तिला दारु पाजून त्याने अत्याचार केला, दगडाने ठेचून ठार मारले.! आरोपी अटक,..त्यामुळे आई-बाप लेकीवर नाराज.!

सार्वभौम (संगमनेर) :-

संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात एका अल्पवयीन मुलीची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. त्याची उकल करण्यात संगमनेर तालुका पोलिस व पोलीस उपअधीक्षक यांच्या पथकाला यश आले आहे. पीडित मुलगी ही नगर रोडवरील ज्ञानमाता शाळेच्या परिसरात राहत असून तिला मंगळवार दि. १९ सप्टेंबर २०२३ रोजी अत्याचार करण्यासाठी घाटात नेले होते. अत्याचार झाल्यानंतर आरोपीने मद्यपान केले आणि तिच्या डोक्यात चार वेळा मोठा दगड टाकून तिला ठार केले. त्यानंतर सहा दिवसांनी हा प्रकार समोर आला. मात्र, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक बाबी जुळवून अतिशय सूक्ष्म पद्धतीने तपास करुन आरोपी तुषार विठ्ठल वाळुंज (रा. लक्ष्मीनगर. ता. संगमनेर, जि. अ.नगर) यास अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती सुत्रांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी. की, गणपती बसण्याच्या दिवशी आरोपी तुषार वाळुंज याने दुपारी पीडित मुलीशी संपर्क केले होता. त्यानंतर ते एकत्र आले, त्यांच्यात पुर्वीपासून मैत्री होती, त्यामुळे ते नेहमी एकमेकांमध्ये उठबस करत होत होती. त्या दिवशी संगमनेरात बाप्पा बसविण्याची लगबग सुरु होती आणि याचे भलतेच उद्योग सुरू होते. हा पाहिल्यांदा एका बारमध्ये गेला होता तर नंतर देखील त्याने आणखी एका ठिकाणाहुन मद्य घेतले. त्यानंतर हे दोघेजण थेट चंदनापुरी घाटाकडे निघुन गेले.

दरम्यान, तेथे गेल्यानंतर याने पीडित तरुणीस दारु पाजली. त्याने देखील एक बाटली रिचविली. त्यानंतर यांच्यात तु-तू मै-मै झाली. या दरम्यान आरोपी तुषार वाळुुंज याने पीडितेवर वारंवार अत्याचार केले. ही अल्पवयीन मुलगी मद्यामुळे फारशी शुद्धीत नव्हती. त्यामुळे, त्यांच्यात वाद झाले.  पीडित मुलगी जमिनिवर कोसळलेली असल्यामुळे ती बेसावध होती. तेव्हा वाळुंज याने जवळ पडलेला एक भलामोठा दगड उचलला आणि तिच्या डोक्यात घातला. तोच दगड तीन ते चार वेळा पीडितेच्या डोक्यात टाकल्याने तिच्या कवटीचा पार चेंदामेंदा झाला होता.

दरम्यान, पीडितेची हत्या झाल्यानंतर तिची ओळख पटू नये म्हणून आरोपी वाळुंज याने फार भयानक कृत्य केले. पीडित मुलीला जवळ असणार्‍या पाण्यात लोटुन दिले. चंदनापुरी हा भाग पर्जन्य छायेसोबत तो निर्जन स्थळाचा देखील आहे. त्यामुळे, तेथे पाऊस पडल्याने पीडित मुलीची बॉडी कुझली गेली. तिच्या अंगाला किड्यांनी खाल्ले होते. त्यामुळे, शरिर आणि गुप्त भागांवर प्रचंड मोठ्या जखमी दिसून येत होत्या. हे सर्व कृत्य केल्यानंतर सहा दिवस उजाडले तरी कोठे चर्चा झाली नाही. त्यामुळे, आपण केलेला गुन्हा पचला की काय? असे गुन्हेगाराला वाटत होते. मात्र, त्यानंतर एका व्यक्तीने हा प्रकार पाहिला आणि त्याने पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान, मुलीची ओळख पटलेली नसताना हा तपास करणे कठीण होते. मात्र, पोलीस उपाधिक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांनी तपासाला वेग दिला होता. त्यानंतर पहिल्याच दिवशी यांनी मुलीची ओळख पटविली. त्यानंतर चार संशयित देखील ताब्यात घेतले होते. मात्र, यांचा आणि या गुन्ह्याचा तिळमात्र संबंध नव्हता हेच वारंवार पुढे येत होते. त्यामुळे, संकेत नवले प्रकरणासारखे चोर सोडून सन्याशाला फाशी होतेय की काय? अशी चर्चा समाज माध्यमांमधे होऊ लागली होती. मात्र, पोलिसांनी अधिक खोलवर तपास केला आणि खरा गुन्हेगार तुषार वाळुंज याच्या मुसक्या आवळल्या आहेत. तर, त्याने हा गुन्हा कसा केला हे देखील सांगितले असून गुन्ह्याची कबुली दिली आहे.

ती मुलगी मेली म्हणून सोडली.!

पीडित मुलगी ही मुळत: राहाता तालुक्यातील आहे. पोट भरण्यासाठी ते संगमनेरात कायमचे स्थायिक झालेे होते. पीडितेच्या उशाला शाळा असून देखील ती शाळेत जात नव्हती. तर, आपल्या पालकांचे देखील फारसे ऐकत नव्हती. सकाळ झाल्यानंतर ती तिच्याच विश्‍वात मग्न होती. त्यामुळे, तिला तिच्या घरचे देखील वैतागले होते. मात्र, जेव्हा या मुलीची हत्या झाली हे समजले तेव्हा तिच्या कुटुंबियांना सांगण्यात आले. त्यांनी मुलगी आमचीच असल्याचे सांगितले. मात्र, पुढील कोणतेही सोपस्कार करण्यास नकार दिला होता. त्यानंतर मयत मुलीचा अंत्यविधी हा पोलिसांनी केला. तर, एक कायदेशीर बाब म्हणून पीडितेच्या वडिलांनी फिर्याद दिली असून त्यानुसार तुषार वाळुंज यास आरोपी करण्यात आले आहे.