फोफसंडीच्या पानवथा धबधब्यात चौघे तरुण बुडाले, दोन सापडले, दोघे गायब.! स्थानिक लोक सुद्धा घाबरतात.!
अकोले तालुक्यातील सर्वात शेवटचे निसर्गरम्य गाव म्हणजे फोफसंडी होय. तेथे सुर्य हा सकाळी ९ वाजता उगवतो तर सायंकाळी साडेचार वाजता मावळतो. त्यामुळे, हे ठिकाण पर्यटक व सरकारी अधिकारी यांना कायम साद घालत असते. हेच यांच सौंैदर्याचा आनंद घेण्यासाठी संगमनेर तालुक्यातील कनोली परिसरात राहणारे चार मित्र सकाळी फोफसंडी गावात गेले होते. तेथे त्यांनी कत्तरचोंड धबधबा आणि काही ठिकाणी फिरण्याचा मनमुराद आनंद घेतला. त्यानंतर ते पानवथा धबधब्यावर गेले.
दरम्यान, त्यातील तिघांना पोहता येत नव्हते. तर, एकाला चांगले पोहता येत होते. त्यामुळे, त्यांनी पाण्यात उतरण्याचा देखील आनंद घेतला. मात्र, खाली खोल दरी आणि त्या दरीत देखील पुर्ण कपार असून तेथे जाण्याचे धाडस तेथील गावकरी देखील करीत नाहीत. अशा ठिकाणी हे तरुण गेले. तेथे गेल्यानंतर एका तरुणाचा फोन पाण्यात पडला. तो पकडण्याच्या नादात त्याचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडला. आता तेथील दरी ही प्रचंड खोल असून त्या जागेच्या खोलीचा ठाव हा स्थानिक मानसांना देखील नाही. त्यात या तरुणांनी तेथे जाण्याचे धाडस केले.
दरम्यान, एकाचा मोबाईल पडला असता तो मोबाईल पकडण्यासाठी गेला आणि तो बुडू लागला. तो बुडताना पाहुन ज्याला पोहता येत होते. त्याने पाण्यात उडी मारली. आपण आपल्या मित्राला वाचविले पाहिजे या प्रेमापोटी त्याने जो प्रयत्न केला तो त्यांच्या मैत्रीला सलाम करणारा होता. मात्र, ज्याला पोहता येत नव्हते त्याने आपल्या मित्राला घट्ट मिठी मारली आणि काही वेळानंतर दोघे दिसेनासे झाले. एकाला वाचविण्याच्या नादात दुसर्याने आपला जीव धोक्यात टाकला. मात्र, आज दोघांचे जीव धोक्यात गेले.
ही दोघे बुडत असताना अन्य दोघे जे होते. त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. दोघांना कशी मदत करता येईल याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र, इतक्या दुर्गम भागात त्यांना तत्काळ मदत मिळणे अशक्य होते. त्यातील एका तरुणाने धबधब्यापासून काही अंतरावर येऊन गावातील काही तरुणांचा धावा घेतला. त्यानंतर काही गावकरी त्या धबधब्यावर गेले. मात्र, त्यांनी सांगितले. की, आम्ही जरी स्थानिक असलो. तरी आम्ही या पानवथ्याच्या धबधब्यावर कधीच येत नाहीत. कारण, हा खोल तर आहेच. मात्र, या पाण्याखाली मोठमोठ्या कपारी देखील आहेत. त्यामुळे, यात उतरण्याचे धाडस कोणी करीत नाही. त्यामुळे, तेथील लोकांनी देखील वरवर शोध घेतला. मात्र पाण्यात उतरण्याचे धाडस कोणी केले नाही. रात्री उशिरापर्यंत सहायक पोलीस निरीक्षक दातरे यांचा अथक प्रयत्न चालु होते. मात्र, दोघांचा शोध काही लागलेला नव्हता.
म्हणून पर्यटक फोफसंडीला जातात.!
फोफसंडी हे बाराशे लोकवस्तीचे गाव ऐतिसहासिक आहे. १९२५ च्या काळात संगमनेर प्रांताधिकारी फोफ हे घोडेस्वार होऊन येथे निसर्गरम्य ठिकाण म्हणून येत होते. त्यांच्या नावाहून फोपसंडी असे नाव पडले. चार जिल्ह्यांची सिमारेषा या गावाला लागते. तेथे १५० जनावरांचा गोठा हा गुहेत असून तीन कुटुंब तेथे राहतात. केवळ शासनाच्या सुविधा नाहीत म्हणून. तेथील कोंबड किल्ला (कुंजीर गड) हे महत्वाचे आकर्षन असून येथे सकाळी ९ वाजता सुर्य उगवतो आणि साडेचार वाजता मावळतो. १९९७ सालापासून समाजसेवक दत्तात्रय मुठे हे तेथील गावचा विकास आणि तेथील पर्यटन स्थळ यांच्या संवर्धनासाठी काम करत आहेत. दुर्दैवाने आज देखील हे गाव मुलभूत सेवा सुविधांपासून वंचित आहे. मात्र, तेथील निसर्ग म्हणजे मिनि जम्मू कश्मिर असल्यामुळे पर्यटक मोठ्या संखेने तेथे जाणे पसंत करतात.