पोलिसालाच ठोकल्या बेड्या
संगमनेर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पाेलीस नाईक रामनाथ महादेव सानप यानी दहा हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. सानप यांनी दि.११ जुलै रोजी ही डिमांड केली होती. ती रविवार दि. १४ जुलै २०१९ रोजी स्विकारताना ही कारवाई करण्यात आली.
संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल भादवि कलम 326 या गुन्ह्यात दोषारोपुत्र सादर करणे व चाप्टरकेस सदर्भात मदतीच्या मोबदल्यात ही अर्थपुर्ण तडजोड झाली होती.
सदर कारवाई डिवायएसी श्याम पवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिपक करांडे पोलीस निरीक्षक यांनी केली.