आता महाराष्ट्राचे "कमळ" 'चंद्रकांत दादा' पाटीलांच्या हाती, प्रदेश अध्यक्षपदी निवड


मुंबई (प्रतिनिधी) :- 
     महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या मुख्यालयातून ही माहिती जाहीर करण्यात आली आहे. 
       मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री पद मिळाल्यानंतर भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांना यांनी आज भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर ही धुरा पाटलांकडे सोपविण्यात आली आहे.
         तर भाजपचे मुंबई अध्यक्ष पदावर असलेले आशिष शेलार यांना राज्यात मंत्री पद देण्यात आल्यानंतर, मंगलप्रभात लोढा यांना मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्त करण्यात आले आहे.