डाॅ. भानुदास डेरे यांचे संतुलन बिघडले, थेट हाॅस्पिटमध्ये फाॅर्च्युनर गाडी घातली, स्टाफला ठार मारण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल.!

 

सार्वभौम(संगमनेर) :- 

                      संगमनेर शहरातील नामांकीत असलेले संजीवन हॉस्पिटलचे संस्थापक भाजपचे नेते भानुदास डेरे यांची मुलगी आईला सपोर्ट करते याचा राग मनात धरून भानुदास डेरे व त्यांचा पीए सोमनाथ पवार यांनी हॉस्पिटलमध्ये वेगाने फॉर्च्युनर गाडी वेटींगरूम मध्ये घालुन काचेचा दरवाजा तोडुन स्टाफ मधील तरुणाच्या अंगावर गाडी घातली. सुदैवाने तो वाचला. मात्र, या तरुणाला फॉर्च्युनर गाडीखाली चिरडुन टाकण्याचा प्रयत्न डॉ.भानुदास डेरे यांनी केल्याने एकच खळबळ उडाली. ही धक्कादायक घटना मंगळवार दि.18 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7:20 दरम्यान घडली. हे सर्व कृत्य पाहुन भानुदास डेरे यांच्या मुलीची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी आपल्या वडीलांना पाठीशी न घालता पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानंतर आरोपी भानुदास गेणूजी डेरे (रा. घोडेकरमळा, ता. संगमनेर), पीए सोमनाथ पवार यांच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून यांना तात्काळ अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. खरंतर, डॉ.भानुदास डेरे यांना राजकीय वलय आहे. त्यांनी कौटुंबिक वाद इतका विकोपाला नेऊन असे कृत्य करायला नको होते. मात्र, कौटुंबिक वाद आता चव्हाट्यावर येत असेल  तर हे दुर्दैव असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

          याबाबत सविस्तर माहिती अशी की, डॉ. एकता वाबळे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. की, भानुदास डेरे व त्यांची पत्नी या विभक्त राहतात. डॉ. एकता वाबळे या गुंजाळवाडी येथील संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर हे चालवते. डॉ. एकत वाबळे या आईला सपोर्ट करत असल्याने आरोपी भानुदास डेरे हे नेहमी धमक्या देतात आणि हॉस्पिटलखाली करण्यास भाग पडतात. हा वाद गेली दहा ते बारा वर्षांपासून सुरू आहे. तो आता विकोपाला जात आहे. आरोपी डॉ.भानुदास डेरे व त्यांचा पी. ए. सोमनाथ पवार यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन डॉ. वाबळे यांना शिवीगाळ केली. जीवे मारण्याची धमकी दिली. तेथे काम करणाऱ्या जवळ निरोप दिला. की, हे हॉस्पिटल खाली कर नाहीतर जीवे ठार मारील. आशा वेळोवेळी धमक्या येत राहिल्या. परंतु, आपलेच वडीलच आहे. म्हणुन तक्रार दिली नाही. त्यानंतर हा वाद पुन्हा विकोपाला गेला. 

        दरम्यान, काल मंगळवार दि.18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7:20 वाजण्याच्या दरम्यान डॉ.एकता वाबळे या हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या मजल्यावर काम करत होते. तर हॉस्पिटलमधील स्टाफ हा ग्राउंडफ्लोरला वेटींग रूम मध्ये व रिसेप्शन टेबलवर काम करत होता. अचानक तेथे काचा फुटल्याचा मोठा आवाज झाला. लॅब टेक्निशियन या धावत गेल्या त्यांनी खाली जाऊन पाहिले. त्यानंतर त्यांनी डॉ. एकता वाबळे यांना सांगितले की, आपल्या हॉस्पिटलमध्ये काचा फुटत आहे तुम्ही चला. त्यावेळी डॉ. एकता वाबळे यांनी खाली येवुन पाहिले. असता हॉस्पिटल वेटींग रूम मध्ये पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर गाडी एम. एच.17 डी. जे.1419 ही गाडी उभी होती. वेटिंग रूमचा काचेचा दरवाजा संपूर्ण फुटलेला होता. गाडीत ड्रायव्हिंग सीटवर पाहिले असता आरोपी डॉ.भानुदास डेरे हे बसलेले होते. त्यांच्या शेजारी पी.ए सोमनाथ पवार हा बसलेला होता. डॉ. एकता वाबळे यांना बघुन आरोपी भानुदास डेरे खाली उतरले. डॉ. भानुदास डेरे यांनी काऊंटरवर लाथा मारून शिवीगाळ करू लागले. त्यानंतर आय. सी. यु मध्ये जाऊन आज एका-एकाला संपवतो असे ओरडु लागले. पोलीस गाडी बोलतो असे म्हणुन देखील त्यांचा पीए सोमनाथ पवार हा बोला की, डॉक्टर साहेब बिनधास्त राहा गाडी पुढे घ्या एक एकाला संपवून टाका असे म्हणाला.

           दरम्यान, डॉ. एकता वाबळे यांनी आरडा ओरडा केल्यानंतर स्टाफ पळत आला. त्यानंतर डॉ. भानुदास डेरे माघेरी फिरले. त्यावेळी रिसेप्शन टेबलजवळ असणाऱ्या स्टाफ मधील कर्मचारी राजेंद्र अभंग हा जवळ आला व त्याने सांगितले की, मी काम करत असताना गाडी वेगाने येऊन मला गाडीखाली जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हे स्टाफच्या कर्मचाऱ्याचे एकताच डॉ. एकता वाबळे यांची तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी वडिलांना पाठीशी न घालता त्यांच्या विरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणुन पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपी भानुदास गेणूजी डेरे (रा. घोडेकरमळा, ता. संगमनेर), पी.ए सोमनाथ पवार यांच्यावर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक केली आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहे.