...अखेर "आमदार वैभव पिचड" यांच्या "पक्षप्रवेशावर मोहर", मुंबईत "नाट्यमय घडामोडी"
To Be Or Not TO Be... |
अकोले (प्रतिनिधी) :-
अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांच्या बंडखोरीचा चर्चा चांगलीच रंगली आहे. ही जागा शिवसेनेकडे असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा सुरू असून जर जागेची "खांदेपालट" झाली तर "भाजप" नाहीतर "शिवसेना" असा नाट्यमय प्रकार मुंबईत सुरू असल्याची माहिती विश्वसनिय सुत्रांनी दिली. त्यामुळे जवळ-जवळ पिचडांनी "शिवसेनेवर मोहर" लावल्याचे बोलले जात आहे.
"बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले" असेच काही विखे पाटील यांनी लोकसभेत करून दाखविले. आता जिल्ह्यात एकही आमदार अन्य पक्षांचा निवडून येऊ देणार नाही अशी शपत त्यांनी घेतली होती. त्यामुळे ते कामाला लागले असून नगर शहरातून "संग्राम जगताप" व अकोल्यातून "वैभव पिचड" यांना त्यांनी पहिल्या अजेंड्यावर घेतले आहे. विखेपाटील भाजपात गेले खरे, पण त्यांनी ज्या ठिकाणी हात घातला आहे. त्या दोन्ही जागा शिवसेनेच्या आहेत. "मानसे आपली आणि जागा दुसऱ्याच्या" अशी फसगत झाली आहे. आता नगरच्या जागेवर उपनेते अनिलभैया राठोड हे २५ वर्षे आमदार होते. मात्र, युती न झाल्यामुळे मागिल निवडणुकीत त्यांना अवघ्या तीन हजार मतांनी पराभव स्विकारावा लगला. त्यामुळे ही जागा अगदी थोड्या मतांनी हुकल्याने अर्थातच शिवसेना त्यावर दावा करणार हे त्रिवार सत्य आहे. तर अकोल्यात गेली ३५ वर्षे शिवसेना राष्ट्रवादीला टक्कर देत आहे. अशोक भांगरे आणि मधुकर तळपाडे हे परंपरागत योद्धे असून दोघांची ताकद एक न झाल्यामुळे आजवर पिचड साहेबांचे फावले आहे. त्यामुळे उद्या युती झाली तर ही जागा शिवसेना जिंकू शकते. असे असताना ठाकरे साहेब या जागा भाजपला का देतील ? हा सर्वसाधारण प्रश्न आहे.
आईये आपका स्वागत हैै ! |
मंगळवार दि. २३ रोजी दुपारी अकोल्याचे एक शिष्ठमंडळ पाटलांना भेटले. पाहुणचार झाल्यानंतर ते स्वत: ठाकरे साहेबांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेल्याचे समजते आहे. आता काय चर्चा झाली याचे विश्लेषण मिळाले नाही. मात्र, शिवसेनेने ही जागा भाजपसाठी सोडावी. ती निवडून आणण्याची जबाबदारी विखे पाटील घेणार असल्याचे बोलले जात आहे. आणि जर तसे नाही झाले तर "अकोल्याचे वैभव" हातातून "घड्याळ" काढून शिवधनुष्य पेलणार असल्याची माहिती हाती आली आहे. काही झाले तरी एक नक्की आहे. जर वैभव पिचड यांनी शिवसेनेतून निवडणूक लढविली तर "आजवर अकोल्याच्या इतिहासात कधी नव्हे इतक्या फरकाने ते निवडून येतील". मात्र, कालपर्यंत घड्याळाशी एकनिष्ठ राहिलेले कार्यकर्ते भगव्या झेंड्याखाली रमतील का ? रमले तरी खरे शिवसैनिक आणि अॅन्टी शिवसैनिक यांच्यात ताळमेळ बसेल का ? अर्थात पिचड यांनी पक्षपरत्वे नाही तर व्यक्तीपरत्वे राजकारण केले आहे. त्यामुळे जनता व त्यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते त्यांना डावलणार नाही. अशा परिस्थितीत "कानामागून आली आणि तिखट झाली", अशी तू-तू, मै-मै शिवसैनिकांमध्ये कायम चालणार आहे.
------------------------
पिचड साहेबांच्या बंडानंतर काय असेल मतदारसंघात परिस्थिती? काय असेल विरोधकांची भूमिका ? वाचा क्रमश: भाग : 4
---------------------------