संगमनेरात फाॅर्च्युनर गाडीत 43 लाखांचा ड्रग्ज पकडला, सुसंस्कृत शहराला दारु, गांजा, मावा मटक्याचे व्यसन, तरुणाई ड्रग्जने नशाधुंद.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर शहरातील नाशिक-पुणे हायवेजवळ परिवार किराणा लगत गणेश नगर परिसरात असणाऱ्या परिसरात हाय प्रोफाइल ड्रग्ज फॉर्च्युनर गाडीत विकरी करताना तब्बल 43 लाख रुपयांचा मुद्देमाल आज शुक्रवार दि.21 नोव्हेंबर रोजी पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान पोलिसांनी हस्तगत केला. यामध्ये आशिष सुनीलदत्त मेहेरे (वय 28, रा. पुष्पकुटी बंगला शिवाजीनगर, सातपुर, नाशिक) यांस अटक केली आहे. खरंतर, संगमनेर शहरात मेफेंटरमाइन इंजेक्शनचे ड्रग्ज,गांजा हुक्का तर तरुणाने कोयत्याने हात धडापासुन वेगळा केला नाही तेच आता पुन्हा हाय प्रोफाइल ड्रग्ज भेटल्याने संगमनेर शहरातील पालकांनी आता चिंता व्यक्त केली आहे. गेली महिन्याभरतील गुन्ह्यांचा घटनाक्रम बघता शहरातील अम्ली पदार्थचे तस्करीचे हब संगमनेर शहर बनत आहे. त्यामुळे, येथील तरुण पिढी आता व्यसनाच्या विळख्यात अडकताना दिसत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर शहरातील तरुणांकडे कॉलेजच्या मुलांमध्ये ड्रग्जचे सेवन मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याची माहिती पोलिसांकडे येत होती. हे ड्रग्ज सेवन करताना तरुण मुले वाम मार्गाला जात आहे. आशा वारंवार तक्रारी पोलीस ठाण्यात येत होत्या. पोलीस उपअधिक्षक कुणाल सोनवणे यांना गोपनीय माहीतीद्वारे माहिती मिळाली. की, गणेशनगर परिसरात पहाटे एक तरुण मुलगा येऊन व्हाइट पावडरची विक्री करतो. अशी माहिती पोलीस उपअधिक्षक सोनवणे यांना मिळाली. त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्याचे व उपअधिक्षक कार्यलयाचे एक पथक तयार केले व गणेश नगर परिसरात पाठवले. तेथे पोलिसांनी सापळा रचला. सर्व पोलीस गणेश नगर परिसरात दबा धरून बसले. त्यावेळी फॉर्च्युनर गाडी एम. एच.15 एफ. एफ.9630 ही गाडी आली. त्या गाडी मधून आशिष हा गाडीखाली उतरला.
दरम्यान, तो गाडीच्याखाली उतरून त्याचे नेहमीचे ड्रग्ज घेणारे मुलं रस्त्याने पाहु लागला. त्याची गोपनीय सूत्रांकडुन मिळालेली माहिती, वर्णन हे मिळते जुळते होते. त्याची संशयित नजर पोलिसांच्या लक्षात आली. पोलिसांनी रस्त्यावर चालत असताना आरोपी आशिषला पकडले. त्यावेळी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या खिशामध्ये बंद पाकीटात छोटी पुडी मिळून आली. तिची पडताळणी केली असता तिचा उग्रवास आला. ते ड्रग्ज असल्याची खात्री झाल्यानंतर अजुन कुठे मुद्देमाल ठेवला आहे का? याची चौकशी केली असता आरोपी आशिष हा खाकी पुढे पोपटासारखा बोलु लागला. त्याच्या गाडीची संपूर्ण झडती घेतल्यानंतर त्यामध्ये देखील बंद पाकीटात ड्रग्ज मिळून आले. तब्बल 3 लाख 9 हजार रुपयांचा ड्रग्जसह फॉर्च्युनर गाडी ताब्यात घेण्यात आली असा 43 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. ही दमदार कामगिरी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत,संतोष पगारे, पोलीस अनिल कडलग, राहुल सारबंदे, दत्तात्रय मेंगाळ, बापु हांडे, विजय खुळे, राम मुकरे, सुरेश मोरे, अजित कुरहे, रोहिडास क्षीरसागर, आत्माराम पवार, हरिश्चंद्र बांडे, विशाल कर्पे यांनी ही कामगिरी केली.
शहरात महिलांना सुरक्षततेची चिंता.!
संगमनेर शहरात वाढती गुन्हेगारी हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरला आहे. तरुण मुले व्यसनाच्या विळख्यात अडकुन चैन स्नॅचिंग, दंगा , मोटार सायकल वेगाने चालवणे आता तर एकावारात हात धडापासुन वेगळा केला आहे. इतकी हिम्मत मुलांमध्ये कुठून येते तर ही अम्ली पदार्थांमधुन. त्यामुळे, शहरातील महिला मार्केट मध्ये जाताना विचार करत असुन सात वाजले की बाहेर पडण्याची हिम्मत होत नाही. ड्रग्ज, गांजा ,हुक्का असे नशेचे पदार्थ घेऊन तरुणांनी रस्त्यावर गोंधळ घातले आहे. तर मुलींसोबत छेडछाडीचे प्रकार देखील झाले आहे. यामुळे शिक्षणासाठी येणाऱ्या तरुण मुलींमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे. 1 ग्रॅम ड्रग्जची किंमत जर 3 हजार असेल तर ही सर्वसामान्य घरातील मुले घेऊ शकतो का? ही ड्रग्ज घेणारी मुलं ही उच्चभ्रू घराण्यातील असुन ती हाय प्रोफाइल व्यसन करून मुलं-मुली पार्टीकरताना आता आढळून येत आहे. त्यामुळे, पालकांनी वेळीच मुलांची खबरदारी घ्यायला हवी.आता या रॅकेट मध्ये राजकीय लोकांची देखील धागेदोरे जुळताना दिसुन येत असुन जमावासाठी, गर्दीसाठी या तरुण मुलांचा वापर केला जातो. त्यामुळे, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळ्या या राजकारणात आता सक्रीय होत आहे.
