. मात्र, शरद पवार आणि  दादांना माननारा वर्ग वेगळा आहे. त्यामुळे पिचड साहेबांचा हा निर्णय अनेकांना मान्य नाही. तर दुसरीकडे भाजप पुर्ण अस्वस्थ आहे. कारण कट्टर विरोधकांमध्ये बळच का होईना पण चेहऱ्यावर हसू ठेवावे लागणार आहे. त्यामुळे सद्यातरी साहेबांच्या या निर्णयाने सगळ्यांची गोची झाली आहे.
आज राष्ट्रवादीच्या मुलाखतीत वैभव पिचड व त्यांच्या पिताश्रींना गैरहजेरी लावली. कोठेतरी साहेबांचा निर्णय बदलेल असे वाटत होते. मात्र, ते देखील झाले नाही. आता या गैरहजेरीने त्यांच्या पक्षप्रवेशावर मोहर लागली आहे. काही झाले तरी वैभव पिचड आमदार होणार हे नक्की. जर ते शिवसेेनेत गेले आणि युती झाली तर त्यांच्याइतके लिड कोणाला नसेल. युती झाली नाही तरी निवडून येतील. काही झाले तरी पाच वर्षात एकदा तरी मंत्रीपद मिळेल. कारण, शिवसेना-भाजप यांच्याकडे ओव्हर कमी अन खेळाडू जास्त अशी परिस्थिती आहे.
                  दरम्यान नगर शहराचे आमदार संग्रम जगताप हे मुलाखतीस उपस्थित नव्हते. त्यांचे पिताश्री आ. अरुणकाका जगताप यांनी बैठकीला हजेरी लावली. तर श्रीगोंद्याचे आमदार राहुल जगताप  यांनी देखील मुलाखत दिली. जशी पार्थ पवारची उमेदवारी गाजली तशी रोहित पवार यांची उमेदवारी चर्चेचा विषय ठरणार आहे.
         
-------------------------------------
         सागर शिंदे