काल लग्न झालं आणि आज बायकोने नवऱ्यावर बलात्काराचा ठोकला गुन्हा.! त्याने पहिली बायको लपवून ठेवली, इन्स्टाग्रामची मैत्री जेलमध्ये घेऊन गेली.!
सार्वभौम (संगमनेर) :-
मामाच्या गावाला 19 वर्षीय तरुणीची इंन्स्टाग्रामवर एका तरुणाशी ओळख झाली. मंग काय!हाय, हॅलो, चॅटिंग सुरू झाली. ही तरुणी संगमनेर शहरातील कॉलेजला येत असताना पिंपळगाव देपा परिसरातील चौकातून 23 वर्षीय तरुणाने हिला दमबाजी करून जुन्नर येथे मामाच्या घरी नेले. तेथे मुक्कामी थांबुन घराबाहेर पत्र्याच्या शेडमध्ये थांबले. रात्र होताच तो म्हणाला की, तु जर माझ्याशी लग्न नाही केले तर मी माझा जीव देईल. अशी धमकी देऊन त्याने पीडित तरुणीवर जबरी संभोग केला. त्यानंतर, या तरुणाने पीडित तरुणीला आळंदी नेऊन लग्न केले. लग्नानंतर पुन्हा संभोग केला. जेव्हा, पिडीत तरुणीला लग्न करून कुकरकुंडवाडी येथे आणले तेथे पिडीत तरुणीला समजले की आपण लग्न केलेल्या तरुणाचे दिड वर्षांपूर्वी लग्न केले आहे. जेव्हा हे पितळ उघडे पडले तेव्हा तरुणीला मोठा धक्का बसला. हा सर्व धक्कादायक प्रकार शनिवार दि.15 जुलै 2023 ते 18 जुलै 2023 रोजी वेळोवेळी घडला. आपली फसवणुक झाली हे तरुणीच्या लक्षात येताच थेट घारगाव पोलीस ठाणे गाठुन तक्रार दाखल केली. त्यानुसार केशव बबन काळे (रा. कुरकुंडी, ता. संगमनेर) याच्यावर बलात्कारासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर करत आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, 19 वर्षीय पिडीत तरुणीचे आई वडील पिंपळगाव देपा परिसरात शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. पिडीत तरुणी संगमनेर शहरातील नामांकीत कॉलेजमध्ये एफ.वाय.बी.ए चे शिक्षण घेते. पिडीत तरुणी सुट्टीत एप्रिल 2023 रोजी कुरकुंडी परिसरात मामाच्या घरी आली होती. तेथे इंन्स्टाग्रामवर आरोपी केशव काळे या तरुणाशी तिची ओळख झाली. इंन्स्टाग्रामवरून मोबाईल नंबर एकमेकांना मिळाला आणि मंग काय.!हाय, हॅलो, चॅटिंग सुरू झाली. पिडीत तरुणी सुट्टी संपल्यानंतर पुन्हा आपल्या घरी गेली. दि.11 जुलै 2023 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आरोपी केशव काळे याचा पिडीत तरुणीला फोन आला. तो फोनवर म्हणाला की, "तु जर माझ्याबरोबर आली नाही, जर तु माझी झाली नाही. तर तु कोणाची होणार नाही". अशी धमकी दिली व पिडीत तरुणीला पिंपळगाव देपा चौकात एकटी येण्यास भाग पाडले. जर तु तेथे आली नाही तर तुझ्या भावाला चाकणला जाऊन मारून टाकीन अशी धमकी देखील दिली.
त्यानंतर दि. 15 जुलै 2023 रोजी सकाळी 7 वाजता नेहमी प्रमाणे पिडीत तरुणी कॉलेजला जाण्यासाठी घरा बाहेर पडली. त्यावेळी पिपळगाव देपा चौकातील परिसरात आरोपी केशव काळे हा मोटारसायकलवर आला होता. तु माझ्याबरोबर चाल अशी धमकी देत गाडीवर बसवुन संगमनेर-अकोले ते ओतुर मार्ग जुन्नर तालुक्यात आरोपी केशव काळे याच्या मामाच्या घरी नेले. तेथे दि.15 जुलै व 16 जुलै 2023 रोजी मुक्काम केला. मात्र, तेथे घराबाहेर पत्र्याच्या शेडमध्ये झोपलो तेथे आरोपी केशव काळे हा पिडीत तरुणीला म्हणाला की, तु जर माझ्याशी लग्न नाही केले तर मी माझा जीव देईल. असे म्हणुन त्याने बळजबरीने पिडीत तरुणीशी संभोग केला.
दरम्यान, दि. 17 जुलै 2023 रोजी सकाळी उठल्यावर आरोपी केशव काळे हा म्हणाला की, तु जर लग्नासाठी आली नाही तर मी जीवाचे बरेवाईट करेल अशी धमकी देऊन आरोपी केशव काळे हा आळंदी येथे घेऊन गेला. यावेळी त्याच्या सोबत आई वडील व नातेवाईक देखील होते. एका संस्थेत लग्न केले. तेथुन पुन्हा आरोपी केशव काळे याच्या मामाच्या घरी गेलो असता तेथे पुन्हा बळजबरीने संभोग केला. दरम्यान घरी आल्यानंतर लग्नानंतरचे सर्व सोपस्कार त्यांनी पार पाडले. रात्र उजाडली आणि दुसऱ्या दिवशी तिला समजले की आरोपी याचे यापुर्वी देखील लग्न झाले आहे. मात्र, याने काहीच सांगितले नाही. हा सर्व पोरखेळ लवकर चव्हाट्यावर आला आणि मुलीने तत्काळ आपल्या भावाशी संपर्क केला. जे घडले ते कथन केले आणि माझी चुक पदरात घेऊन मला तत्काळ घ्यायला या अशी विनंती केली. त्यानंतर मुलीचे नातेवाईक आरोपीच्या घरी आले आणि मुलीला घेऊन गेले. त्यानंतर पीडित मुलीने स्वत: मनाव घेऊन आरोपी केशव काळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.