भगव्या मोर्चाला दंगलीचे गालबोट.! तीनबत्ती तोडफोड व समनापुरात दगडफेक, दोन्ही गटाचे तरुण ताब्यात.!


सार्वभौम (संगमनेर) :-

      जोर्वे नाक्यावरील वाद, हिंदु समाजावर होणारा अन्याय आणि लव जिहाद हा मुद्दा घेऊन संगमनेर शहरात आज भगवे वादळ अवतरले होते. मात्र, शहरात अपवाद वगळता अगदी शांततेत मोर्चा पार पडला. मात्र, मोर्चा संपल्यानंतर काही तरुण लोणीकडे जाताना समनापुुरमध्ये तणाव निर्माण होऊन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यावेळी दगडफेक, गाड्या फोडणे आणि माहिलांना मारहाण झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले. यात मुस्लिम बांधवांच्या महिलांसह चौघे जखमी झाले आहेत. अर्थात येथे दोन्ही गटांनी अक्षरश: पोलिसांच्या देखत एकमेकांवर दगडफेक केली. मात्र, तरी देखील अगदी संयमाने पोलिसांनी ही दंगल हताळली. खरंतर एकीकडे फार सुंदर असा मोर्चा झाला याचा आनंद तर दुसरीकडे दोन ठिकाणी मोर्चाला गालबोट लागल्याचे दु:ख आहे. यात गुन्हे दाखल होतील, दोन्ही गटाचे तरुण मुले अटक होतील. मात्र, संगमनेरचे जे वातावरण गढुळ झाले आहे. त्यासाठी कोण पुढाकार घेईल देव जाणे.!!

हिंदु समाजावर होणारा अन्याय रोखण्यासाठी काही तरुणांना संपुर्ण नगर जिल्ह्याला हाक दिली आणि बोलबोल करतात संपुर्ण संगमनेर भगवे झाले. जय श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय या जयघोषाने संगमनेर शहर दुमदुमून गेले होते. कोणत्याही राजकीय अश्रयाशिवाय निघालेल्या भगव्या मोर्चाला प्रचंड उत्सुर्त प्रतिसाद मिळाला. अनेकांनी धर्मविषयी आपल्या भावना व्यक्त करीत लव जिहाद कायदा झाला पाहिजे यासाठी अग्रह धरला. खरंतर पोलीस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, पोलीस उपाधिक्षक सोमनाथ वाघचौरे तसेच पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांनी महत्वाची भुमीका बाजावली. शहरात मोर्चा शांततेत पार पडला. मात्र, तिनबत्ती रोडवर असणार्‍या किराणा दुकानाची काही तरुणांनी तोडफोड केली. त्यानंतर अपवाद वगळता मोर्चा नियोजनबद्ध व आदर्श असा ठरला. अंतीम टप्प्यात समनापुरात मात्र, चांगल्या मोर्चाला गालबोट लागले. घरात घुसून महिलांना मारले तेव्हा आम्ही मुस्लिम म्हणून जन्माला आलो ही आमची चुक आहे का? असा प्रश्‍न विचारत अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पोलीस प्रशासनाने या घटनेची दखल घेऊन कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी पोलिसांनी दोन्ही गटाच्या काही तरुणांना ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई सुरूच आहेे. 

समनापुरची दंगल झाली कशी?

मोर्चा संपल्यानंतर हजारो तरुण जय श्रीराम, जय शिवराय अशा घोषणा करीत आपापल्या गावाकडे चालले होते. ते समनापुर येथे असताना सर्वच दुकाने बंद होती. मात्र, तेथे काही तरुण क्रिकेट खेळत होते. त्यातील एका तरुणाने रस्त्याने चाललेल्या तरुणांना काहीतरी वस्तु फेकूण मारली. त्यामुळे, रस्त्याने जाणारे तरुण पुन्हा मागे फिरुन आले. क्रिकेट खेळणार्‍यांशी त्यांची हुज्जत झाली आणि काही क्षणात दोन गट एकमेकांना भिडले. अशी माहिती प्रत्याक्षदर्शी यांनी दिली. तर, त्यानंतर तरुणांनी मात्र घरात घुसून अनेकांना मारहाण केली तर क्रिकेट खेळणार्‍यांना देखील मारहाण केली. त्यानंतर जेव्हा पोलीस प्रशासनाला हा प्रकार समजला तेव्हा वर्दीच्या हस्तक्षेपाने दगडफेक, तोडफोड आणि मारामारी थांबली. या घटनेत अनेजण जखमी झाले आहेत. 


यांना अधिकार दिला कोणी.!

कोपर्डीची घटना घडल्यानंतर राज्यात आरक्षणाच्या नावाखाली सकल मराठा समाजाचे ५८ मोर्चे राज्यभर निघाले होते. लाखो लोकांचा जनसमुदाय होता. पण, ५८ पैकी एकही ठिकाणी कोठे दंगल, जाळपोळ व दगडफेक झाली नाही. सुदैवाने सर्व काही शांततेत चालु असताना दुर्दैवाने काही माथेफीरू तरुणांनी मोर्चाला गालबोट लावला आणि तिनबत्ती चौकात असणारे पान स्टॅल तथा किराणा दुकानावर हल्ला केला. त्यानंतर काही तरुण जेव्हा घराकडे परतत होते. तेव्हा समनापूर येथे देखील काही दुकानांची तोडफोड केली. त्यामुळे, नको ते आरोप आणि चांगल्या मोर्चाची बदनामी झाल्यासारखे वाटले. मोर्चा काढणे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे. मात्र, कोणावर बळजबरी करुन त्यांची दुकाने बंद करणे किंवा तोडफोड मारहाण करणे. हा अधिकार या तरूणांना दिला कोणी. त्यामुळे, आता पोलीस प्रशासनाने कंबर कसली असून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

मुस्लिम बांधवांचा हा हाटीवाद कशासाठी.!



संपुर्ण संगमनेर बंदची साद देण्यात आली होती. त्यामुळे, एक दिवस सामोपचार म्हणून किंवा समझदारी-सलोखा म्हणून काही मुस्लिम बांधवांनी दुकाने बंद ठेवली असती तर काय बिघडले असते? दुकाने चालु ठेवून चार-दोन तासात काय लाखो रूपयांची कमाई होणार होती का? आपल्यातील काही मुस्लिम बांधवांनी बंदला प्रतिसाद दिला. मग ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांनी बंद ठेवले असते तर दंगल, दगडफेक आणि तोडफोड झाली नसती. पण, केवळ हाटीवाद म्हणून किंवा कोणाच्यातरी नाकावर टिच्चून काहींनी दुकाने चालु ठेवल्याची चर्चा सुरू आहे. आज एकाने सहकार्य केले तर उद्या दुसरे देखील सहकार्य करतील. मात्र, अशी आडमुठी भुमीका ही संगमनेरच्या सामाजिक वातावरणास बाधक ठरणार आहे. त्यामुळे, एकमेकांना सहाय्य करुनच सुपंथ होईल. अन्यथा हे वातावरण जितके ताणले जाईल तितके ते तुटत जाणार आहे. 

महिलांनी घेतले दुर्गेचे रूप.!

समनापुर येथे राडा झाल्यानंतर काही मुले भाजपाचे तालुकाध्यक्ष इथापे यांच्या हॉस्पिटलमध्ये घुसले. तेथील एका तरुणावर मोर्चाचा राग काढण्यासाठी त्यांनी हल्ला केला. त्याने आरडाओरड केल्यानंतर देखील सात ते आठ तरुणांनी त्या एकट्यास मारहाण करण्यास सुरूवात केली. मात्र, रुग्णालयातील काही महिलांनी थेट दुर्गेचे रूप धारण केले आणि सात ते आठ मुलांवर त्या चालुन गेल्या. माहिलांची मार खाऊन तरुण तेथून चालते झाले. हा सर्व प्रकार तेथील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यामुळे, महिलांनी मोर्चातून धडा घेत महिलांनी देखील सक्षम होण्याचा धडा घेतला असे मेसेस सोशल मीडियावर फिरताना दिसत होते.