संगमनेरात दंगल.! तलवार, चॉपर आणि रॉडने हाणामाऱ्या, पोलिसांचा लाठीचार्ज आणि वर्दीवर दगडफेक, आठजण जखमी, 150 जणांवर गुन्हे दाखल.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                  संगमनेर शहरातील जोर्वे नाका येथे पिकपच्या गाडीने हॉर्न दिला. तो सहन न झाल्याने ड्रायवरच्या कानशिलात वाजवली त्याचे रूपांतर वादात झाले. ते तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता तेथुन जोर्वे गावी जात असताना शंभर ते दिडशे लोकांनी चॉपर, दांडके, तलवार, फायटर लोखंडी रॉड हातात घेऊन त्यांना घेराव घातला "ये वही लोग है, जो अपने खिलाफ पोलीस स्टेशन को तक्रार देणे गये थे. आज इन्हे जिंदा घर नही जाने देंगे" असे म्हणुन जोर्वेला जाणाऱ्या लोकाच्या डोक्यात पाठीवर लोखंडीरॉडने व धारधारशस्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना रविवार दि. 28 मे 2023 रोजी सायंकाळी 6:30 ते 9:30 वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये आठ जण गंभीर जखमी झाले आहे. यात आरोपी बाबु टपरीवाला, इम्रान वडेवाला, नदिम हुसेन, इम्रान (युसुफ पेंटरचा मुलगा) रियाज जहीर शेख रिक्षावाला, साफीक चहावाला, इरफान, सफीक, अकील टपरीवाला, ताहीर नजीर पठाण, शाहीद वाळूवाला, मुसेफ शेख, मुज्जू, फय्युम फिटर, एफफुखान वडेवाला, आरफत रफीक शेख, इरफान वडेवाला इतर शंभर ते दीडशे (सर्व. रा. संगमनेर) यांच्यावर हाफमर्डर व आर्म अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करत आहेत.

             याबाबत सविस्तर माहिती अशी की, जोर्वे येथुन काही तरुण पशुखाद्य घेऊन संगमनेर शहरात विक्री करून घरी जात असताना जोर्वेनाका परिसरात पिकअप पुढे उभे असणाऱ्याना हॉर्न दिला. या कारणावरून जोर्वेनाका परिसरातील 20 ते 25 तरुणांनी मारहाण केली. त्यावेळी जोर्वे येथील लोकांना कळताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी मेडिकलचा मेमो दिला. त्यानंतर घरी मोटारसायकलवर जात असताना जोर्वे नाका येथे वळणावर मोटार सायकल हळु झाल्या. तेथे शंभर ते दीडशे लोकांचा जमाव होता. त्यांच्याकडे तलवार, चॉपर, फायटर, लाकडी दांडे, लोखंडी रॉड असे हातात घेऊन उभे होते. ते मोटार सायकल घेऊन जाणाऱ्या लोकांवर धावत आले. "ये वही लोग है, जो अपने खिलाफ पोलीस स्टेशन को तक्रार देणे गये थे. आज इन्हे जिंदा घर नही जाने देंगे" असे म्हणत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.

            दरम्यान, त्या जमावातील आरोपी इरफान व इम्रान वडेवाला व त्याच्याकडे काम करणारे तीन जण, बाबु टपरीवाला, इरफान, सफीक, अकील टपरीवाला, ताहीर नजीर पठाण, शाहीद, मुसेफ शेख, मुज्जू, फय्युम फिटर, एफफुखान वडेवाला, आरफत रफीक शेख, इरफान वडेवाला इतर जमावाने मारहाण करण्यास सुरवात केली. मारहाणीत आरोपी इरफान वडेवाले याने फिर्यादी रविंद्र गाडेकर याच्या डोक्यात, पाठीवर उजव्या बाजुला लोखंडी रॉडने मारहाण केली. आरोपी आरफत रफीक शेख याने फिर्यादी रविंद्र गाडेकर याच्या पाठीवर धारधार शस्रने वार केला. फिर्यादी रविंद्र गाडेकर याच्या सोबत असणाऱ्या सुमित थोरात, तन्मय दिघे, पुंडलिक दिघे, विजय थोरात, अजय थोरात, जितेंद्र दिघे, बाबासाहेब थोरात यांना फायटर, लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे तर रात्री जमाव मोठ्या प्रमाणात आल्याने तेथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे, वादसदृश्य परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी तेथे सौम्य लाठीचार्ज पोलिसांना करावा लागला. यात अंधाराचा आसरा घेऊन तेथे पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. मात्र, सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

           दरम्यान, संगमनेर शहरात वारंवार कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. राजरोस चोऱ्या होत असुन महिलांची मंगळसुत्रे हिसकावून नेली जात आहेत. जसे पोलीस निरीक्षक मथुरे आले तसे कायदा सुव्यवस्थेचे धिंदडे निघाले. येथे गांजा, गोमांस, वाळु, गुटखा आशा अवैध धंद्याबरोबरच लवजिहाद, दरोडे, चैनस्नेचिंग, मोबाईल, मोटारसायकल चोरी आशा घटना रोजच घडत आहे. त्यामुळे, येथील कायदा व सुव्यवस्था वेशीवर टांगली जात असुन अद्याप गोहत्या मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे. खरंतर, देशमुख यांच्या उचलबांगडीनंतर येथील कायदा सुव्यवस्था सुरळीत होईल असे वाटत असताना येथे राजरोस दरोडे पडत आहे. संकेत नवले सारख्या तरुणांचा खुन होत आहे. कित्तेक महिने उलटून ही तपास शाश्वत तपास लागत नाही. निव्वळ गुन्हे घडत आहे ते कायम तपासावर पडत आहे. अनेक गुन्ह्यांचा तपास सुरूच असल्याने शहरातील नागरिकांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे. डीवायएसपी यांच्या पथकाची कामे वगळता येथे एक ही कामगिरी कौतुकास्पद दिसलेली नाही. त्यामुळे येथे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, अभय परमार यांच्या सारखा खमका अधिकारी हवा आशा प्रतिक्रीया नागरिकांमधून उमटत आहे.