संगमनेरच्या "स्वच्छ" परिषदेत "अस्वच्छ" कारभार; "पाणी", "आरोग्य" व कचऱ्याचा "ताई" करेना विचार
संगमनेर (प्रतिनिधी) :-
"उची लोग, उची पसंद" अशी एक म्हण आहे. तीच तांबे आणि थोरात कुटुंबियांना लागू होते. आपलं आहे ते चांगलं चाललं पाहिजे गोरगरीब लोकांच काही होवो, घेणेदेणे नाही. जसे या दोघांचे बडे-बडे दवाखाने आहेत. त्यांना संगमनेर शहरात काॅटेजमध्ये दवाखाना अपेक्षित असेल तरी कसा.? आणि शहरातील सामान्यांचे शोषण करणारे थोरातांचे समर्थक असणाऱ्या डॉक्टरांचे पोटं भरतील तरी कसे. दुसरी गोष्ट म्हणजे सामान्य जनता दुषित पाणी पित आहे. रोज स्वत:ला शुद्ध पाणी मिळते, आजारी पडले तरी स्वत:चे प्रशस्त दवाखाने त्यामुळे सामान्य माणूस रक्ताचे पाणी पेवून मेला काय अन् जगला काय, त्यांना काही कदर नाही. त्यामुळे नगरपरिषद ही त्यांच्या ताब्यात असून शासकीय रुग्णालय आणि शुद्ध पाण्याचा प्रश्न सुटेल कसा ? अशी अपेक्षा संगमनेरकरांनी ठेऊ देखील नये. असे आवाहन समाज सेवकांनी केले आहे. तर तिसरी गोष्ट म्हणजे संगमनेरचा कचराडेपो हा कुरण येथे कागदावर दाखविण्यात आला आहे. वास्तवात तो संगमनेर खुर्द येथे स्थापित आहे. याबाबत शासनाला खोटा अहवाल सादर करून दिशाभूल केली आहे. त्यामुळे पाणी, आरोग्य आणि प्रदुषण यांचे तीन तेरा वाजले असून स्वच्छ पालिकेत अस्वच्छ कारभार पहावयास मिळत आहे. तर संगमनेरचे मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्रस्तापित थोरात व तांबे कुटुंब अयशस्वी ठरत असून त्यासाठी ना. विखे पाटलांची गरज असल्याचे सुर सद्या उमटत आहे.
अशुद्ध पाण्यावर "सार्वभाैम पोर्टल"ने "प्रवरामाई रक्ताळली" या मथळ्याखाली प्रकाश टाकला होता. त्यानंतर संगमनेरला जाग आली. काही समाजसेवकांनी यावर आवाज उठविला आहे. तर, भाजपने यात उडी घेतली असून, संगमनेर शहर भाजप तर्फे नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी, राम जाजू, शहराध्यक्ष राजेंद्र सांगळे, उत्तमराव करपे, नगरसेविका मेघा भगत, कांचन ढोरे, महिला शहराध्यक्ष ज्योती भोर, रेशमा खांडरे, सुरेखा खरे, अनीता जव्हेरी, सुधाकर गुंजाळ, प्रमोद भोर, कल्पेश पोगुल, जग्गू शिंदे, भारत गवळी, मनोज जुंदरे, दीपक भगत, सुनील खरे, आजिम शेख, दिलीप रावल, हर्षल अवसरे, महेश मांडेकर, अरुण कुलकर्णी, अरुण पवार, भरत ढोरे, शाम कोळपकर, सोमनाथ मेहेतर, शिवकुमार भांगिरे, चिराग साहू, प्रकाश म्हसे यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून नळांद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यात कपात आणि तरीही गढूळ व दूषित पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नागरिकांना स्वच्छ पाणी देणे आपले मूलभूत कर्तव्य असताना, अक्षम्य व अकार्यक्षमतेचा तथा दिरंगाईचा वरील सर्वांनी निषेध केला आहे. इतकेच काय तर एका काॅलेजला अशाच घानेरड्या विहीरीतून पाणीपरवठा होतो आहे. तेच पाणी विद्यार्थी पीत आहे. हे सर्व माहित असून देखील पालिका प्रशासन याकडे कानाडोळा का करीत आहे हेच कळेनासे झाले आहे. संगमनेर काँग्रेसप्रणीत असून सर्व एकहाती सत्ता आहे. जनतेने इतकं भरभरून पदरात दिले असून जनतेचे ऋण फेडण्याची मानसिकता यांच्यात का नाही ? असाही प्रश्न सामान्य जनतेकडून विचारला जात आहे.
फक्त विधानसभा संधी द्या! |
दरम्यान, संगमनेर नगर परिषदेच्या बंद झालेल्या कॉटेज रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालय सुरु करण्याच्या मागणीबाबत मुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्री यांच्याकडे आपण व्यक्तीश: पाठपुरावा करु अशी ग्वाही गृहनिर्माण मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिष्टमंडळास दिली. या शिष्टमंडळात दिपक भगत, शरद गोर्डे, वैभव लांडगे, सिताराम मोहरीकर, डॉ.महेंद्र कोल्हे, भगवान कुक्कर, सतिश वाळुंज व शाम जेधे यांचा समावेश होता.
महत्वाचे
नगरपालिकेचाखोटेणा
सन-2017-2018 चा कचरडेपो बाबतचा प्रदूषण नियंत्रण मंडळाने अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. या अहवालामध्ये नाशिक रिजन मध्ये अनुक्रम नंबर 18 वर "संगमनेर नगर पालिका" असे नमूद आहे, त्यामध्ये कचरा डेपो "कुरण" गावामध्ये आहे आणि शहराचा संपुर्ण कचरा मौजे गाव "कुरण" येथेच टाकला जातो, त्यावर "कुरण" येथील "कचरा डेपो" मध्ये कुजविलेले खत व गांडूळ खत निर्मिती केली जाते. असे नगरपालिका "महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास" कळवीत आहे. आणि त्या प्रमाणे प्रदूषण नियंत्रण मंडळ देखील "डोळे झाकून" अहवाल प्रसिद्ध करत आहे. संगमनेर नगरपालिका कचरा डेपो कुरण या गावांमध्ये असल्याचे प्रदूषण मंडळास कळवीत आहे आणि प्रत्यक्षात शहराचा कचरा संपूर्ण कचरा "संगमनेर खुर्द" मध्ये स.न. 72, 73 मध्ये आणून टाकत आहे. असे सदरचे अहवालावरून दिसून येते. म्हणजे पालिका कचरा डेपो कागदोपत्री "कुरण" गावामध्ये असल्याचे दाखविते आणि प्रत्यक्षात कचरा "संगमनेर खुर्द" गावामध्ये आणून टाकते... हे MPCB चे अहवालावरून दिसते, आता तरी ग्रामस्थांनो जागृत व्हा, आपल्या न्यायी हक्कासाठी...
-----------------------------------------
सुशांत पावसे
सागर शिंदे