राष्ट्रवादीचे "छगन भुजबळ व सचिन अहिर" शिवसेनेत तर "वैभव पिचड" भाजपात..!?

मुंबई :- 
      काँग्रेस राष्ट्रवादीला संपविण्यासाठी शिवसेना व भाजपने चांगलेच फासे टाकले आहे. त्यात काँग्रेस पुरती संपली असून राष्ट्रवादीला खिंडार पाडली आहे. कारण, नाशिकचे छगन भुजबळ शिवसेनेत "स्वग्रुही" परतण्याच्या मार्गावर आहेत. तर, राष्ट्रवादी मुंबईचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी "शिवबंधन" बांधण्यासाठी हातातील "घड्याळ" सोडले आहे. तसेच अकोल्याचे विद्यमान आमदार यांनी विखे पाटील यांच्या बोटाला धरून भाजपात प्रवेश केल्याचे जवळ-जवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे भुईसपाट झालेल्या काँग्रेस शेजारी बसून राष्ट्रवादीला देखील भुईसपाट होण्याची दुर्दैवी संधी लाभली आहे. असे म्हटल्यास काही वावघे नाही.
लोकसभेत काँग्रेसला मोठी हार पत्करावी लागली. त्यामुळे अनेक दिग्गजांचे "मोरल डाऊन" झाले. त्यात शिवसेना व भाजपचा वाढता आवाका लक्षात घेता, काँग्रेस राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी बंडखोरी सुरू केली. अर्थात ही त्यांची चूक नाही. कारण, शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी याच बड्या नेत्यांना नेहमी सत्तेची लालसा लावून ठेवली. त्यामुळे आता त्यांना सत्तेवाचून करमेनासे झाले आहे. ही अस्थिरता यांनी केव्हर सहन करायची. त्यामुळे "जोवर ताटात जेवण आहे. तोवरच ताटावर बसण्यात मजा आहे". असेच काहीसे चित्र तयार झाले आहे. आणि भाजप सरकारने  गेली ५० ते ६० वर्षे यांच्या कारभाराचा आढावा घेऊन सगळ्यांच्या नसा दाबण्याचे काम केले आहे. तर राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार जे लोक विरोधी पक्षात आहेत त्यांनी पुर्वी गडगंज प्रॅपर्टी तयार केली आहे. तर कोणी संस्था उभ्या केल्या आहेत. या सर्वांची "रसद" शासनाने बंद केली आहे. त्यामुळे अनेकांचा पर्याय संपला आहे. सरकारने अनेक बड्या नेत्यांना अपसंपदा आणि सीबीआय चौकशीच्या फेऱ्यात अडकवून घेतले. त्याला राॅबर्ट वाड्रा, गांधी घराणे, पवार, भुजबळ घराणे देखील सामोरे गेले. त्यामुळे ही राजकीय अस्थिरता निर्माण झाली असून सत्तेत का होईना पण सहभाग हवा. त्यामुळे ही पळापळ सुरू झाली आहे.

नाशिकमध्ये एकवेळी "बादशाह" असलेला माणूस आज आमदारकी सोडा नगरसेवक होणे मुश्किल झाले आहे. आणि आता ज्या केसेसमध्ये अडकले आहे तेथे दोन वर्षाच्या वर कारावास भोगला आहे. त्यावेळी राष्ट्रवादीने योग्यवेळी दखल घेतली नाही. काही दिवसांनी असहाय्य झाल्यानंतर पवारांचे पत्र जाहिर झाले. नगरमध्ये देखील केडगाव हत्यांकांडात राष्ट्रवादीच्या आमदारांची नावे गोवली गेली. त्यांना तीन महिने कोठडीत रहावे लागले. या दरम्यान राष्ट्रवादीने केवळ बघ्याची भुमीका घेतली. जर आमदार, खासदार असून चुकीच्या आरोपांना स्वत:साठी न्याय मिळत नाही. किंवा पक्ष पाठीशी उभा रहात नाही. मग उपयोग तरी काय ! हाच गुन्हा सरकारमध्ये असणाऱ्या आमदारावर होऊद्या. तेथे सहकार्य केले जाते. साधे उदाहरण पहायचे झाले तर तिवरे धरण फुटले. काय झाले ? खेकडे आरोपी निघाले. लोक विसरून गेले. त्यामुळे अनेक नेते आपापल्या पक्षांवर नाराज आहे. असे मत बंडखोरांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे विरोधी बाकावर बसण्यापेक्षा सत्तेत निव्वळ बाकावर बसले तरी चालेल अशी भुमिका काही बंडखोरांनी घेतली आहे.
अकोल्याचे ३५ वर्षे आमदार व माजी मंत्री असणाऱ्या राष्ट्रवादीचे फाऊंडर मेबर मधुकर पिचड यांची बंडखोरी सगळ्यांच्याच जिव्हारी लागली आहे. "मराठा अस्मिता" आणि "जाणता राजा" म्हणून पवारांची ओळख आहे. त्यामुळे जातीय समिकरणे पाहता पिचडांना बहुतांशी विरोध सहन करावा लागला आहे. असे असताना पवार साहेबांनी पिचड साहेबांना मंत्रीपदे व प्रदेशाध्यक्ष केले. मात्र, पडत्या काळात त्यांनीच घड्याळाला चावी दिली. आणि घड्याळाचे काटे उलट दिशेने फिरू लागले. त्यामुळे अजित पवार यांनी रोष व्यक्त केलाच. मात्र, आता अबोल पवार साहेबांच्या चाली काय असणार आहे. याकडे सगळ्याच्या नजरा लागून आहे. चला येणाऱ्या काळात विधानसभेत अजून किती पडझड होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरण़ार आहे. बाकी सरकार कोणाचेही येवो आणि जावो. आमच्या शेतकऱ्यांची आत्महत्या थांबूद्या, बेरोजगार तरुणांना काम मिळूद्या आणि भारतात जातीमुळे दंगे व अराजकता निर्माण होते ती थांबूद्या. इतकेच मत सामान्य जनतेचे आहे.
-------------------------------------
          -- सागर शिंदे
-------------------------------------

प्रिय वाचक :- रोकठोक सार्वभाैम आपले मनस्वी आभार व्यक्त करीत आहे. कारण, अवघ्या ११ दिवसापुर्वी सरू झालेल्या पोर्टलला आपण डोक्यावर घेतले आणि २० बातम्यांचे १ लाख २० हजार वाचक झाले. म्हणून संपादकीय आपल्या ऋणात आहे. पुन्हा नमुद करतो. वाचा आणि शेअर करा.

-----------------------
आपला मित्र
सागर शिंदे